फ्रेश मॉर्निंग बुलेटिन दिनांक 22 जानेवारी 2017

*🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर प्रस्तुत 📢*
📱 9423625769

1⃣  🎤  *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 1⃣ 
🕖 प्रसारण वेळ : रोज सकाळी 06:50 ते 07:00 am
----------------------------------------------------
http://fmbuleteen.blogspot.com
----------------------------------------------------
📅 दि. 22/01/2017 वार - रविवार 
========***********=========
        *📆 . . *दिनविशेष . . 📆*
⌛१९६३: अंध लोकांच्या सोयीसाठी डेहराडून येथे राष्ट्रीय ग्रंथालय सुरु झाले.
💥मृत्यू :-
⌛१९७२: स्वातंत्र्यचळवळीचे नेते स्वामी रामानंद तीर्थ.

*संकलक :- सौ. सुभद्रा सानप, बीड*
                 9403595764
========***********=========
*आजच्या ठळक बातम्या*
1⃣  राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचं अभिनंदन करत भारतात येण्याचं दिलं आमंत्रण
2⃣  अमेरिकेला पुन्हा एकदा शक्तिशाली, महान बनवण्यासाठी प्रयत्न करण्यास प्राधान्य असेल अमेरिका राष्ट्राध्यक्ष ट्रम्प
3⃣ दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी जाहीर सभेत मतदारांना पैसे घ्या, असे वक्तव्य केल्याप्रकरणी निवडणूक आयोगाने त्यांना चांगलेच फटकारले आहे.  'आचार संहितेचे उल्लंघन करणं सुरूच ठेवले तर आम आदमी पार्टीविरोधात कडक कारवाई करण्यात येईल, या कारवाईत पार्टीची मान्यताही रद्द करण्यात येईल', असा इशारा निवडणूक आयोगाने दिला आहे. 
4⃣  जवान चंदू चव्हाण यांना भारतीय अधिका-यांच्या ताब्यात देण्यात आले. सप्टेंबर 2016 मध्ये नजरचुकीने पोहोचले होते पाकिस्तानच्या हद्दीत
5⃣ आगामी महापालिका निवडणुकांच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी निवडणूक आयुक्त जे एस सहारियांनी घेतली पत्रकार परिषद. पैसे, दारू वाटपावर विशेष लक्ष दिले जाईल, यासाठी मोठ्या प्रमाणात पेटृोलिंग केले जाईल.
6⃣ पांढऱ्या मोहऱ्यांनी खेळताना भारताचा ग्रँडमास्टर अधिबन याने वेस्ली सो बरोबरीत रोखले. 
7⃣ जागतिक क्रमवारीतील माजी नंबर वन बॅडमिंटनपटू सायना नेहवालने मोसमाच्या सुरुवातीला मलेशिया मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेत महिला एकेरीत जेतेपद पटकावण्याच्या दिशेने वाटचाल

*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*
📱 9960358300
========***********=========
*🌷 फ्रेश सुविचार 🌷*
" वाचनाने मनुष्याला आकार येतो, सभेमुळे तो प्रसंगावधानी, तत्पर होतो आणि लिखाणामुळे तो सर्वांगिण होतो."

*संकलक :- सुनील रेगुलवाड, उमरी*
                  8007084419
========***********=========
*आजचा मराठी शब्द*
             *तत्पर*

*संकलक :- जगन्नाथ दिंडे, मुखेड*
                  8668453639
========***********=========
*🎂 आजचा वाढदिवस* 
👤 स्वप्निल इबितवार, येवती
👤 हरीश बलकेवाड, येवती

*संकलक :- नासा येवतीकर, धर्माबाद*
                  9423625769
[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा वरील क्रमांकावर पाठवू शकता. ]
========***********=========
*आजची @@ गुगली @@*

     "सजा "

जोडणारा पेक्षा ईथे
तोडणारेच जास्त आहेत
तोडणाराला वाटते
आपले विचार रास्त आहेत

तोड फोड करून
पहात बसतात मजा
भोगावी लागते शेवटी
ज्याची त्याला सजा

   शरद ठाकर
सेलू जि परभणी
8275336675
========***********=========
*आजचा*
🌻 🌻 *॥ विचार धन॥* 🌻 🌻

*प्रेम, मैत्री, माया, ममता, वात्सल्य, आवड, आपुलकी, ओढ ही सर्व 'प्रीती' ची विविध रूपे आहेत. पण खरी प्रीती शुद्ध, वासनारहित असते. ती केवळ नि:स्वार्थीच नाही पण स्वार्थत्याग करणारी असते. तिच्यात बारीक अक्षरात लिहीलेल्या अदृश्य अटी नसतात. प्रीती सहनशील आहे, उपकारशील आहे, प्रीती हेवा करीत नाही, बढाई करीत नाही, प्रीती स्वहित पहात नाही, चिडत नाही. जरी आपल्या जीवनात आपण पुष्कळ चांगल्या व मोठ्या गोष्टी करीत असलो, तरी अनेकदा त्याच्यांमागे आपला स्वार्थ असतो, म्हणून आपले आयुष्य 'सुखकारक' होत नाही.*

*जे आपल्यावर प्रीती करतात त्यांच्यावरच आपण प्रीती करायची, असे नाही. तर सर्वांवर, म्हणजे आपल्या शेजा-यांवर, जे आपला द्वेष करतात त्यांच्यावर, आपल्या वै-यांवरदेखील, प्रीती करायला आपण शिकले पाहिजे. नाही तर, आम्हाला देवाच्या प्रीतीची, दयेची आणि तारणाची अपेक्षा करायचा काय हक्क आहे ?*
    
     ~~ 🌲 *॥ रामकृष्णहरी ॥*🌲~~
             🔰🔰🔰🔰🔰🔰
     *--संजय नलावडे, चांदिवली, मुंबई*
========***********=========
*आज*
🎯 विचारवेध..........✍🏻
〰〰〰〰〰〰〰

ज्यांच्याकडे शील,चारित्र्य आणि विचार चांगले आहेत त्यांच्याकडे समाज आदर्शाचे संस्कार केंद्र म्हणून पाहतो.अशीच व्यक्ती समाजप्रिय म्हणून ओळखली जाते.

- व्यंकटेश काटकर,नांदेड
  संवाद.9421839590

🌹⭐🌹⭐🌹⭐🌹
========***********=======
*आजची बोधकथा*

*करढोक व मासे*-

करढोक नावाचा एक पक्षी नदीकाठी राहून व पाण्यात बुड्या मारून मासे धरून खातो. या जातीचा एक पक्षी म्हातारा झाल्याने त्याला पाण्यातले मासे दिसेनासे झाले. त्यामुळे काहीतरी ढोंग करून आपला चरितार्थ चालवण्याचा त्याने विचार केला, 'तो ज्या कालव्याजवळ बसला होता, त्यातला एक मासा पाण्याच्या पृष्ठभागावर आला असता, तो म्हातारा करढोक त्याला म्हणाला, 'अरे, तुला तुझ्या स्वतःच्या नि तुझ्या भाऊबंदांच्या जिवाबद्दल जर थोडी-बहुत काळजी वाटत असती तर कालव्याचा मालक एकदोन दिवसात कालव्यातलं सगळं पाणी बाहेर सोडणार आहे, याकरता तुम्ही आपले जीव वाचविण्यासाठी काहीतरी उपाय करा.' हे ऐकून तो मासा पाण्याच्या तळाशी गेला आणि सगळ्या माशांची सभा भरवून तो करढोकाचा निरोप त्याने सांगितला. तो ऐकताच आपल्यावर येणार्‍या संकटाची सूचना देणार्‍या त्या करढोकाचे आभार मानण्याचा व या संकटातून मुक्त होण्यासाठी उपाय सुचविण्याविषयी त्याला विनंती करण्याचा ठराव त्यांनी केला व तो त्या करढोकास कळविण्याचे काम त्या निरोप घेऊन येणार्‍या माशावर सोपविले. त्याप्रमाणे त्याने करढोकास जाऊन आपला ठराव त्याला कळविला. तो ऐकताच करढोक त्याला म्हणाला, 'या संकटातून वाचण्याचा एकच मार्ग आहे. तुम्ही सर्वांनी पाण्याच्या पृष्ठभागावर यावं म्हणजे मी तुम्हाला माझ्या घराशेजारच्या तलावात नेऊन पोहचवीन. ती गोष्ट माशांनी कबूल केली. मग करढोकाने त्यांना एका उथळ पाण्याच्या तलावात नेऊन सोडले व थोड्याच दिवसात त्या सर्वांना गट्ट केले.
*तात्पर्य*-शत्रूच्या गोड शब्दावर विश्वास ठेवून त्याच्या जाळ्यात सापडणे हा मूर्खपणा होय.
──┅━━═▣🔻▣═━━┅──
📘संकलन📘
✏ *साई पाटील*, श्री कॉम्प्युटर्स, धर्माबाद.
========***********=======
🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏 पुन्हा भेटू उद्या
फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार 
========***********=========

Comments