✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट
1⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 1⃣
🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00
*🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢*
📱 9423625769
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
http://fmbuleteen.blogspot.com
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
📅 दि. 12/03/2017 वार - वार
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
📆 . . *दिनविशेष . . 📆*
*होलिकोत्सव*
⌛१९३० : ब्रिटीश सरकारने भारतात तयार केलेल्या मीठावर लादलेल्या कराविरुद्ध महात्मा गांधींनी दांडी यात्रा सुरू केली.
💥 जन्म :-
⌛१९१३ : यशवंतराव चव्हाण.
💥 मृत्यू :-
⌛१९८० : सुप्रसिध्द तबलावादक वसंतराव आचरेकर.
*संकलक :- सौ. सुभद्रा सानप, बीड*
9403595764
----------------------------------------------------
*आजच्या ठळक बातम्या*
1⃣ उत्तर प्रदेशमधील भाजपचा हा ऐतिहासिक विजय म्हणजे विकास आणि सुशासनाचा विजय पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ट्विटरवरून मतदारांचे मानले आभार
2⃣ हिमाचल प्रदेशात धर्मशाळा आणि शिमल्यामध्ये बर्फवृष्टी
3⃣ म्हैसाळ भ्रूणहत्या प्रकरणाचा तपास आता उपअधीक्षक दीपाली काळे करणार पंकजा मुंडे यांची माहिती
4⃣ उत्तर प्रदेशमध्ये व्होटिंग मशीन मॅनेज करण्यात आल्या मायावतींचा गंभीर आरोप
5⃣ उत्तराखंडातही भाजपलाच मतदारांनी दिली पहिली पसंती
6⃣ आयपीएलमध्ये कामगिरीत नेहमी पिछाडीवर राहणाऱ्या किंग्ज इलेव्हन पंजाबने यंदा आघाडीवर राहण्याचा निर्धार केला असून, आॅस्टे्रलियाचा धडाकेबाज अष्टपैलू ग्लेन मॅक्सवेल याच्याकडे संघाची धुरा सोपविण्यात आली आ
7⃣ सलामीवीर उपुल थरंगाच्या शतकी खेळीच्या जोरावर श्रीलंकेने पहिल्या कसोटी सामन्यात शुक्रवारी बांगलादेशपुढे ठेवले ४५७ धावांचे लक्ष्य
•••••••••••••••••••••••••••••••••••••••••••
*विशेष बातमी :-
संगमेश्वर तालुक्यातील कडवई येथे शिमगोत्सव वैशिष्ट्यपूर्णरित्या साजरा होतो. या गावात शिमगोत्सवात उभा केला जाणारा होळीचा माड हा कोणत्याही आधाराशिवाय केवळ उपस्थित असणारे गावकरी आपल्या हातातील काठ्यांच्या आधारे उभा करतात. हे पाहण्यासाठी परिसरातील हजारो ग्रामस्थ येथे गर्दी करतात.
•••••••••••••••••••••••••••••••••••••••••••
*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*
📱 9960358300
----------------------------------------------------
*🌷 फ्रेश सुविचार 🌷*
*प्रेरणा व जिद्द ह्या अशा गोष्टी आहेत. त्या जर मनात घेतल्या तर...*
*झोपलेल्यांना जागे करतात, जागे असणाऱ्याला चालण्यास प्रवृत्त करतात, चालणाऱ्याला पळायला लावतात आणि पळणार्याला ध्येय गाठायला लावतात.*
*संकलक :- सुनील रेगुलवाड, उमरी*
8007084419
----------------------------------------------------
*आजचा मराठी शब्द*
*प्रेरणा*
*संकलक :- जगन्नाथ दिंडे, मुखेड*
8668453639
----------------------------------------------------
*🎂 आजचा वाढदिवस*
👤 शिवराम पेंडकर, येवती
[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा वरील क्रमांकावर पाठवू शकता. ]
*संकलक :- नासा येवतीकर, धर्माबाद*
9423625769
----------------------------------------------------
*आजची @@ गुगली @@*
*" होळी "*
विचारशील मानवाने
वाईटाला जाळलं पाहिजे
अवैज्ञानिक आहे ते सर्व
विचारपूर्वक टाळलं पाहिजे
चला जे अवैज्ञानिक
त्याला आपण टाळू
निसर्गासाठी काही
आपण नियम पाळू
शरद ठाकर
सेलू जि परभणी
8275336675
*होलीकोत्सवाच्या शुभेच्छा* ----------------------------------------------------
*🔔 🔔 जाहिरात 🔔 🔔*
नासा येवतीकर, स्तंभलेखक लिखित
*" प्रामाणिक वसंता "* लघूकथा वाचा प्रतिलिपीच्या खालील लिंकवर
http://marathi.pratilipi.com/na-sa-yevtikar/pramanik-vasanta
कथा आवडल्यास star द्यायला विसरु नका
----------------------------------------------------
*आजचा*
🌷~🔱 *॥ विचार धन ॥* 🔱~🌷
*'दिव्यांना' भारतीय संस्कृतीत खूप महत्व असल्यामुळे अनेक मंगल कार्याच्यावेळी त्यांची पूजाही केली जाते. आमावस्येला घरातले सर्व दिवे घासून पुसून त्यांना हळद कुंकू वाहिलं जातं. घरभर दिवे लावले जातात. घराचा प्रत्येक कोपरा प्रकाशमान होऊन दारिद्ररूपी, अज्ञानरूपी अंधार दूर होऊन घरात सुखसमृद्धी नांदावी, अशी या पाठीमागे भावना असते.*
*कोणताही सण-समारंभ असो वा जन्म किंवा मृत्यूचा प्रसंग, दिव्याचं आपल्याशी घट्ट नातं जडलेलं आहे. धर्म, जात कोणतीही असो, दिवा ज्योतीच्या रूपाने असेल किंवा मेणबत्तीच्या रूपाने, तो पुजनीय मानला जातो.*
*दिव्यांचे जवळजवळ 250 प्रकार आहेत. दिवे लावताना या दिव्यांचा दैदिप्यमान इतिहास खचितच कोणाला माहित असेल. तो समजून घेऊन जपला तर हा तेजाचा, प्रकाशाचा प्रवास एका पिढीकडून दुस-या पिढीकडे जाण्यास आपलाही हातभार लागेल.*
🎄 *॥ रामकृष्णहरी ॥*🎄
💡💡💡💡💡💡
*--संजय नलावडे, चांदिवली, मुंबई*
9167937040
----------------------------------------------------
*आज*
*🎯 वि चा र वे ध.....✍🏻*
===================
ज्याप्रमाणे सुगंधी फुले आपल्या सुगंधाने इतरांच्या मनाला आपल्याकडे आकर्षित करून मोहीत करतात.त्याप्रमाणे सज्जन माणसेदेखील आपल्या सद्विचाराने आपल्याकडे आकर्षित करून आपल्या सानिध्यात असलेल्या इतरांच्या जीवनाचा कायापालट करतात.
सज्जनांच्या सहवासात राहिले तर आपलेही जीवन सन्मार्गी लागेल व आपल्या जीवनाला एक चांगली नवी दिशा मिळेल.
ज्यामुळे आपली प्रगती होऊ शकेल.
- व्यंकटेश काटकर, नांदेड.
संवाद.9421839590/
8087917063
🍃🌹🍃🌹🍃🌹🍃🌹🍃🌹
----------------------------------------------------
*वपुर्झा*
एका माणसाच्या समस्येवर दुसर्या माणसाजवळ उत्तरच नसतं. कारण सल्ला देणारा त्या समस्येपर्यंत पोचू शकत नाही. तो स्व:तच्या वैचारिक पातळीप्रमाणे त्या समस्येकडे पाहतो. समस्येतून जाणार्या माणसाच्या भूमिकेत तो जाऊ शकत नाही.
~ वपु काळे | महोत्सव
*संकलन :- संजय माचेवार, वसमत*
9975704211
----------------------------------------------------
*आजची बोधकथा*
*अपमान आणि उपकार*
एकदा दोन मित्र वाळवंटातून चाललेले असतात, रस्त्यात त्यांच्यात काहीतरी बाचाबाची होते आणि बाचाबाचीचे रुपांतर भांडणात होते. इतके कडाक्याचे भांडण होते कि एक मित्र दुसऱ्या मित्राच्या थोबाडीत ठेवून देतो. ज्याला थोबाडीत बसते तो दुसरा मित्र खूप दुःखी होतो, गप्प बसतो आणि वाळूमध्ये बोटाने लिहितो," आज माझ्या प्राणप्रिय मित्राने मला थोबाडीत दिली, ज्याला मी जीवापाड मैत्री करतो त्याने मला आज मारले." ज्याने थोबाडीत मारलेली असते तो हे पाहतो पण काहीच न बोलता दोघेही पुढे चालत राहतात. पुढे गेल्यावर त्यांना एक तलाव दिसतो, दोघेहीजण पाण्यात उतरून स्नान करायचे ठरवतात, अंघोळ करता करता थोबाडीत खाल्लेला मित्र अचानक पाण्यात घसरतो, तिथे नेमकी दलदल असते, तो जोरजोराने ओरडायला सुरुवात करतो. ज्याने थोबाडीत मारलेली असते तो मित्र क्षणाचाही विचार न करता आपल्या मित्राच्या सहाय्याला धावतो आणि त्याला त्या दलदलीतून बाहेर ओढून काढतो. जेंव्हा तो बुडणारा मित्र पाण्याबाहेर येतो, अंग कोरडे करतो तेंव्हा तो एका दगडाने दगडावर कोरून लिहितो,"आज माझ्या प्राणप्रिय मित्राने मला मरणाच्या दारातून ओढून परत आणले, मी आज मेलोच असतो पण त्याने स्वतःचा जीव धोक्यात घालून मला वाचविले." हे पण तो थोबाडीत देणारा वाचतो आणि त्याला राहवत नाही तो त्या मित्राला विचारतो कि,"पहिले मी तुला मारले तर ते तू वाळूत लिहिले आणि आता तुला पाण्यातून वाचविले तर ते तू दगडावर कोरून लिहिले हे असे का?" लिहिणारा मित्र म्हणाला," जेंव्हा कोणी आपल्या हृदयाला,मनाला,भावनेला ठेच लावेल तेंव्हा ते सर्व काही वाळूत लिहावे कारण काही काळानंतर वाळू हि विस्कळीत होवून जाते आणि मनातील भावनाही फार काळ एकसारख्या राहत नाहीत. पण जर कुणी उपकार केले तर ते मात्र दगडावर कोरून लिहिले कारण दगडावर कोरलेले जसे कायमस्वरूपी टिकून राहते तसे उपकार हे कायम लक्षात ठेवले जावेत.
*तात्पर्य*
"माणसाने अपमान तात्काळ विसरून जावे आणि उपकार आजन्म लक्षात ठेवावे."
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
•●◎◑◎✹★✹✹★✹◎◑◎●•
*✍संकलन ✍ साई पाटील*,
*श्री कंप्युटर्स & मल्टीसर्व्हिसेस,*
धर्माबाद.
*9860937702, 9922702789*
──┅━━═▣▣═━━┅──
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏 पुन्हा भेटू उद्या
फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
Comments
Post a Comment