फ्रेश मॉर्निंग बुलेटिन दिनांक 12 जानेवारी 2017

*🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर प्रस्तुत 📢*
📱 9423625769

1⃣  🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 1⃣ 
🕖 प्रसारण वेळ : रोज सकाळी 06:50 ते 07:00 am
----------------------------------------------------
http://fmbuleteen.blogspot.com
----------------------------------------------------
📅 दि. 12/01/2017 वार - गुरुवार 
========***********=========
        *📆 . . दिनविशेष . . 📆*

             . *राष्ट्रीय युवा दिन*
⌛१९३६ : डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची धर्मांतराची घोषणा.
💥 जन्म -
⌛१८६३ : स्वामी विवेकानंद.
⌛१५९८ : जिजाबाई शहाजी भोसले,
💥 मृत्यू -
⌛१९९२ : कुमारगंधर्व उर्फ पंडित कुमार गंधर्व 

*संकलक :- सौ. सुभद्रा सानप, बीड*
                 9403595764
========***********=========
*आजच्या ठळक बातम्या*
1⃣ शाळाबाह्य मुलांच्या उपस्थितीसाठी दर सोमवारी शिक्षकांनी विद्यार्थी सोबत सेल्फी काढून पाठवण्याच्या निर्णयाला शिक्षण मंत्री विनोद तावडेंनी दिली स्थगिती
2⃣ दहावी-बारावीच्या परिक्षांचा विचार करुनच निवडणूकीची तारीख ठरवली असल्याचे निवडणूक आयोगाने सांगितले
3⃣ जिल्हा परिषदांच्या निवडणुकीचे मतदान दोन टप्प्यांत होणार, पहिल्या टप्प्याचं मतदान 16 फेब्रुवारीला, तर दुस-या टप्प्याचं मतदान 21 फेब्रुवारीला होणार 
4⃣  विद्यार्थ्यांना वाहन परवाना कॉलेजातच मिळणार, परवाना देण्यास 16 जानेवारीपासून सुरुवात, परिवहन मंत्री दिवाकर रावते यांची घोषणा
5⃣ सर्वोच्च न्यायालयाकडून पंतप्रधान नरेंद्र मोदींना दिलासा, सर्वोच्च न्यायालयाने बिर्ला आणि सहारा समुहावरील छाप्या दरम्यान आढळलेल्या डायरीच्या आधारे चौकशी करण्याची मागणी फेटाळली. ज्येष्ठ वकील प्रशांत भूषण यांनी जप्त करण्यात आलेल्या डायरीचा चौकशी करावी अशी मागणी करणारी याचिका सुप्रीम कोर्टात दाखल केली होती.
6⃣ चौफेर टीकेची झोड उठल्यानंतर दोषी सुरेश कलमाडी आणि अभयसिंग चौटाला यांची आजीवन अध्यक्षपदी झालेली नियुक्ती भारतीय आॅलिम्पिक संघटनेने (आयओए) अखेर रद्द
7⃣  २०२६ च्या फुटबॉल विश्वचषकात सध्याच्या ३२ संघांच्या तुलनेत ४८ देशांचे संघ सहभागी होतील अशी घोषणा विश्व फुटबॉलचे संचालन करणाऱ्या फिफाने केली.

*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*
📱 9960358300
========***********=========
*🌷 फ्रेश सुविचार 🌷*
आनंद परिस्थिती वर अवलंबून असते पैश्यावर नाही, एक मुलगा फुगा घेऊन आनंदी होता तर दूसरा मुलगा फुगा विकून आनंदी होता.

*संकलक :- सुनील रेगुलवाड, उमरी*
                  7588876539
========***********=========
*आजचा मराठी शब्द*
             *परिस्थिती*

*संकलक :- जगन्नाथ दिंडे, मुखेड*
                  8668453639
========***********=========
*🎂 आजचा वाढदिवस* 
👤 कन्हैया भांडारकर, साधन व्यक्ती
👤 सुधाकर थडके, प्रा. शि. देगलुर
👤 रत्नाकर जोशी, पुणे

*संकलक :- नासा येवतीकर, धर्माबाद*
                  9423625769
[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा वरील क्रमांकावर पाठवू शकता. ]
========***********=========
*आजची @@ गुगली @@*

   *" कसोटी "*

जि.प.ईलेक्शनचे
बिगुल आता वाजले आहेत
बाशिंग बांधून गुडघ्याला
उमेदवार सजले आहेत

लक्षात ठेवा हा काळ
फार कसोटीचा असतो
विजय हा शेवटी संयम
अन् सचोटीचा असतो

    शरद ठाकर
सेलू जि परभणी
8275336675
========***********=========
*आजचा*
🌻 🌻 *॥ विचार धन ॥* 🌻 🌻

*निसर्गाने निर्माण केलेल्या कितीतरी अज्ञात गोष्टींचा शोध अजून लागायचा आहे. मानवी बुद्धी स्वस्थ न बसता सतत या गोष्टींचा शोध किंवा आधीच्या शोधांचा नवा अर्थ जाणून घेण्यात मश्गुल असते. परंतु एक सत्य अगणित वर्षे सर्वांसमोर सातत्याने उजळ माथ्याने उगवते, ते म्हणजे 'सुर्य.' उघड्या डोळ्यांनी*
*दिसणा-या निसर्गाच्या अनेक कलाकृतींपैकी एक प्रखर 'सत्य' म्हणजे 'सुर्य.' सुर्याला देवतेचे स्थान देऊन माणसाने त्याच्या ऋणातुन मुक्त होण्याचे औचित्य साधले. 'देव' या संकल्पनेला साजेसे सर्व गुण या लोहगोलाकडे आहेत.*

*वेदांमध्ये, कर्मकांडात सुर्यदेवतेला महत्व आहे, तितकेच आयुर्वेदातही आहे. हा प्रखर तारा ज्याला जे हवे ते देतो, त्यासाठी पुजा-आर्चा, नवस-सायास करण्याची गरज नाही. ही देवता दर बारा तासांच्या प्रतिक्षेनंतर उपलब्ध असते. निसर्गातल्या कुठल्याही भागावर पडलेल्या सुर्यकिरणातून एक नवनिर्मीती होते. कोवळ्या किरणांमधला निसर्ग मन मोहवून टाकतो. नवनवीन कल्पनांना जन्म देतो. सुर्यकिरण अंगावर पडल्याने मनुष्यात शौर्य निर्माण होते व तेजस्विता येते. ईश्वरचिंतन सुर्योदयापूर्वी करावे. सुर्योदयानंतर नवनवीन विचार सुचतात. सुर्यकिरण व सुर्यप्रकाश मन जागृत करतात.*

     🌞🌞 *॥ रामकृष्णहरी ॥* 🌞🌞
                🍂🍂🍂🍂🍂
     *--संजय नलावडे, चांदिवली, मुंबई*
========***********=========
*आज*
🎯  विचारवेध.........✍🏻
---------------------------
प्रत्येकाच्या जीवनात
आयुष्य,वेळ आणि संपत्ती ह्या तीनही गोष्टी कधीच कुणाची वाट पाहत नाहीत किंवा कुणासाठी थांबतही नाहीत.म्हणून त्यांच्या मोहात कधीच पडू नये.
या सा-यांमध्ये टिकते ते चारित्र्य.चारित्र्य हे येणा-या पिढीला एक आदर्श प्रेरणा मिळते.ते टिकविण्याची आणि वृध्दिंगत करण्याची जबाबदारी आपली आहे.चारित्र्यामुळे मनुष्य अधिक आकर्षकपणे खुलून दिसतो.तो त्याच्या चारित्र्यामुळे. कोणत्याही काळात तो टिकून राहतो.ते टिकविण्यासाठी वरील तीनही गोष्टी चारित्र्यासोबत राहत नाही.म्हणून त्यांच्यापाठीमागे न लागता चांगले चारित्र्य कसे घडवता येईल व कसे टिकवता येईल याकडे अधिक लक्ष देणे गरजेचे आहे.

- व्यंकटेश काटकर,नांदेड.
  संवाद.9421839590
========***********=======
🎺🎷🎺🎷🎺🎷🎺🎷🎺🎷
~~~~~~~~~~~~~~~~~~~
        *मैफ़िल-ए-इक्बाल*

                *मराठी*

हसून अपुल्या दुःखाचे ही गाणे करता येते
डोळ्यांमध्ये अश्रू असुनी खरेच हसता येते

                   *उर्दु*

चिलचिलाती धूप से भले ही जल जाओ
मगर भूलकर भी अपनोसे साये की उम्मीद न करना

- *डॉ शेख इक्बाल मिन्ने*
     ७०४०७९११३७
@@@@@@@@@@@@@@
*आजची बोधकथा*
            *एकीचे बळ सर्वश्रेष्ठ*

एका जातक कथेतील वर्णनानुसार वाराणसीलगत एका गावातील एक सुतार रोज जंगलात जात असे. एकदा त्‍याने खड्ड्यात पडलेल्‍या जंगली कुत्र्याच्‍या पिलाचा जीव वाचवला तेव्‍हापासून त्‍याला त्‍या पिलाचा लळा लागला. ते पिलू त्‍याला तेथे भेटत होते. ते पाहून इतरही जंगली कुत्रे त्‍याच्‍याजवळ येत असत. परंतु त्‍यांना सर्वांना एका वाघाने फार त्रस्‍त करून सोडले होते. तो रोज त्‍यांच्‍यावर हल्ले करत होता. सुताराने एक योजना बनविली. नेहमीप्रमाणे वाघ डोंगराच्‍या माथ्‍यावर आला. सर्व कुत्री वेगवेगळ्या ठिकाणी थांबून त्‍याच्‍यावर भुंकु लागली. वाघाने चवताळून एका कुत्र्यावर झेप घेतली तसा तो कुत्रा खाली बसला. वाघाची उडी थेट त्‍या कुत्र्याच्‍या मागे असणा-या एका मोठ्या खड्ड्यात पडली. सगळ्या कुत्र्यांनी त्‍याच्‍यावर धाव घेतली व त्‍याच्‍यावर हल्‍ला करून त्‍याला ठार केले.

तात्‍पर्य :- एकीचे बळ मोठे असते. 
========***********=======
🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏 पुन्हा भेटू उद्या
फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार 
========***********=========

Comments