*छात्रसेवा काल शिबीर म्हणजे रंगीत तालीम - नासा येवतीकर*
धर्माबाद :- छात्रसेवा काल शिबीर म्हणजे एकप्रकारे रंगीत तालीम होय असे प्रतिपादन प्रसिद्ध स्तंभलेखक नासा येवतीकर यांनी येवती येथील जिल्हा परिषद डिजिटल शाळेत छात्र सेवाकाल शिबिराच्या उदघाटन प्रसंगी बोलताना व्यक्त केले. पुढे बोलताना म्हणाले की, एखादे काम हातात घेतल्यानंतर मन लावून काम करा यश नक्की मिळेल. खुप पुस्तके वाचत रहा, लिहित रहा, जीवनात सतत क्रियाशील राहा, सध्या डी. एड. पदविका उत्तीर्ण असलेल्यांची संख्या लाखोंच्या घरात आहे, शिक्षकांची नोकरी लागणेअवघड बाब आहे. तरी घाबरण्याचे कारण नाही. खचून जाऊ नका, अभ्यास करा, फेसबुक आणि व्हाट्सअप पासून कोसो दूर रहा असा संदेश त्यांनी आपल्या भाषणातून दिला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शासकीय अध्यापक विद्यालयाचे प्राचार्य एच. आर. पोकले हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष बालाजी पाटील भोसले, उपाध्यक्षा सौ. सुमन संजय बोइनवाड, तंटामुक्ती समिती चे अध्यक्ष बाबुराव यरमलवाड, शिक्षणप्रेमी शंकर इबितवार आणि प्रमुख मार्गदर्शक म्हणून स्तंभलेखक नासा येवतीकर यांची प्रमुख उपस्थिती होती. विद्यादेवता माता सरस्वती आणि क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली. मान्यवराचे स्वागत किनोड कृष्णवेणी या छात्र शिक्षिकेच्या स्वागतगीताने झाली तर कार्यक्रमाची प्रस्तावना छात्र पर्यवेक्षक धनंजय नरवाडे यानी मांडली. त्यानंतर येवती येथील प्राथमिक शिक्षक सतीश कोडगिरे, गोविंद येळगे आणि बाबुराव यरमलवाड यांनी आपले मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक शिवाजी मनुरे, पदवीधर शिक्षक गोविंद येळगे, सतीश कोडगिरे, शंकर उषापोड, श्याम दरबस्तेवार, आनंद पाटील, शेख सर, सय्यद सर, साईनाथ मुलकोड, विठ्ठल धोते, शिवाजी काळेवार, आंगनवाडी शिक्षिका ललिता पडोळे, सौ. सितावार यांची प्रमुख उपस्थिती होती. छात्र सेवाकाल शिबिराची छात्र मुख्याध्यापिका म्हणून कु. कल्पना शंकर भोसके तर छात्र पर्यवेक्षक म्हणून नरवाडे धनंजय सोबत शिक्षक प्रतिनिधी प्रणिता राजोळे, ग्रंथपाल गोपाळ वाघमारे, लिपिक दिपाली मुतकुलवाड, सांस्कृतिक विभाग आदिनाथ सोने, कृष्णवेणी किनोड, वेळापत्रक व परीक्षा प्रमुख योगेश येवतीकर, पल्लवी वाघमारे, शिस्त व परिपाठ नियोजन प्रमुख रोहिणी फुलारी, मनोरंजना शिवशेट्टे, अर्थ विभाग प्रियंका जाधव, प्राजक्ता पांचाळ, सहल प्रमुख रेवती स्वामी, स्नेहा धडेकर, क्रीडा विभाग अक्षय जाधव आणि सविता शिलेवाड हे छात्र शिक्षक दिनांक 14 मार्च ते 25 मार्च या कालावधीत येवती येथील जिल्हा परिषद प्राथमिक डिजिटल शाळेमध्ये सेवा काल शिबीर घेणार असल्याची माहिती शिबीर प्रमुख शासकीय अध्यापक विद्यालयाचे सौ. चप्पलवार व्ही. एम. श्री सूर्यवंशी सर आणि सहाय्यक प्रा. एस. एस. बोकन यांनी दिली. छात्र शिक्षक सेवा काल शिबिरासाठी शाळा उपलब्ध करून दिल्याबद्दल प्राचार्य एच. आर. पोकले यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणातून शाळेचे आभार व्यक्त केले आणि सेवाकाल शिबिराचे उदघाटन झाले असे घोषित केले. कार्यक्रमाचे सुंदर असे संचालन छात्रशिक्षक योगेश येवतीकर यांनी केले तर रेवती स्वामी या छात्र शिक्षिकेने आभार मानले. यावेळी शाळेतील बहुसंख्य विद्यार्थी आणि गावकरी यांची उपस्थिती होती.
Comments
Post a Comment