1⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 1⃣
📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹
📱 09970558244
🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢
📱 09423625769
🕖 प्रसारण वेळ : 06:50 ते 07:00 am
----------------------------------------------------
http://fmbuleteen.blogspot.com
----------------------------------------------------
📅 दि. 17/11/2016 वार -गुरुवार
========***********=========
📆 . . दिनविशेष . . 📆
*आंतरराष्ट्रीय विद्यार्थी दिन.*
⏳१९३२ : कॉंग्रेसने बहिष्कार घातलेल्या तिसर्या गोलमेज परुषदेची सुरुवात.
💥 जन्म :-
⏳१९३८ : रत्नाकर मतकरी, मराठी लेखक, नाटककार.
💥 मृत्यू :-
⏳२०१२ : बाळासाहेब ठाकरे, शिवसेनेचे संस्थापक, शिवसेनाप्रमुख, व्यंगचित्रकार, सामना वृत्तपत्राचे संपादक.
✏ सौजन्य : -
www.marathimati.com
========***********=========
*आजच्या ठळक बातम्या*
1⃣ नोटाबंदीमुळे नक्षलवादी आणि अतिरेक्यांच्या कारवाया कमी झाल्या केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह
2⃣ कांदिवलीतल्या रेल्वे रुळावर अभिनेते मुकेश रावल यांचा आढळला मृतदेह, रावल यांनी 'रामायण' मालिकेत केली होती विभिषणाची भूमिका
3⃣ सहा दिवसात नाशिक जिल्ह्यात 650 कोटी रुपयांचे वितरण, आठवडाभरात व्यवहार सुरळीत होण्याची जिल्हा प्रशासनाला अपेक्षा
4⃣ बॅंकेतून एकावेळी एका व्यक्तीला 4500 रुपये बदलता येणार, रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडियाचा महत्त्वपूर्ण निर्णय
5⃣ राज्यात होऊ घातलेल्या नगरपालिका, नगरपंचायत सार्वत्रिक निवडणुकांची प्रक्रिया ही संविधानाच्या निर्देशानुसार निर्भय, निष्पक्ष व पारदर्शक पद्धतीने राबवा राज्य निवडणुक आयुक्त जे. एस. सहारिया
6⃣ दिल्लीच्या पहाडगंजमधून पोलिसांनी 68 लाखांच्या 100 रुपयांच्या नोटा केल्या जप्त
7⃣ चीनमधील सुपर सीरिज बॅडमिंटनमध्ये साईना नेहवालचा पहिल्याच फेरीत पराभव.
🇮🇳 सौजन्य -
http://m.lokmat.com
========***********=========
*🌷 फ्रेश सुविचार 🌷*
आनंदी राहायच असेल तर अपेक्षा स्वतः कडून ठेवा, समोरच्यांकडून नव्हे
[ या बुलेटिनसाठी सुविचार पाठवू शकता. ]
========***********=========
*आजचा मराठी शब्द*
*अपेक्षा*
========***********=========
*🎂 आजचा वाढदिवस*
👤 अनंत कदम, लातूर
[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा पाठवू शकता. ]
========***********=========
★★☆★★☆★★☆★★☆★★☆★
*🌼🌸 विचारधारा 🌻🌺*
माणसाच्या सवयी ह्या जीवनाच्या कधी आवश्यक घटक बनून जातात हे कळतच नाही
वाईट सवयी ह्या चांगल्या सवयीपेक्षा फार लवकर आवश्यक बनतात
चांगली सवय म्हणजे बी रोवून त्यांचे एका विशाल वृक्षात वाढ होणे आणि त्यानंतर त्यास फुले-फळे लागण्यासारखे आहे.
वृक्षाच्या लागवडीसाठी जी काळजी घेतली जाते तीच काळजी चांगली सवय लागण्यासाठी घेतल्यास जीवनात सुंदर फळे मिळतील यात शंकाच नाही.
📝 - नागोराव सा. येवतीकर
धर्माबाद
9423625769
••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••
*( ....... स्वलिखित .......... )*
🍃🌻🍃🌻🍃🌻🍃🌻🍃🌻🍃
========***********=========
*📚अभ्यास कथा भाग ८१ 📚*
〰〰〰〰〰〰〰〰〰〰
*♻ संगतीचा परिणाम* ♻
=========================
*एका उंदराची एका बेडकाशी फार ओळख होती. उंदीर एका घरातील कोठीत राहात होता व बेडकाचे घर एका नदीत होते. एकदा उंदराने बेडकाला आपले घरी जेवावयास बोलाविले होते. पुढे बेडकाने उंदराला आपले घरी बोलाविले. पण नदीतून उंदराला बेडकाचे घरी जाता येईना. कारण उंदराला मुळीच पोहता येत नाही. मग बेडकाने एक तोड काढली. उंदराचे पाय आपले पायास बांधले आणि आपण पोहू लागला. यामुळे उंदीर बुडाला नाही खरा; पण नाका-तोंडात फार पाणी जाऊ लागले आणि निंमे वाटेतच बिचारा उंदीर तडफडून मेला. परंतु उंदराचे पाय बांधले होते आणि बेडूक सारखा पोहत होता. यामुळे तो मेलेला उंदीर तळाशी बुडाला नाही. पण तसाच वर तरंगत होता. हे वरून एका गरुडाने पाहिले. लागलीच गरुडाने खाली झेप टाकली आणि तो उंदरास वर नेऊ लागला. पण बेडकाचे पायही उंदराला बांधलेले होते; यामुळे तोही उंदराबरोबर वर गेला. गरुडाने दोघांनाही घरी नेले आणि खाऊन टाकले*.
*पहा, भलती संगत केली यामुळे असे झाले. बेडूक नदीत राहणारा आणि उंदीर जमिनीवर राहणारा. यामुळे या दोघांची मेजवाणी एका बाजूस राहिली आणि गरुडाची मेजवानी झाली*.
*तात्पर्य .....यासाठी संगत फार विचाराने करावी*.
〰〰〰〰〰〰〰〰〰
*📝संकलन/ समूह प्रशासक*📝
*✒श्रीमती प्रमिलाताई सेनकुडे (शिंदे)*
जि.प.प्रा.शा.वाटेगाव
ता.हदगाव, जि. नांदेड
http://www.pramilasenkude.blogspot.in
*©मराठीचे शिलेदार समूह*
🐪🐴🐆🐊🐬🐍🐌🐁🐕🦃
========***********=======
🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏 पुन्हा भेटू उद्या
फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार
========***********=========
Comments
Post a Comment