*🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर प्रस्तुत 📢*
📱 9423625769
1⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 1⃣
🕖 प्रसारण वेळ : रोज सकाळी 06:50 ते 07:00 am
----------------------------------------------------
http://fmbuleteen.blogspot.com
----------------------------------------------------
📅 दि. 18/01/2017 वार - बुधवार
========***********=========
*📆 . . दिनविशेष . . 📆*
⌛१९४४ : भारतीय ज्ञानपीठाची स्थापना झाली.
💥 जन्म :-
⌛१९७२ : विनोद कांबळी, भारतीय माजी क्रिकेट खेळाडू.
💥 मृत्यू :-
⌛ १९४७ : कुंदनलाल सैगल, भारतीय अभिनेता, गायक.
⌛२००३ : हरिवंशराय बच्चन, हिंदी साहित्यिक
*संकलक :- सौ. सुभद्रा सानप, बीड*
9403595764
========***********=========
*आजच्या ठळक बातम्या*
1⃣ ग्लोबल वार्मिंगचा सामना करण्यासाठी आम्ही कठोर पाऊले उचलली असून तसे प्रयत्नही सुरु केले आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी
2⃣ भूमध्य सागरात बोट उलटून झालेल्या अपघातात जवळपास 180 लोक बेपत्ता झाले आहेत - एएफपी न्यूज
3⃣ कॉंग्रेस नोटाबंदीच्या मुद्दावरुन रिझर्व्ह बॅंकेच्या 25 कार्यालयांवर नेणार मोर्चा
4⃣ शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीसाठी 19 उमेदवारांचे नामांकन.
5⃣ झायरा वासिमला सर्वांनी साथ देण्याची गरज आहे. जम्मू आणि काश्मीरमधील मुले मुख्य प्रवाहात येत आहेत ही समाधानकारक बाब आहे व्यंकय्या नायडू
6⃣ हैदराबाद क्रिकेट संघटनेच्या अध्यक्षपदासाठी दाखल केलेले नामांकन फेटाळण्यात आल्यानंतर मोहम्मद अझरुद्दीनने या निर्णयाविरोधात उच्च न्यायालयात दाखल केली याचिका
7⃣ कर्णधार केन विलियम्सनने कारकिर्दीतील झळकावलेल्या १५ व्या शतकाच्या जोरावर न्यूझीलंडने बांगलादेशविरुद्ध सोमवारी पाचव्या व अखेरच्या दिवशी संपलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात सात गडी राखून मिळविला विजय
*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*
📱 9960358300
========***********=========
*🌷 फ्रेश सुविचार 🌷*
स्तुतीने चांगली माणसे सुधारतात तर वाईट माणसे बिघडतात.
*संकलक :- सुनील रेगुलवाड, उमरी*
7588876539
========***********=========
*आजचा मराठी शब्द*
*स्तुती*
*संकलक :- जगन्नाथ दिंडे, मुखेड*
8668453639
========***********=========
*🎂 आजचा वाढदिवस*
👤काव्या अश्लेषा मोदी
👤 प्रभाकर कमटलवार, शिक्षणविस्तार
अधिकारी, पं. स. धर्माबाद
*संकलक :- नासा येवतीकर, धर्माबाद*
9423625769
[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा वरील क्रमांकावर पाठवू शकता. ]
========***********=========
*आजची @@ गुगली @@*
" वरवर "
वरवर दाखवतात
खुप तुटले आहे
आतले दिसत नाही
किती जुटले आहे
वरवर असतात
दिसायला वेगळे
आतून असतात
जवळचे सगळे
शरद ठाकर
सेलू जि परभणी
8275336675
========***********=========
*आजचा*
🌺~🌹 *॥ विचार धन ॥* 🌹~🌺
*नवरा-बायकोमध्ये मतभेद असतातच. तसं पाहिलं तर 90% जोडप्यांमध्ये दोघांचेही स्वभाव परस्परविरोधी असतात, त्यामुळे वाद होणं, खटके उडणं स्वभाविकच आहे. परंतु एकाने समंजसपणा दाखवला पाहिजे. कारण वाद टोकाला जाऊन नवरा-बायको विभक्त होणार असतील तर त्या संपूर्ण कुटुंबाची वाताहात होते.*
*'लिव्ह-इन' मध्ये नात्याची कमिटमेंट नसते. त्यामुळे त्यात गांभीर्य नसते. एकत्र राहण्यातली नवलाई संपली की त्या नात्याचा कंटाळा येऊ लागतो. कमिटमेंट नसल्यामुळे दोघंही एकमेकांना बांधील नसतात. अंतिमत: अशा नात्याचा शेवट दोघांच्या विभक्त होण्याने होतो. आपल्यावर कुटुंबातल्या इतर सदस्यांबरोबर 'अॅडजस्ट' करण्याचे संस्कार झालेले असतात. वैवाहिक सुखही तसं क्षणिकच असतं, लग्नाची नवलाई संपली की सगळं चाकोरीबद्ध होऊन जातं. पण नवरा-बायको एकमेकांचे मित्र असतील तर त्यांच्या नात्यात सतत एक सकारात्मकता झिरपत असते.*
💝 *॥ रामकृष्णहरी ॥* 💝
💓💓💓💓💓
*--संजय नलावडे, चांदिवली, मुंबई*
*9167937040*
========***********=========
*आज*
🎯 विचारवेध...........✍🏻
--------------------------
ज्यांच्या जीवनात आळस, निरुत्साह, काही न करण्याची अपेक्षा, वेळ गमावणे, आपल्याला काय करायचे आपला काय संबंध ई. गुण रोमारोमात भिनलेले आहेत. अशी माणसे स्वतःच्या जीवनात कधीही यशस्वी होऊ शकत नाहीत. त्यांना इतर जगाशी काहीही देणघेणे नसते. ते स्वतःही काही करु शकत नाहीत आणि इतरांनाही काही करु देत नाहीत. अशा व्यक्तीच्या सहवासात किंवा संपर्कात कधीही राहू नये. ज्यामुळे आपल्या चालत असलेल्या चांगल्या कामात व्यत्यय निर्माण आणू शकतात. सक्रीय असलेल्या माणसांना निष्क्रिय बनवतात.
- व्यंकटेश काटकर,नांदेड
संवाद.9421839590.
💠⭐💠⭐💠⭐💠⭐💠⭐💠⭐💠⭐
. *गजल*
तू गुंतला असा की जगण्यास वेळ नाही
अन् सांगतो जगाला मरण्यास वेळ नाही
गाणार गीत केव्हा तू सांग जीवनाचे
जेव्हा तुलाच वेडया हसण्यास वेळ नाही
आयुष्य तू तुझे तर जगतो खुशाल आहे
आता जगाकडे ही बघण्यास वेळ नाही
मिटणार ना कधी जे ते नाव दे यशाला
म्हण एकदा तरी की हरण्यास वेळ नाही
आयुष्य युद्ध आहे जिंकून एकदा घे
सांगू नको पुन्हा की लढण्यास वेळ नाही..
निर्मला सोनी, अमरावती
9765001266
========***********=======
*आजची बोधकथा*
*क्रोधावर नियंत्रण*
एक १०-१२ वर्षाचा मुलगा होता. लहानपणापासूनच खूप हट्टी आणि संतापी होता. जेंव्हा त्याच्या मनाविरुद्ध घडे तेंव्हा त्याच्या रागाचा पारा प्रचंड चढे. रागाने तो वेडापिसा होत असे. त्याच्या वडिलांनी यावर एक उपाय शोधला, वडील बाजारात गेले आणि त्याच्यासाठी खिळे घेवून आले. मुलाने विचारले, "बाबा! हे खिळे कशासाठी?" वडिलांनी उत्तर दिले,"अरे ! तुला जेंव्हा कधी राग येईल तेंव्हा यातील एक खिळा घे आणि समोरच्या झाडावर ठोक". खिळे आणलेल्या पहिल्या दिवशी मुलाला खूप राग आला, त्याने एकूण ३० खिळे झाडाला ठोकले. असेच तो प्रत्येक वेळी करत गेला. पुढील काही आठवड्यात त्याला ते खिळे ठोकण्याचा कंटाळा आला व त्यामुळे त्याला क्रोधावर नियंत्रण करण्यात यश आले. आता तो झाडावर एखाददुसरा खिळाच ठोकत असे. त्याच्या हे लक्षात आले कि झाडाला खिळे ठोकण्याऐवजी क्रोधावर नियंत्रण करणे कधीही सोपे आहे.शेवटी एक दिवस तर असा उजाडला कि त्याने त्या पूर्ण दिवसात झाडाला एकही खिळा ठोकला नाही. जेंव्हा त्याने त्याच्या वडिलांना याबद्दल सांगितले तेंव्हा त्याचे वडिल म्हणाले," तू जसे ते खिळे ठोकले तसे ते सर्व खिळे झाडावरून काढून टाक" मुलाने खिळे काढायला सुरुवात केली तसे त्याच्या लक्षात आले कि खिळे मारणे सोपे आहे पण खिळे काढणे खूप अवघड काम आहे. त्याने खूप मेहनत घेवून ते खिळे काढले व ते दाखवण्यासाठी वडिलांना झाडापाशी घेवून आला. वडिलांनी झाडाकडे पाहत त्याला म्हणाले," तू काम तर चांगले केले. पण तुझ्या एक लक्षात आले कि नाही, बघ हे सुंदर झाड तुझ्या रागाने तू किती खराब करून टाकले आहेस. तू जेंव्हा जेंव्हा रागाला येत होता त्याचे वाईट परिणाम या बिचाऱ्या झाडाला भोगावे लागत होते. तसेच आपल्या वागण्याचेही तसेच असते असेच कि आपण जेंव्हा रागात येतो तेंव्हा आपल्या रागाचे दुष्परिणाम समोरच्याच्या मनावर होतात. शस्त्राने जेवढे घाव होणार नाहीत तेवढे जास्त वार रागाच्या भरात माणूस समोरच्यावर करतो. म्हणून रागापासून दूर राहणे हेच चांगले असते.
*तात्पर्य*:-
*"अति राग आणि भिक माग" हि मराठीतील म्हणच बरेचसे काही बोलून जाते. राग आवरणे हेच चांगले.*
📚📚📚📚📚📚📚📚📚
*संकलन* - *साई पाटील,* श्री कंप्युटर्स्, धर्माबाद.
========***********=======
🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏 पुन्हा भेटू उद्या
फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार
========***********=========
Comments
Post a Comment