1⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 1⃣
📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹
📱 9970558244
🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢
📱 9423625769
🕖 प्रसारण वेळ : 06:50 ते 07:00 am
----------------------------------------------------
http://fmbuleteen.blogspot.com
----------------------------------------------------
📅 दि. 18 /11 /2016 वार - शुक्रवार
========***********=========
📆 . . दिनविशेष . . 📆
⏳ १९६३ : बटण असलेला पहिला दूरध्वनी संच वापरात आला.
💥 जन्म :-
⏳ १९०१ : शांताराम वणकुद्रे उर्फ व्ही. शांताराम, चित्रपट अभिनेता, निर्माता, दिग्दर्शक, पटकथाकार
💥 मृत्यू :-
⏳ १७७२ : थोरले माधवराव पेशवे, मराठी राज्याचे पेशवे.
⌛१७७२ : रमाबाई पेशवे, थोरले माधवराव पेशवे यांच्या पत्नी.
✏ सौजन्य : -
www.marathimati.com
========***********=========
*आजच्या ठळक बातम्या*
1⃣ बँकांमध्ये नव्या नोटा वेगाने पोहोचवण्याचे काम सुरू. नोटाबंदीचा निर्णय मागे घेणार नाही - अर्थमंत्री अरूण जेटली यांचे प्रतिपादन
2⃣ राज्यातील महामार्गांवर सुद्धा 24 नोव्हेंबरपर्यंत टोलमाफी वाढविण्यात आली आहे.
3⃣ मनमाड-मालेगाव-धुळे इंदूर पाठोपाठ आता नाशिक-मालेगाव-धुळे रेल्वे मार्ग निर्मितीसाठी सर्वेक्षण करण्याचे आश्वासन केंद्रीय रस्ते, परिवहन आणि जहाजबांधनी मंत्री नितिन गडकरी यानी दिल्याची माहिती केंद्रीय सरंक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यानी दिली.
4⃣ राज्यातील सर्व शहरे २०१७ पर्यंत हागणदारीमुक्त करणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगावात प्रचारसभेत व्यक्त केले मत
5⃣ नांदेड शहरात कारमध्ये 16 लाख रुपयांची रोख रक्कम सापडली, व्हीआयपी रस्त्यावर तपासणीदरम्यान स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
6⃣ सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचा राज्यस्तरीय पशु, पक्षी महोत्सव ९ ते १२ डिसेंबर दरम्यान कुडाळमध्ये, राज्य-परराज्यातून ३०० स्टॉल, ५०० जनावरे होणार सहभागी
7⃣ दुसऱ्या कसोटीत पहिल्या दिवसाखेर भारताच्या 4 बाद 317 धाव, विराट कोहलीची नाबाद 151 धावांची खेळी, पुजाराचेही दमदार शतक
🇮🇳 सौजन्य -
http://m.lokmat.com
========***********=========
*🌷 फ्रेश सुविचार 🌷*
कुणीही चोरू शकत नाही अशी संपत्ती कमावण्याचा प्रयत्न करा.
[ या बुलेटिनसाठी सुविचार पाठवू शकता. ]
========***********=========
*आजचा मराठी शब्द*
*आश्वासन*
========***********=========
*🎂 आजचा वाढदिवस*
👤 अरविंद काळे, नांदेड
👤 नितिन रायपुरे, अकोला
[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा पाठवू शकता. ]
========***********===========
🎯विचारवेध............✍🏻
++++++++++++++++++++
कर्तव्यतत्पर माणसे कधीच कोणत्याही कामात कामचुकारपणा करत नाहीत. म्हणून सदैव ते
आपल्या कामात कर्तव्यदक्ष असतात.
त्यामुळे ते आपले काम कशाचीही अपेक्षा न ठेवता प्रामाणिकपणे पार पाडतात. ते कशालाही आणि कोणत्याही अमिषाला बळी पडत नाहीत. अशाच प्रामाणिक माणसांचा आदर्श इतरांनीही त्यांची प्रेरणा घेऊन आपले कर्तव्य पार पाडायला हवे. ती एक आपल्यासाठी त्यांच्याकडून मिळालेली आदर्श प्रेरणारुपी ऊर्जाच आहे.
- व्यंकटेश काटकर,
नांदेड 9421839590.
🌺🍃🌺🍃🌺🍃🌺🍃
========***********=========
*आजची लिंक*
नाद चारोळी स्पर्धा
विषय : यश - अपयश
http://sahitydaarpan.blogspot.com/2016/11/blog-post.html
संकलन
========***********=======
*📚 बोध कथा 📚*
〰〰〰〰〰〰〰〰〰〰
*♻ सदाचार* ♻
=========================
महाभारतकालीन राजा सत्यदेव एक दिवस सकाळी उठले, तर त्यांना एक सुंदर स्त्री राजवाड्यातून बाहेर पडतांना दिसली. राजाने आश्चर्यचकित होऊन त्या स्त्रीला हात जोडून नम्रपणे विचारले, ‘आपण कोण आहात ?’ त्यावर त्या स्त्रीने सांगितले, ‘मी लक्ष्मी आहे, आता या राजवाड्यातून मी जात आहे.’ तेव्हा राजाने तिला सांगितले, ‘तू जाऊ शकतेस.’ लक्ष्मी बाहेर पडली. नंतर लक्ष्मीच्या पाठोपाठ एका सुंदर पुरुषाला राजवाड्याबाहेर पडतांना पाहून राजाने त्यालाही विचारले, ‘आपण कोण आहात ?’ त्याने उत्तर दिले, ‘माझे नाव ‘दान’ आहे. लक्ष्मी बाहेर गेल्यानंतर आपण दान करू शकणार नाही; म्हणून मीही तिच्यासह जात आहे.’ राजाने सांगितले ‘आपणसुद्धा राजवाडा सोडून जाऊ शकता.’ त्यानंतर त्याच्या पाठोपाठ तिसरा पुरुष ‘यश’ निघून गेला. त्यानंतर चौथा पुरुष प्रकट झाला अन् बाहेर पडू लागला. तेव्हा राजाने त्यालाही हात जोडून नम्रपणे त्याचे नाव विचारले. तो पुरुष म्हणाला, माझे नाव ‘सदाचार ! राजाने त्याला म्हटले, ‘मी तर तुझा कधीच त्याग केला नाही. तू मला सोडून का जात आहेस ? तुझ्यासाठीच मी लक्ष्मी, दान आदींचा त्याग केला आहे. मी तुला जाऊ देणार नाही. तू मला सोडून गेलास, तर माझे सर्वस्व जाईल !’राजाचे हे बोल ऐकून सदाचार राजवाड्यातच थांबला. सदाचार बाहेर पडला नाही, हे पाहून बाहेर गेलेली लक्ष्मी, दान आणि यशही परत आले.
*तात्पर्य : सदाचाराने वागणे हेच आयुष्याचे सर्वस्व आहे. जीवनात सदाचार (नीतीमत्ता, धर्माचरण आदी) नसेल, तर दान, लक्ष्मी (श्रीमंती) आदींचा काहीच उपयोग नाही*.
〰〰〰〰〰〰〰〰〰
*📝संकलन/ समूह प्रशासक*📝
*✒श्रीमती प्रमिलाताई सेनकुडे (शिंदे)*
जि.प.प्रा.शा.वाटेगाव
ता.हदगाव, जि. नांदेड
http://www.pramilasenkude.blogspot.in
*©मराठीचे शिलेदार समूह*
🐪🐴🐆🐊🐬🐍🐌🐁🐕🦃
========***********=======
🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏 पुन्हा भेटू उद्या
फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार
========***********=========
खखुप छान बुलेटीन
ReplyDelete