✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट
1⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 1⃣
🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00
*🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢*
📱 9423625769
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
http://fmbuleteen.blogspot.com
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
📅 दि. 14/03/2017 वार - मंगळवार
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
📆 . . *दिनविशेष . . 📆*
⌛१९३१ : पहिला भारतीय बोलपट ‘आलमआरा’ नॉव्हेल्टी या सिनेमागृहात दाखवला गेला
⌛१९८८ : जपानमध्ये समुद्रांतर्गत रेल्वे वाहतुकीस प्रारंभ
💥 जन्म :-
⌛१९१० : अल्बर्ट आईन्स्टाईन, जर्मन-अमेरिकन भौतिकशास्त्रज्ञ. .
💥 मृत्यू :-
⌛१८८३ कार्ल मार्क्स, समाजवादी विचारवंत व लेखक
*संकलक :- सौ. सुभद्रा सानप, बीड*
9403595764
----------------------------------------------------
*आजच्या ठळक बातम्या*
1⃣ मनोहर पर्रीकर यांचा राजीनामा मंजूर, अरुण जेटलींकडे संरक्षण मंत्रालयाचा अतिरिक्त प्रभार
2⃣ मनोहर पर्रिकर आज संध्याकाळी पाच वाजता घेणार गोव्याच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ
3⃣ तेलंगणा सरकारचा अर्थसंकल्प सादर, माहिला आणि बालविकासासाठी 1731 कोटी तर शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी 4 हजार कोटींची केली तरतूद
4⃣ बचत खात्यातून रोख रक्कम काढण्यावर टाकलेली 50 हजारांची मर्यादा संपणार असून, बँकेतून तुम्हाला कितीही पैसे काढता येणार आहेत. त्यामुळे बँकांतील सर्व व्यवहार पूर्ववत होणार आहेत.
5⃣ होळी आणि धूलिवंदन उत्साहात साजरी
6⃣ आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने जारी केलेल्या कसोटीतील अष्टपैलूंच्या नवीन क्रमवारीत भारताचा फिरकी गोलंदाज आर. अश्विनने पटकाविले अव्वलस्थान
7⃣ अफगाणिस्तानचा विस्फोटक फलंदाज मोहम्मद शहजादने टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यात केवळ 27 चेंडूत 72 धावांची तडाखेबंद खेळी करत भारतीय कर्णधार विराट कोहलीला टाकले मागे, टी-20 सामन्यात सर्वाधिक धावा बनवणारा तो बनला चौथा फलंदाज
*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*
📱 9960358300
----------------------------------------------------
*🌷 फ्रेश सुविचार 🌷*
" कोणेही तत्व जोपर्यंत स्वतःच्या आड येत नाही, तोपर्यंत त्याची पुजा करायला लोक तयार असतात; पण ज्या क्षणी ते त्यांच्यावर उलटते, त्या क्षणी ते त्याला दूर भिरकावून देतात."
*संकलक :- सुनील रेगुलवाड, उमरी*
8007084419
----------------------------------------------------
*आजचा मराठी शब्द*
*तत्व*
*संकलक :- जगन्नाथ दिंडे, मुखेड*
8668453639
----------------------------------------------------
*🎂 आजचा वाढदिवस*
👤 संजय भोसले
👤 व्यंकट भंडारे
[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा वरील क्रमांकावर पाठवू शकता. ]
*संकलक :- नासा येवतीकर, धर्माबाद*
9423625769
----------------------------------------------------
*आजची @@ गुगली @@*
*" बांड "*
समाजात खरंच किती
विकृत माणसं आहेत
हे म्हणजे शाळूतले
बांड कणसं आहेत
बांड कणसं जशी
बाजूला फेकली जातात
तशी विकृत माणसं
बाजूला टाकली जातात
शरद ठाकर
सेलू जि परभणी
8275336675
----------------------------------------------------
*🔔 🔔 जाहिरात 🔔 🔔*
*लेखिका जागृती निखारे* लिखित सखी कथा वाचा खालील लिंक वर
http://marathi.pratilipi.com/jagruti-nikhare/sakhi
कथा आवडली असल्यास काही star पण द्यायला विसरु नका.
----------------------------------------------------
*आजचा*
🚩 🌸 *॥ विचार धन ॥* 🌸 🚩
*'पंढरीची वारी' हा वारक-यांचा 'आचारधर्म' आहे. वारकरी म्हणजे वारी करणारा, शिवाय वार करणारा, घाल घालणारा. या शिकवणूकीतूनच शिवकाळात वारक-यांची एक भक्कम सेना उभी झाली.*
*आम्ही विठ्ठलाचे वीर ।*
*फोडू कळी काळाचे शीर ।।*
*तेराव्या शतकाच्या अस्ताला ज्ञानेश्वर महाराजांसारख्या प्रज्ञावंतानं भागवत धर्माची पताका महाराष्ट्र देशी उभारली आणि सतराव्या शतकात तुकारामाच्या रूपानं विठ्ठल भक्तीचा मोठा उमाळा या मातीतून वर आला.*
*ज्ञानदेवे रचिला पाया !*
*तुका झालासे कळस' !!*
*इथपर्यंतचा प्रवास या मातीने डोळाभरून पाहिला. "आकाशाकडे झेपावणारा महाकवी म्हणूनच 'तुका आकाशाएवढा' असं म्हटलं जातं."*
🔔 *॥ रामकृष्णहरी ॥* 🔔
🍀🍀🍀🍀🍀🍀
*--संजय नलावडे, चांदिवली, मुंबई*
----------------------------------------------------
*आज*
🎯 विचारवेध..........✍
〰〰〰〰〰〰〰〰
सर्व सामान्य माणसांच्या निद्रानाशाची अनेक कारणे जरी असली तरी त्यापैकी एक महत्वाचे कारण
म्हणजे एखादे हाती
घेतलेले काम
चांगल्याप्रकारे न होणे.
त्यामुळे मनावर खूप ताण पडतो आणि मनाची चलबिचल अवस्था निर्माण होऊन निद्रानाश होतो.
त्यासाठी हातात काम घेण्यापूर्वी कामाचे नियोजन करावे.कामाचा
वेळ आणि त्यासाठी लागणारे कौशल्य यांची सांगड घालावी व त्या कामात मन एकाग्रतेने ठेऊन त्यात सातत्य ठेवले तर हातातले काम उत्कृष्ट होते आणि मनाला समाधानही वाटते.एकदा का मनाला समाधान वाटले की, मग शांत झोप लागते.
झोप ही ठराविक वेळेत झाली तर आरोग्यही चांगले राहते.त्यामुळे मानसिक समाधानही मिळते.पुढे येणारे कामही तितक्याच अधिक गतीने होण्यास मदत होते.
====================
* व्यंकटेश काटकर,नांदेड.
संवाद.9421839590/
8087917063.
🌹🍃🌹🍃🌹🍃🌹🍃🌹🍃🌹
----------------------------------------------------
*वपुर्झा*
माणसांना लेबलं कशी लावायची? आणि त्यांना माणूस तरी कसं समजायचं? त्यांच्या मोहात पडायचं? की सावध रहायचं? मला माणूस समजला असं कोण म्हणू शकेल?
~ वपु काळे | ठिकरी
*संकलन :- संजय माचेवार, वसमत*
----------------------------------------------------
*आजची बोधकथा*
*संगत*
एक गोसावी रानातून आपल्या गुहेकडे चालला होता. वाटेत त्याला एक अस्वल कण्हताना दिसले. गोसावी त्याच्या जवळ गेला, त्याने पाहिले, अस्वलाच्या पायात काटा रुतला होता. त्याने तो काढला तेव्हा अस्वल म्हणाले, "महाराज मला वेदनेतून मुक्त करून माझ्यावर फारच उपकार केलेत. मला त्याची परतफेड म्हणून तुमच्याबरोबर राहून तुमच्या सेवेची संधी द्या. गोसावी म्हणाला, "अरे मी काही उपकार केले नाहीत, माझा धर्मच आहे तो. तरीही अस्वल आपला हट्ट सोडेना. शेवटी गोसावी त्याला आपल्याबरोबर गुहेत घेऊन गेला. गोसावी विश्रांतीसाठी झोपला तेव्हा त्याच्या तोंडावर माशा बसत होत्या. गोसाव्याची सेवा करावी म्हणून ते अस्वल या माशांना मारू लागले, हाकलू लागले. पण एक धटींगण माशी गोसाव्याच्या नाकावर पुन्हा पुन्हा बसत होती. त्या माशीचा राग येऊन अस्वलाने आपला पंजा माशीला एवढ्या जोराने मारला की माशीचा चेंदामेंदा झाला, पण गोसाव्याचे नाकही तुटले व त्याचा चेहरा विद्रूप झाला!
*तात्पर्य*
शहाण्याचे सेवक व्हावे, पण मूर्खाचे मालक होऊ नये. काही वेळा चांगल्या संगतीचा वेगळाच परिणाम होतो.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
•●◎◑◎✹★✹✹★✹◎◑◎●•
*✍�संकलन ✍� *साई पाटील*,
*श्री कंप्युटर्स & मल्टीसर्व्हिसेस,*
धर्माबाद.
*9860937702, 9922702789*
──┅━━═▣▣═━━┅──
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏 पुन्हा भेटू उद्या
फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
Comments
Post a Comment