1⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 1⃣
📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹
📱 9970558244
🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢
📱 9423625769
🕖 प्रसारण वेळ : 06:50 ते 07:00 am
----------------------------------------------------
http://fmbuleteen.blogspot.com
----------------------------------------------------
📅 दि. 20/11 /2016 वार - रविवार
========***********=========
📆 . . दिनविशेष . . 📆
*लोकशिक्षण दिन*
*बालक हक्क दिन*
⏳१९८५ : मायक्रोसॉफ्टने मायक्रोसॉफ्ट विन्डोज १.० ही संगणक-प्रणाली प्रसिद्ध केली.
💥 जन्म :-
⏳१७५० : टिपू सुलतान, म्हैसूरचा राजा
💥 मृत्यू :-
⏳१९७३ : केशव सीताराम ठाकरे, मराठी पत्रकार, समाजसुधारक, वक्ते, संयुक्त महाराष्ट्र चळवळीचे
✏ सौजन्य : -
www.marathimati.com
========***********=========
*आजच्या ठळक बातम्या*
1⃣ देशातील तरूणाईने ' स्वच्छ भारत अभियान' पुढे नेले आहे, मग ते देशासाठीचे असो किंवा काळ्या पैशाबाबतचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे प्रतिपादन
2⃣ कठीण काळात इंदिरा गांधी यांनी देशाच्या भूमिकेला आकार देण्यासाठी खूप योगदान दिले आहे राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी अभिवादन करताना व्यक्त केले मत
3⃣ पंजाब राज्यातील लुधियानामध्ये पोलिसांनी जप्त केल्या तब्बल 45 लाख रुपयांच्या चलनातून रद्द करण्यात आलेल्या जुन्या नोटा
4⃣ जिल्हा, सहकारी बँकांचा पैसा आरबीआयने स्वीकारावा. दोन-तीन दिवसात निर्णय न घेतल्यास आंदोलन करू. सहकारी बँका बंद करण्याचा आरबीआयचा विचार - शिवसेना खासदार आनंदराव अडसूळ यांची टीका.
5⃣ पाकिस्तानने पुन्हा केले शस्त्रसंधीचे उल्लंघन, जम्मू-काश्मीरमधील राजौरी येथील सुंदरबनी सेक्टरमध्ये केला गोळीबार
6⃣ कोरिआच्या सुंग जी ह्यूनचा पराभव करून पी.व्ही.सिंधूचा चायना ओपन बॅडमिंटन स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश.
7⃣ इंग्लंडविरुद्धच्या दुस-या कसोटीत विराट कोहलीचे दुसरे अर्धशतक. भारत ३ बाद ८९ धावा.
🇮🇳 सौजन्य -
http://m.lokmat.com
========***********=========
*🌷 फ्रेश सुविचार 🌷*
🌱 निर्भयता हेच यशाचे खरे रहस्य आहे. 🌱
संकलन - सूर्यकांत तनमुदले, येवती
[ या बुलेटिनसाठी सुविचार पाठवू शकता. ]
========***********=========
*आजचा मराठी शब्द*
*निर्भय*
========***********=========
*🎂 आजचा वाढदिवस*
👤 कु. शुभदा सुभाष दरबस्तेवार, कुंडलवाडी
ता.बिलोली जिल्हा नांदेड.
👤 डॉ. शैलेश उमाटे, मुंबई
👤 चंद्रकांत पाटील पांगरीकर
👤 संदीप पटकोटवार, प्रा. शिक्षक धर्माबाद
👤 दत्तात्रय योगिराज शिंदे
[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा पाठवू शकता. ]
========***********=========
🎯 विचारवेध..........✍🏻
➖➖➖➖➖➖➖➖
आपण नेहमी असं म्हणतो की,आम्ही सर्वसामान्यपणे जीवन जगणारी माणसं आहोत. आमच्याजवळ काहीच नाही तुम्हाला द्यायला.आम्हीच असे
गरीब आहोत की,तुम्हाला आम्ही काय देणार ? आमची पात्रता तरी आहे काय तुम्हाला काहीतरी देण्याची ? असं म्हणून इतरांसमोर आपला कमीपणा दाखवतो.
ज्यांच्याजवळ काही आहे ते तरी काही म्हणतात का आमच्याजवळ आहे ?
जे आर्थिकदृष्ट्या सक्षम असले तरी त्यांची
कोणतीच सहकार्याची,दान करण्याची वृत्ती नसते.
त्यांना पैशापुढे समोरचे काहीच दिसत नाही.ते इतरांना कोणतीच मदत करू शकत नाहीत.
त्यापेक्षा आपण बरे !
आर्थिक जरी मदत करता आली नसली तरी त्यांना आपल्या हातून शक्य तेवढे सहकार्य,आपुलकी व प्रेम देऊन त्यांचे थोडे दुःख दूर करु शकतो.हाच तर सर्व
सामांन्यांचा धर्म आहे. "खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे."हा सर्वात मोठा धर्म आपण पाळू शकतो.यापेक्षा कोणते मोठे कार्य आहे..? का आपण इतरांपेक्षा कमी समजायचे ? असा नकारात्मक विचार आपल्या मनातून काढून
टाकायला हवा.
----------------------
🌷 व्यंकटेश काटकर
नांदेड.
भ्रमण...9421839590
🌅🌅🌅🌅🌅🌅🌅🌅
========***********=========
*आजची लिंक*
सुंदरता महत्वाची की गुणवत्ता
http://nasayeotikar.blogspot.com/2016/11/blog-post_19.html
========***********=======
*आजची बोधकथा*
========================
*♻ त्रासाचे झाड* ♻
दादांच्या कार्यालयात त्यांचाच भाचा कामाला होता. दूरचे नाते असले तरी कामात मात्र दोघांचे सगळेच पटायचे. कामाचा, कर्जाचा व मंदीचा व्याप वाढत असल्यामुळे तणाव, चिडचिड आणि वैताग हे रोजचेच झालेले. दादांना परिस्थिती सोसेनाशी झालेली. ‘ऑफिसमध्ये त्रास आहेच आणि घरीदेखील शांतता नाही,’ असे पुटपुटत दादा निघाले. संध्याकाळी घरी जायची वेळ होती. भाचाही घरी जाण्याच्या तयारीत होता. दोघे एकदमच उतरले. दादांनी भाच्याला म्हटले, बस माझ्या गाडीत ‘घरी सोडतो तुला.’ भाचा दादांच्या गाडीत बसला. कार्यालयापासून २०मिनिटांवर भाच्याचे घर होते. गाडी सुरू झाली व भाच्याचे घरही आले. वीस मिनिटे कशी गेली कळलेच नाही. गाडीत मौन होते, पण दोघांच्याही डोक्यात विचारांचा गोंधळ होता. घरी पोहोचल्यावर भाच्याने दादांना ‘चहा घेऊन जा’ असे म्हटले. उशीर झालेला तरी दादा उतरले. घराजवळ येऊनही आत न जाणे बरे दिसले नसते म्हणून दादा ‘पाच मिनिटांकरिता येतो’ असे म्हणाले. घराच्या दाराशी एक झाड होते. भाच्याने त्या झाडावर हात फिरवला, काहीतरी केले. दादांना काही कळले नाही. दाराची बेल मग त्याने वाजवली. दार उघडताच भाच्याच्या चेहर्यावरचे भाव एकदम बदलूनच गेले. त्याने हसत आपल्या बायकोला म्हटले, ‘‘पोचलो एकदाचा. किती छान वाटतंय आता. दादांसाठी मस्त चहा आण पाहू. समोर आलेल्या आपल्या पोरांना घट्ट मिठी मारली व खिशातून चॉकलेट काढून पोरांना दिले. दादांना हे सर्व पाहून प्रचंड आश्चर्य झाले. ऑफिसमध्ये वैतागलेला हा माणूस अचानक एका क्षणात कसा काय एवढा आनंदी झाला? गाडीतले मौन, विचारांची मारामारी खरी होती की हे घरातले हसणे-खिदळणे आणि आनंद? दादांना प्रश्नच पडला. चहा घेऊन दादा निघाले. भाचा दादांना गाडीपर्यंत सोडण्यासाठी आला. गाडीत बसता बसता दादांनी भाच्याला विचारले ‘‘दोन गोष्टी कळल्या नाहीत बेटा. त्या घराबाहेरील झाडाला तू काय केलेस आणि घरी पोहोचताच तुझे मौन पळून गेले. काय हे?’’ त्यावर भाचा म्हणाला, ‘‘दादा, मी रोज घरी आलो की या झाडावर माझे सर्व त्रास टांगतो आणि आत जातो. त्यामुळे मी घरी पोहोचताच प्रसन्न होतो. दुसर्या दिवशी घरून निघताना पुन्हा त्या झाडावरून उचलतो. पण काल टांगलेले काही पडतात रात्रभरात आणि सकाळी कधीकधी त्रास झाडावर सापडतच नाहीत. हे आहे ‘‘त्रासांचे झाड.’’ प्रत्येकाने आपल्या घराबाहेर असेच एक त्रासांचे झाड लावावे. घरी जाताना त्रास बाहेर टांगून आत जावे. घरात फक्त आनंद असावा, त्रास नाही.
〰〰〰〰〰〰〰〰〰
*📝संकलन/ समूह प्रशासक*
*✒श्रीमती प्रमिलाताई सेनकुडे (शिंदे)*
जि.प.प्रा.शा.वाटेगाव
ता.हदगाव, जि. नांदेड
http://www.pramilasenkude.blogspot.in
*©मराठीचे शिलेदार समूह*
🐪🐴🐆🐊🐬🐍🐌🐁🐕🦃
========***********=======
🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏 पुन्हा भेटू उद्या
फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार
========***********=========
Very useful for the school.
ReplyDeleteRegards www.englishwithmahure.blogspot.in