दिनांक 19 नोव्हेंबर 2016

 1⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 1⃣
📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹
📱 9970558244
🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢
📱 9423625769
🕖 प्रसारण वेळ : 06:50 ते 07:00 am
----------------------------------------------------
http://fmbuleteen.blogspot.com
----------------------------------------------------
📅 दि. 19/11/2016 वार - शनिवार
========***********=========
               📆 . . दिनविशेष . . 📆

          *नागरिक दिन*
⏳१९४६ : अफगाणिस्तान, आइसलँड आणि स्वीडन संयुक्त राष्ट्रांमध्ये दाखल झाले.
💥 जन्म :-
⏳१९१७ : इंदिरा गांधी, भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान
💥 मृत्यू :-
⏳१९३१ : शू चीमो, चिनी भाषेमधील कवी.
✏ सौजन्य : -
www.marathimati.com
========***********=========
*आजच्या ठळक बातम्या*
1⃣ रेल्वे विकसित आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम झाली तर त्याचा फायदा देशाबरोबरच रेल्वेतील कर्मचाऱ्यांनाही मिळेल. रेल्वेमधूनच देशाला गती आणि प्रगती मिळू शकते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे प्रतिपादन
2⃣ नोटाबंदीच्या निर्णयानंतर पाकिस्तान, बांग्लादेश आणि नेपाळच्या सीमांवरून होणारी नोटांची तस्करी पूर्णपणे थांबली - किरण रिजीजू
3⃣ राज्यसभेचे कामकाज २१ नोव्हेंबर सकाळी ११ वाजेपर्यंत स्थगित.
4⃣ दारू बाळगण्याचा परवाना असलेल्यांना आता महिन्यातून फक्त दोनच बाटल्या बाळगता येतील. राज्य सरकारने हा महत्त्वाचा निर्णय घेतल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या सचिव व्ही.राधा यांनी दिली.
5⃣ शनिवारी फक्त ज्येष्ठ नागरिकांना पैसे बदलून मिळणार. बँकेत नोटा जमा करणं आणि काढण्याचं काम सुरूच राहणार. इंडियन बँक असोसिएशनचा निर्णय.
6⃣ विशाखापट्टणम कसोटीत दुसऱ्या दिवसअखेर इंग्लंडच्या 5 बाद 103 धावा. इंग्लिश संघ अद्याप 352 धावांनी पिछाडीवर
7⃣ श्रीलंकेचा माजी क्रिकेटपटू महेला जयवर्धने मुंबई इंडियन्सच्या प्रशिक्षकपदी, IPLच्या दहाव्या हंगामात मुंबई इंडियन्सच्या खेळाडूंना करणार मार्गदर्शन.
🇮🇳 सौजन्य -
http://m.lokmat.com
========***********=========
*🌷 फ्रेश सुविचार 🌷*
मनाचे दरवाजे नेहमी खुले ठेवा; ज्ञानाचा प्रकाश कुठुन कधी येईल सांगता येत नाही.

[ या बुलेटिनसाठी सुविचार पाठवू शकता. ]
========***********=========
*आजचा मराठी शब्द*
             *उत्पादन*
========***********=========
*🎂 आजचा वाढदिवस*
👤 स्वेता नरसुडे

[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा पाठवू शकता. ]
========***********=========

🎯 वि चा र वे ध.....✍🏻
*******************

इतरांच्या जेव्हा भावना आपल्याला समजायला लागतात तेव्हा आपलं आणि त्यांचं नातं घट्ट व्हायला लागतं. जेव्हा नातं घट्ट व्हायला लागतं तेव्हा आपुलकी,प्रेम,
जिव्हाळा यांचेही जाळे अधिक विणल्या जाते तेव्हा ख-या माणुसकीचे दर्शन व्हायला लागते. आपल्यालाही एक नवीन अतुट नाते जोडल्याचे समाधान वाटते. माणसाने माणसाशी माणसाप्रमाणे इतरांसोबत वागल्याचा प्रत्यय अनुभवास यायला लागतो.अशा नात्यातून मानवतेचे अतुट नाते जोडल्याचे समाधान आपल्या मनाला वाटते.

- व्यंकटेश काटकर, नांदेड.
  9421839590.

🍃🌹🍃🌹🍃🌹🍃🌹
========***********=========
*आजची लिंक*
नोटपुराण

http://nasayeotikar.blogspot.com/2016/11/blog-post.html
========***********=======
*आजची बोधकथा*

*♻ मैत्रीची खरी ओळख* ♻
=========================
*✒प्रमिलाताई सेनकुडे(शिंदे)*
〰〰〰〰〰〰〰〰〰〰
एक जंगल होते. गाय, घोड़ा, गाढव, आणि बकरी तेथे चरायला येत असत. त्या चौघांमध्ये मैत्री झाली. ते जेथे चरायला जात असत तेथे एका झाडाखाली सशाचे बीळ होते. एक दिवस सशाने त्या चौघांना एकत्र फिरताना पाहिले त्यांची मैत्री पाहिली आणि त्याला वाटले आपणही त्यांच्याशी मैत्री करावी. ससा त्यांच्यापाशी गेला व म्हणाला," तुम्ही चौघे जसे मित्र आहात तसेच मलाही तुमचा मित्र करून घ्या. त्यांनी सर्वांनी या गोष्टीला मान्यता दिली व त्याला मित्र करून घेतले. सशाला मोठा आनंद झाला. ससापण त्यांच्यासोबत फिरू लागला. एके दिवशी ससा त्यांच्याजवळ बसला होता. अचानक शिकारी कुत्रे जवळ आल्याची त्यांना सर्वाना जाणीव झाली, ससा गाईला म्हणाला,"तू मला तुझ्या पाठीवर बसव जेंव्हा शिकारी कुत्रे जवळ येतील त्यांना तू तुझ्या शिंगांनी मारून पळवून लाव." गाय म्हणाली,"आता तर माझी घरी परतण्याची वेळ झाली आहे." तेंव्हा ससा घोडयाकडे गेला आणि म्हणाला," तू मला तुझ्या पाठीवर बसव आणि माझा जीव वाचव" घोडा म्हणाला,"मित्र मी तुला पाठीवर घेतले असते पण मला खाली बसताच येत नाही मी तुला कसे पाठीवर घेवू?" तेंव्हा ससा गाढवाला म्हणाला,"मित्रा तू तरी मला मदत कर" गाढव म्हणाले" मी तर आता घरी चाललो तू बघ" मग शेवटी ससा बकरी कडे गेला व म्हणाला,"बकरीताई तू तुझ्या पाठीवर मला घेतेस काय?" बकरी म्हणाली,"अरे सशा, मीच शिकारी कुत्र्यांना घाबरते आणि तुला वाचावयाच्या नादात त्यांनी मलाच फाडून खातील. तेंव्हा तू तुझे बघ" एवढ्यात कुत्रे तेथे पोहोचले, ससा जीवाचा आकांत करून पळाला आणि एका झाडाच्या पाठीमागे जाऊन लपला. कुत्रे निघून गेले आणि ससा मरणापासून वाचला. त्याने मनात विचार केला,"असे मित्र असण्यापेक्षा मित्र नसलेले बरे!!"

*तात्पर्यः*
मिञाची खरी ओळख संकटात होते.खरे मिञ म्हणनारे संकटात सोडून जातात याचा अनुभव नेहमी येतोच.
〰〰〰〰〰〰〰〰〰
*📝शब्दांकन/ संकलन/तथा समूह प्रशासक*📝
*✒श्रीमती प्रमिलाताई सेनकुडे (शिंदे)*
जि.प.प्रा.शा.वाटेगाव
ता.हदगाव, जि. नांदेड
http://www.pramilasenkude.blogspot.in
*©मराठीचे शिलेदार समूह*
🐪🐴🐆🐊🐬🐍🐌🐁🐕🦃
========***********=======
🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏 पुन्हा भेटू उद्या
फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार
========***********=========

Comments