✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट
1⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 1⃣
🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00
*🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢*
📱 9423625769
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
http://fmbuleteen.blogspot.com
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
📅 दि. 27/03/2017 वार - वार
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
📆 . . *दिनविशेष . . 📆*
*जागतिक रंगभूमी दिवस*
⌛१९९२ : ख्यातनाम गायक पंडित भीमसेन जोशी यांना मध्य प्रदेश सरकारचा तानसेन पुरस्कार प्रदान.
⌛२००४ : नासा या अमेरिकेच्या संशोधन संस्थेने एक्स-४३ या सर्वाधिक वेगवान चालकरहित जेट विमानाची निर्मिती केली.
💥 मृत्यू :-
⌛१८९८ : सर सय्यद अहमद खान, भारतीय शिक्षणतज्ञ आणि समाजसुधारक
*संकलक :- सौ. सुभद्रा सानप, बीड*
9403595764
----------------------------------------------------
*आजच्या ठळक बातम्या*
1⃣ राज्यांमध्ये संस्कृती आणि भाषेचं आदान-प्रदान झालं पाहिजे पंतप्रधान नरेंद्र मोदी
2⃣ ड्रायव्हिंग लायसन्ससाठी आधार कार्ड अनिवार्य
3⃣ जीएसटी येत आहे, तयार राहा - अरुण जेटली
4⃣ डॉ. नागेश्वर रेड्डी यांना यंदाचा धन्वंतरी पुरस्कार प्रदान
5⃣19 आमदारांचं निलंबन होणार रद्द, गिरीश बापट यांचे स्पष्ट संकेत
6⃣ नूतन शालिवाहन शकवर्षाचा उद्या होणार प्रारंभ!
7⃣ चौथ्या कसोटीत दुसऱ्या दिवसअखेर पहिल्या डावात भारताने केल्या ६ बाद २४८ धावा
*ताजा कलम :-*
सिक्कीममध्ये भूकंपाचे धक्के, आज पहाटे 3.12 मिनिटांनी 4.6 मॅग्निचट्युट तीव्रतेचे भूकंपाचे धक्के जाणवले
*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*
📱 9960358300
----------------------------------------------------
*🌷 फ्रेश सुविचार 🌷*
काही मिळविण्याच्या नादात मनुष्य बरेच काही सोडून देत असतो
*संकलक :- सुनील रेगुलवाड, उमरी*
8007084419
----------------------------------------------------
*आजचा मराठी शब्द*
*निलंबन*
*संकलक :- जगन्नाथ दिंडे, मुखेड*
8668453639
----------------------------------------------------
*🎂 आजचा वाढदिवस*
👤 स्वरुप सुंदरराज वैद्य, नांदेड
9890988267
👤 कल्याणकर साईनाथ, येवती
👤 वैदेही चिलका
[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा वरील क्रमांकावर पाठवू शकता. ]
*संकलक :- नासा येवतीकर, धर्माबाद*
9423625769
----------------------------------------------------
*आजची @@ गुगली @@*
"राजकारण "
समाजसेवेच्या नावाखाली
नक्की राजकारण असते
कोणतेही राजकारण
कधीच विनाकारण नसते
विनाकारण कधी कोणी
राजकारण करत नाही
सहेतुक केलेली सेवा
समाजसेवा ठरत नाही
शरद ठाकर
सेलू जि परभणी
8275336675
----------------------------------------------------
*🔔 🔔 जाहिरात 🔔 🔔*
*साहित्य स्पंदन समूह*आयोजित
रविवारची लेखन स्पर्धा
*प्रगती मधील अडसर :- दारू*
*भाग :- एक*
http://nasayeotikar.blogspot.com/2017/03/blog-post_26.html
*भाग :- दोन*
http://nasayeotikar.blogspot.com/2017/03/blog-post_77.html
आपले सर्व लेख वरील लिंक वर उपलब्ध आहेत. Plz visit & check
*नासा*
----------------------------------------------------
*आजचा*
🌹 *~~~॥ विचार धन ॥~~~*🌹
*मडक्यासाठी लागणारी माती आणण्याला कुंभाराने गाढव पाळलेले असते. गाढव जेव्हा रिकामे असते तेव्हा ते मालकाच्या अंगणात थांबत नाही. ते सरळ उकिरड्यावर जाऊन मिळेल ते खात बसते. पालापाचोळा साली-टरफले सारे ते मटकावते. प्रत्येक प्राण्याच्या काही त-हा असतात. खाण्याच्या काही सवयी असतात. गाढवाला अगदी गूळपाण्यात भिजवलेली डाळ दिली तरी ते मनापासून खाणार नाही. उकिरड्यावर पडलेले उष्टे अन्न मनापासून खाईल.*
*माणसांचेही तसेच असते, प्रत्येकाच्या वेगवेगळ्या त-हा असतात, सवयी असतात. "विशिष्ट व्यक्तिला विशिष्ट गोष्टीच आवडतात, आणि विशिष्ट व्यक्ति विशिष्ट ठिकाणीच सापडते. त्यांना दुसरीकडे शोधायचे कारण नाही."*
•••●‼ *रामकृष्णहरी* ‼●•••
🔰🔰🔰🔰🔰🔰
*--संजय नलावडे, चांदिवली, मुंबई*
----------------------------------------------------
*आज*
🎯 विचारवेध..........✍
〰〰〰〰〰〰〰〰
एकटे राहून कधीच कोणते प्रश्न सुटत नसतात.त्यावर उपायदेखील सापडत नाही.उलट प्रश्न सुटत नाहीत म्हणून त्याचा पश्चाताप स्वतःला फार होतो.पश्चातापाचे रुपांतर आपल्या मानसिकतेवर होऊन समोर येणा-या प्रश्नावरदेखील पर्याय शोधू शकत नाही.यासाठी आपल्या सर्व प्रश्नांसाठी कुणाचीतरी मदत घ्यावी लागते.आपल्या प्रश्नाचे उत्तर चर्चेतून किंवा कुणाच्यातरी सल्ल्यानुसार मिळू शकेल.
म्हणून एकटे न राहता चार मित्रांच्या सहवासात,
वडील माणसांच्या सहवासात आणि चार लोकांच्या समुहात राहणे पसंत करा.त्यामुळे तुम्ही
सुखी,आनंदी, समाधानी
व मानसिकदृष्ट्या संतुलीत राहाल.
- व्यंकटेश काटकर,नांदेड.
संवाद.9421839590/
8087917063.
🍃🌺🍃🌺🍃🌺🍃🌺🍃🌺🍃🌺
--------------------------------------------------
*आजची बोधकथा*
*❃ सचोटी ❃*
*एका साधूला पितळेच्या धातूचे सोन्यात रूपांतर करण्याची कला अवगत होती.* पण याचा उपयोग तो गरजुंना करण्यासाठीच करत होता. एकेदिवशी एक गरीब ब्राह्मण त्याच्याकडे आला. त्याला मुलीच्या लग्नासाठी पैशांची आवश्यकता होती. साधूने त्याची अडचण ओळखून त्याला एका पितळेच्या भांड्याचे रूपांतर सोन्यात करून दिले. ब्राह्मण सोनाराकडे गेला. सोनाराला त्याच्याकडे सोन्याचे भांडे पाहून मनात संशय आला. सोनार राजाकडे गेला. राजाने त्याची चौकशी केली केली तेव्हा ब्राह्मणाने खरी घटना सांगितली. राजाच्या मनात लोभाची भावना उत्पन्न झाली. त्याने साधूला ती विद्या शिकविण्याचे फर्मान काढले. साधूने राजाला ठामपणे नकार सांगितला. राजाने साधूला 15 दिवसांची मुदत दिली अन्यथा फासावर लटकावेन अशी धमकी दिली. राजा त्याच्याकडून काय उत्तर येते यासाठी दूत पाठवित असे पण साधू काही होकार देईना. हे पाहून राजाने वेश पालटला व तो साधूच्या येथे राहून त्याची सेवा करू लागला. साधूने राजाच्या सेवेवर प्रसन्न होऊन त्याला पितळापासून सोने तयार करण्याची विद्या शिकविली. राजा महालात परतला. पंधराव्या दिवशी साधूला बोलावून त्याला विद्या शिकविण्याची आज्ञा केली. साधूने परत नकार दिला. तेव्हा राजा गर्वाने म्हणाला,’’ साधू तू मला कला शिकवली नसती हे मी जाणून होतोच पण मी ही हट्टी आहे. मी पण तुझ्याजवळ राहून ती कला शिकून तयार झालो आहे.’’ साधू म्हणाला,’’महाराज तुम्ही माझी सेवा करून ती कला शिकला आहात, धमकी देऊन नाही. *ज्ञानासाठी गुरुची मर्जी सांभाळावी लागते*.’’
*_तात्पर्य_ ::~ ज्ञान सचोटीने प्राप्त होते, धमकावून नये.*
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
•●◎◑◎✹★✹✹★✹◎◑◎●•
*✍संकलन ✍ साई पाटील*,
*श्री कंप्युटर्स & मल्टीसर्व्हिसेस,*
धर्माबाद.
*9860937702, 9922702789*
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏 पुन्हा भेटू उद्या
फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
Comments
Post a Comment