फ्रेश मॉर्निंग बुलेटिन दिनांक 19 जानेवारी 2017

*🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर प्रस्तुत 📢*
📱 9423625769

1⃣  🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 1⃣ 
🕖 प्रसारण वेळ : रोज सकाळी 06:50 ते 07:00 am
----------------------------------------------------
http://fmbuleteen.blogspot.com
----------------------------------------------------
📅 दि. 19/01/2017 वार - गुरुवार 
========***********=========
        *📆 . . दिनविशेष . . 📆*
⌛१९९६ :- प्रसिद्ध मल्याळी लेखक एम.टी. वासुदेवन नायर यांची १९९५ च्या ज्ञानपीठ पुरस्कारासाठी निवड.
💥 जन्म :-
⌛ १८९२ : चिंतामण विनायक जोशी, विनोदी लेखक व पाली भाषेचे अभ्यासक.
💥 मृत्यू :-
⌛१९९० : आचार्य  रजनीश  भारतीय तत्त्वज्ञानी
*संकलक :- सौ. सुभद्रा सानप, बीड*
                 9403595764
========***********=========
*आजच्या ठळक बातम्या*
1⃣
2⃣ गुन्हेगारी पार्श्‍वभूमीच्या उमेदवारांची यादी राज्यातील सर्व मतदान केंद्राच्या बाहेर लावणार राज निवडणूक आयुक्त जे.एस.सहारिया यांची माहिती.
3⃣ मुंबई येथील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान तर्फे घेण्यात आलेल्या सुवर्णगाथा -50 राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेत नांदेडच्या एमजीएम अभियांत्रिकी महाविद्यालयाचा विद्यार्थी किरण देशमुख ठरला उपविजेता
4⃣ मोठ्या प्रमाणात होत असलेल्या बर्फवृष्टीमुळे जम्मू-काश्मीरमधील दैनंदिन जीवन विस्कळीत
5⃣  बेकायदेशीररित्या शस्त्रं बाळगल्याप्रकरणी जोधपूर न्यायालयाने अभिनेता सलमान खानची केली सुटका.
6⃣ ऑस्ट्रेलिया ओपन स्पर्धेच्या महिला दुहेरीच्या पहिल्या फेरीत सानिया मिर्झा 6-3, 6-1 ने विजयी
7⃣ आज कटक येथे भारत विरुद्ध इंग्लैंड यांच्यात दूसरा एकदिवसीय सामना, येथे ही पडणार धावांचा पाऊस, 
*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*
📱 9960358300
========***********=========
*🌷 फ्रेश सुविचार 🌷*
" दुसऱ्यासाठी डोळ्यात उभे राहलेले अश्रू हे मनुष्याच्या आत्मविकासाच्या वेलीवरील फुललेली फुलेच होत."

*संकलक :- सुनील रेगुलवाड, उमरी*
                  8007084419
========***********=========
*आजचा मराठी शब्द*
             *बर्फवृष्टी*

*संकलक :- जगन्नाथ दिंडे, मुखेड*
                  8668453639
========***********=========
*🎂 आजचा वाढदिवस* 
👤 शिवशंकर स्वामी
👤 अजय पेरगेवार उमरेकर

*संकलक :- नासा येवतीकर, धर्माबाद*
                  9423625769
[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा वरील क्रमांकावर पाठवू शकता. ]
========***********=========
*आजची @@ गुगली @@*

"एकाची चिंच
एकाचा आंबा "

एकाची चिंच तर
एकाचा आंबा आहे
कोणाची सुरूवात
कोणाचा थांबा आहे

कोणाची चिंच कोणाचा
आंबा असु शकतं
सख्या भावांच एक
मत कधीच नसु शकतं

    शरद ठाकर
सेलू जि परभणी
8275336675
========***********=========
*आजचा*
🌀 ~ ⚡  *॥ विचार धन ॥* ⚡ ~ 🌀

*अनेक वेळा जावा-जावा, भाऊ-भाऊ, सासू-सुना, मित्र-मैत्रिणी अशा मानवी नातेसंबंधात रूसण्यामुळे घरं दुभंगली आहेत. रूसण्याच्या वर्तुळाचा विचार केला तर छोट्या छोट्या गोष्टीत रूसवे-फुगवे होतात. ज्यांच्यात भांडायची ताकद नसते ते रडत बसतात, दु:खी होतात. बिनबुडाची भांडणं असतात. दुस-याचा रूसवा-फुगवा किती ताणायचा यालाही काही मर्यादा असतात.*

*रूसव्यातला फोलपणा कळला तर राग राहात नाही. आपणही निवळत गेले पाहिजे. रूसवे-फुगवे प्रत्येक नात्यात असतात, म्हणून काय संबंध बिघडावयचे का? सहजगत्या रूसवा निघाला तर ठिक नाहीतर प्रत्येकाचे रस्ते वेगवेगळे असतात. आपण चालत राहायचे. अनाथ असलेला मुलगाही 'नारायण सुर्वे' होऊ शकतो.*

*"कुणावाचून कुणाचे अडत नाही.*
*आपल्या रस्त्याने हसत पुढे निघायचे."*
     
        🍂 *॥ रामकृष्णहरी ॥* 🍂
         🍂🍂🍂🍂🍂🍂
    *--संजय नलावडे, चांदिवली, मुंबई*
               *9167937040*
========***********=========
*आज*
🎯 विचारवेध...........✍🏻
--------------------------
ज्यांच्या जीवनात आळस,
निरुत्साह,काही न करण्याची अपेक्षा,वेळ गमावणे,आपल्याला काय करायचे आपला काय संबंध ई.गुण रोमारोमात भिणलेले आहेत. अशी माणसे स्वतःच्या जीवनात कधीही यशस्वी होऊ शकत नाहीत.त्यांना इतर जगाशी काहीही देणघेणे नसते.ते स्वतःही काही करु शकत नाहीत आणि इतरांनाही काही करु देत नाहीत. अशा व्यक्तीच्या सहवासात किंवा संपर्कात कधीही राहू नये.ज्यामुळे आपल्या चालत असलेल्या चांगल्या कामात व्यत्यय निर्माण आणू शकतात.
सक्रीय असलेल्या माणसांना निष्क्रिय बनवतात.

- व्यंकटेश काटकर,नांदेड
  संवाद.9421839590.

💠⭐💠⭐💠⭐💠⭐💠⭐💠⭐💠⭐
========***********=======
🎺🎷🎺🎷🎺🎷🎺🎷🎺🎷
~~~~~~~~~~~~~~~~~~~
        *मैफ़िल-ए-इक्बाल*

                *मराठी*

फक्त हा विश्वास बाळग ठाम मित्रा
रात्रकाळी संपल्यावर सूर्य दिसतो

                   *उर्दु*

छुते ही उसके तिलमिलाकर ये चीखने लगा चरखा
क़ातिल के हाथ में अहिंसा की डोर अच्छी नहीं लगती

- *डॉ शेख इक्बाल मिन्ने*
     ७०४०७९११३७
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*आजची बोधकथा*
            🔵 *बोधकथा*🔵
   💠अपमान आणि उपकार 💠
       ••◆•◆•◆★◆•◆•◆••
     एकदा *दोन मित्र* वाळवंटातून चाललेले असतात, रस्त्यात त्यांच्यात काहीतरी *बाचाबाची* होते आणि बाचाबाचीचे रुपांतर *भांडणात* होते. इतके कडाक्याचे भांडण होते कि *एक मित्र दुसऱ्या मित्राच्या थोबाडीत ठेवून देतो*. ज्याला थोबाडीत बसते तो दुसरा मित्र खूप दुःखी होतो, गप्प बसतो आणि वाळूमध्ये बोटाने लिहितो, *"आज माझ्या प्राणप्रिय मित्राने मला थोबाडीत दिली, ज्याला मी जीवापाड मैत्री करतो त्याने मला आज मारले"*. ज्याने थोबाडीत मारलेली असते तो हे पाहतो पण काहीच न बोलता दोघेही पुढे चालत राहतात. पुढे गेल्यावर त्यांना एक तलाव दिसतो, दोघेहीजण पाण्यात उतरून स्नान करायचे ठरवतात, अंघोळ करता करता थोबाडीत खाल्लेला मित्र अचानक पाण्यात घसरतो, तिथे नेमकी दलदल असते, तो जोरजोराने ओरडायला सुरुवात करतो. ज्याने थोबाडीत मारलेली असते तो मित्र क्षणाचाही विचार न करता आपल्या मित्राच्या सहाय्याला धावतो आणि त्याला त्या दलदलीतून बाहेर ओढून काढतो. जेंव्हा तो बुडणारा मित्र पाण्याबाहेर येतो, अंग कोरडे करतो तेंव्हा तो एका दगडाने दगडावर कोरून लिहितो, *"आज माझ्या प्राणप्रिय मित्राने मला मरणाच्या दारातून ओढून परत आणले, मी आज मेलोच असतो पण त्याने स्वतःचा जीव धोक्यात घालून मला वाचविले"*. हे पण तो थोबाडीत देणारा वाचतो आणि त्याला राहवत नाही तो त्या मित्राला विचारतो कि, *"पहिले मी तुला मारले तर ते तू वाळूत लिहिले आणि आता तुला पाण्यातून वाचविले तर ते तू दगडावर कोरून लिहिले हे असे का?"* लिहिणारा मित्र म्हणाला, *"जेंव्हा कोणी आपल्या हृदयाला,मनाला,भावनेला ठेच लावेल तेंव्हा ते सर्व काही वाळूत लिहावे कारण काही काळानंतर वाळू हि विस्कळीत होवून जाते आणि मनातील भावनाही फार काळ एकसारख्या राहत नाहीत*. पण जर कुणी *उपकार* केले तर ते मात्र *दगडावर कोरून लिहिले कारण दगडावर कोरलेले जसे कायमस्वरूपी टिकून राहते तसे उपकार हे कायम लक्षात ठेवले जावेत*.

    *_🌀तात्पर्य_ ::~* "माणसाने अपमान तत्काळ विसरून जावा आणि उपकार आजन्म लक्षात ठेवावे".

*संकलन-* *साई पाटील*, श्री कंप्युटर्स्, धर्माबाद.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
========***********=======
🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏 पुन्हा भेटू उद्या
फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार 
========***********=========

Comments