*🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢*
📱 9423625769
1⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 1⃣
🕖 प्रसारण वेळ : रोज सकाळी 06:50 ते 07:00 am
----------------------------------------------------
http://fmbuleteen.blogspot.com
----------------------------------------------------
📅 दि. 24/01/2017 वार - मंगळवार
========***********=========
*📆 . . *दिनविशेष . . 📆*
*शिक्षक दिन २४ ते २६ जानेवारी*
⌛१९५०: ‘जन गण मन’ या गीताला राष्ट्रगीत म्हणून मान्यता.
⌛१९९६: मुंबई मिस इंडिया सौंदर्य स्पर्धेला प्रारंभ.
💥मृत्यू
⌛१९६६: अणुशास्त्रज्ञ डॉ. होमी भाभांचे विमान अपघातात निधन झाले.
*संकलक :- सौ. सुभद्रा सानप, बीड*
9403595764
========***********=========
*आजच्या ठळक बातम्या*
1⃣ हातात बंदूक नसली तरी सामना हे आपलं शस्त्र उद्धव ठाकरे यांचे प्रतिपादन
2⃣ दक्षिण भारतात जाणा-या सर्व रेल्वे गाड्या वेळेनुसार आणि ठरलेल्या मार्गावरुन धावणार असल्याची माहिती दक्षिण रेल्वेकडून देण्यात आली
3⃣ तीन अपत्य असलेल्यांना निवडणूक लढण्यास बंदी करणाऱ्या कायद्याला आव्हान, हायकोर्टाची शासनाला नोटिस
4⃣ सिंधुदुर्ग जिल्ह्यात बांदा येथे आज माकडतापाचे आणखी २ रुग्ण आढळले, रुग्णांची संख्या पोहचली ५ वर, ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण
5⃣ तामिळनाडू विधानसभेत जलिकट्टू विधेयकाला मंजूरी
6⃣ केंद्र सरकारने संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर येत्या 30 जानेवारीला बोलविली सर्व पक्षीय बैठक
7⃣ भारत आणि इंग्लंड संघांमधले 26 जानेवारी पासून होणाऱ्या तीन टी-20 मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा, आर. अश्विन आणि जडेजाला देण्यात आली विश्रांती
*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*
📱 9960358300
========***********=========
*🌷 फ्रेश सुविचार 🌷*
" फसवणुक करून कोणतेही मोठे काम होत नसते. प्रेम, सत्यनिष्ठा व प्रचंड उत्साह यांच्याद्वारेच महान कार्ये होत असतात. म्हणुन आपले पौरूष प्रकट करा."
_______ स्वामी विवेकानंद
*संकलक :- सुनील रेगुलवाड, उमरी*
8007084419
========***********=========
*आजचा मराठी शब्द*
*उत्साह*
*संकलक :- जगन्नाथ दिंडे, मुखेड*
8668453639
========***********=========
*🎂 आजचा वाढदिवस*
👤रोहित रोहिदास होले, दोंड पुणे
*संकलक :- नासा येवतीकर, धर्माबाद*
9423625769
[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा वरील क्रमांकावर पाठवू शकता. ]
========***********=========
*आजची @@ गुगली @@
"टोलवा टोलवी"
बोलून विचार करण्यापेक्षा
विचार करून बोलावं
जोशा मध्ये कशाला
उगी काहीही टोलावं
टोलवा टोलवी करून
शब्दांची जाते धार
मग भल्या भल्यांना
बसावं लागतं गार
शरद ठाकर
सेलू जि परभणी
8275336675
========***********=========
*आजचा*
~~~~🔶 *॥ विचार धन ॥* 🔶~~~~
*प्राचीन संतकवींपासून आधुनिक काळातील वैचारिकांपर्यंत सगुण-निर्गुण रूपाची चर्चा सर्वांनीच केली आहे. परमेश्वराचं सगुण रूप म्हणजे मुर्ती. पंढरपूरच्या विठ्ठलाची उपासना वर्षानुवर्षे वारकरी भक्तीभावाने करीत आहेत. रामनवमीला मंदिरात रामनामाचा जयघोष आकाश दुमवून टाकणारा असतो. श्रीकृष्ण तर कितीतरी स्वरूपात कृष्णभक्तांना भेटत असतो. कधी तो राधा-कृष्ण, कधी देवकीसुत कृष्ण, कधी तो द्रौपदीचा बंधुसखा असतो, तर कधी तो अर्जुनाचा सारथी. श्रीकृष्णाची ही सारी सगुण रूपे भक्तांना त्या त्या स्वरूपात साद घालीत असतात; पण मुळ कृष्ण असा आहे का ? तो निर्गुण निराकारच आहे.*
*ख-या साधकानं आणि भक्तानं परमेश्वराचं हे सगुण-निर्गुण रूप समजावून घेतले पाहिजे. काही तत्वज्ञानी साधक परमेश्वराच्या सगुण स्वरूपाला मानणारे नसतात. मूर्तिपूजेला त्यांचा विरोध असतो. तो विरोध त्यांच्यापुरता ठीक आहे. पण निर्गुण भक्ती करणा-यांनी सगुण भक्ती करणा-यांना कमी लेखू नये. परमेश्वराला कोणत्या स्वरूपात पाहायचं, याचं स्वातंत्र्य भक्ताला आहे. भक्ती सगुण रूपातील असो वा निर्गुण, त्यातील भाव महत्वाचे आहेत.*
~~🔷 *॥ रामकृष्णहरी ॥* 🔷~~
🔶🔶🔶🔶🔶🔶
*--संजय नलावडे, चांदिवली, मुंबई*
*9167937040*
========***********=========
*आज*
🎯 वि चा र वे ध......✍🏻
〰〰〰〰〰〰〰〰
वाळवंटातून पुढे पुढे चालत असताना मागचे पाऊल लवकर उचलून पुढे टाकता येत नाही, कारण रेतीमध्ये पाय फसल्या जातो.पण आशा असते पुढे चालण्याची. त्यासाठी प्रयत्न करतो आणि पावले टाकतो.पण जेव्हा मागे वळून पाहतो तेव्हा मागे पडलेल्या पावलांच्या खुणा मिटलेल्या असतात.
जीवनाचेही तसेच असते.
सुखाचा जेव्हा शोध घेतो तेव्हा मागे झालेल्या दुःखाला येणा-या सुखासाठी विसरावेच लागते.नाही तर दुःखाला घेऊन चाललो तर सुखाचा प्रवासही होणार नाही आणि आनंदही मिळणार नाही.
- व्यंकटेश काटकर,नांदेड
संवाद.9421839590
💠🌹💠🌹💠🌹💠🌹
========***********=======
*आजची बोधकथा*
*मन माणसाचे अन डोके...*
एका माणसाला काही कामानिमित्त आपल्या गावातून शहराकडे जायचे होते. तो बेरोजगार होता व गावात त्याला काही काम उपलब्ध नव्हते. त्यामुळे त्याने शहरात जाऊन काम करण्याचे ठरवले होते. जवळ पैसे नसल्याने गावापासून शहरापर्यंतचा प्रवास तो पायीच करणार होता. त्याला ज्या रस्त्याने जायचे होते तो रस्ता जंगलातून जाणारा होता. त्यामुळे त्याला जंगली श्वापदांची भीती वाटत होती. परंतु दुसरा काही मार्ग नसल्याने त्याने धाडस करून जंगलात प्रवेश केला. काही अंतर गेल्यावर त्याला झाडावर एक माकड दिसले. त्याला पाहताच माकडाने झाडावरून त्याच्या पुढ्यात उडी मारली. परंतु माकडाने त्याला काही इजा केली नाही. उलट त्याने माणसाला त्याच्याबाबत माहिती विचारली. त्यावर माणसाने बरीच मोठी पाल्हाळीक कथा त्याला ऐकवली. ती ऐकल्यावर माकडाने त्याला पूर्ण मदत करण्याचे आश्वासन दिले. पण त्यासाठी त्याला एक अटही घातली, तू मला क्षणभरही कामाशिवाय मोकळे सोडायचे नाही. नाही तर मी तुला मारून टाकीन. माणसाने त्या माकडाची अट मान्य केली. माकड त्या दिवसापासून माणसाची सर्व कामे करू लागले. माणसाची सर्व कामे करून माकड त्याच्यासोबत चांगलेच रुळले. परंतु माणसाच्या मनात मात्र, सुरुवातीला हा आपल्याला मारणार तर नाही ना? अशी धास्ती वाटत होती. पण नंतर त्याला एक युक्ती सुचली. माकडसाठी जेव्हा काहीच काम नसे तेव्हा माणूस एक शिडी लावून त्यावर माकडाला चढ - उतार करण्यास सांगत असे. हळूहळू माकडाला त्याची सवय झाली. माणसाचीघ सर्व कामे ते करू लागले.
*_तात्पर्य_ ::~*
माकड हे मानवी मेंदूचे प्रतिक आहे. आपण मेंदूला सदैव विविध कार्यात गुंतवून ठेवले पाहिजे. तरच ते सदैव रचनात्मक विचांरानी प्रेरित होऊन सकारात्मक योगदान देत राहिल. परंतू त्याला काही काम नसेल तर ,ते नकारात्मक विचार करू लागेल,हिंसक होईल, भरकटेल. त्यामूळेच म्हटले जाते की,रिकामा मेंदू हा सैतानाचे घर असते.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
•●◎◑◎✹★✹🔅✹★✹◎◑◎●•
*✍संकलन ✍*
*साई पाटील*,
श्री कॉम्प्युटर्स, धर्माबाद.
========***********=======
🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏 पुन्हा भेटू उद्या
फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार
========***********=========
Comments
Post a Comment