1⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 1⃣
📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹
📱 9970558244
🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢
📱 9423625769
🕖 प्रसारण वेळ : 06:50 ते 07:00 am
----------------------------------------------------
http://fmbuleteen.blogspot.com
----------------------------------------------------
📅 दि. 21/11 /2016 वार - सोमवार
========***********=========
📆 . . दिनविशेष . . 📆
*सेना दिन : बांगलादेश*
⏳१९७१ : भारतीय वायु सैन्याची पाकिस्तानी सैन्याशी बांगलादेश मुक्ती युद्धांतील गरीबपुरच्या लढाईत पहिली चकमक. पाकिस्तानचा सपशेल पराभव.
💥 जन्म :-
⏳१९१० : छ्यान चोंग्शू, चिनी भाषेमधील लेखक, अनुवादक.
💥 मृत्यू :-
⏳१९६३ : चिं. वि. जोशी, मराठी विनोदी लेखक
⏳ १९७० : सर सी.व्ही. रमण, भारतीय शास्त्रज्ञ.
✏ सौजन्य : -
www.marathimati.com
========***********=========
*आजच्या ठळक बातम्या*
1⃣ दुसऱ्यांच्या खात्यात पैसे टाकणाऱ्यांना होणार सात वर्षे शिक्षा. काळा पैसा धारकांवर होणार कठोर कारवाई.
2⃣ 2022 साली जेव्हा भारत स्वातंत्र्याची 75 वर्षे पूर्ण करेल, तेव्हा देशातील प्रत्येक भारतीयाकडे घर असावे असा सरकारचा संकल्प पंतप्रधाना नरेंद्र मोदी यांचे प्रतिपादन
3⃣ स्वच्छ तन, मन आणि धन हाच मोदी सरकारचा मूलमंत्र व्यंकय्या नायडू यांचे प्रतिपादन
4⃣ 47 व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाला गोव्यात सुरुवात. केंद्रीय मंत्री व्यंकय्या नायडू, मनोहर पर्रिकर आणि गोव्याचे मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांच्या उपस्थितीत झाले उद्घाटन
5⃣ इंदुर - पाटणा रेल्वे एक्सप्रेसचा अपघात 126 ठार तर 200 जखमी
6⃣ विशाखापट्टणम कसोटी : चौथ्या दिवसअखेर इंग्लंडच्या 2 बाद 87 धावा.
7⃣ चायना ओपन बॅडमिंटनच्या विजेतेपदानंतर पी व्हि सिंधूवर शुभेच्छांचा वर्षाव, पंतप्रधान नरेंद्र मोदी, सचिन तेंडूलकरने केले कौतुक
🇮🇳 सौजन्य -
http://m.lokmat.com
========***********=========
*🌷 फ्रेश सुविचार 🌷*
वाहतो तो झरा आणि थांबते ते डबकं ! डबक्यावर डास येतात आणि झऱ्यावर राजहंस !!
[ या बुलेटिनसाठी सुविचार पाठवू शकता. ]
========***********=========
*आजचा मराठी शब्द*
*महोत्सव*
========***********=========
*🎂 आजचा वाढदिवस*
👤 कु. प्रेरणा खेडकर रा. मंचर,
ता. आंबेगाव, जिल्हा - पुणे
👤 प्रशांत शास्त्री, वरिष्ठ व्यवस्थापक
महाराष्ट्र ग्रामीण बँक, औरंगाबाद
[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा पाठवू शकता. ]
========***********=========
🎯 विचारवेध...........✍🏻
________________________
झाडाला बांधलेला झोका जसा वर चढताना आनंददायक वाटतो आणि खाली येत असताना विषण्ण वाटतो.तसेच जीवनामध्येही सुखदुःखाचे चढउतार कमीजास्त
प्रमाणात होत असतात.
दोन्हीही प्रसंगाना जो सामोरे जातो तोच जीवनात यशस्वी होतो.
________________________
- व्यंकटेश काटकर,नांदेड.
भ्रमण.9421839590
🌅🌅🌅🌅🌅🌅🌅🌅🌅🌅🌅🌅🌅🌅
========***********=========
*आजची लिंक*
पैसा झाला खोटा*
http://nasayeotikar.blogspot.com/2016/11/blog-post.html
========***********=======
📝📚📝📚📝📚📝📚📝📚
========================
बोधकथा
*♻ मनामनांतील अंतर*♻
एकदा गौतम बुद्धांनी त्यांच्या शिष्यांना विचारले, "आपण रागात असताना जोरात ओरडतो किंवा कोणाशी भांडण झाले असल्यास आपोआप आपला आवाज वाढतो, असे का?"
सर्व शिष्य विचार करु लागले. एक शिष्याने उत्तर दिले, "रागावलेले असताना आपण स्वतःवरचे नियंत्रण हरवुन बसतो, आणि म्हणुनच कदाचित ओरडून बोलतो."
यावर गौतम बुद्ध म्हणाले, "पण ज्या व्यक्तीवर आपण रागावलेले असतो ती समोरच असते तरीसुध्दा आपण ओरडतो... जरी सौम्य आणि मृदु आवाजात बोलणे शक्य असले तरी देखील रागात आपण चढ्या आवाजातच बोलतो".
यावर सर्व शिष्यांनी विचार केला आणि आपापल्या परीने उत्तर देण्याचा प्रयत्न केला. मात्र कोणत्याच उत्तराने बुद्धांचे समाधान झाले नाही.
शेवटी बुद्धांनी स्वतःच उत्तर दिले.
ते म्हणाले, "जेव्हा दोन व्यक्ती एकमेकांवर रागावलेल्या असतात तेव्हा त्यांच्या मनांमध्ये अंतर वाढलेले असते आणि हेच अंतर भरुन काढण्याकरीता ते चढ्या आवाजात बोलतात."
"आता मला सांगा की जेव्हा दोन व्यक्ती परस्परांच्या प्रेमात असतात तेव्हा अतिशय हळू आणि शांतपणे बोलतात, असे का?"
असा प्रश्न विचारुन मग स्वतःच उत्तर देत ते म्हणाले....
"कारण त्यांची मनं जवळ आलेली असतात. दोन मनांतील अंतर कमी झालेले असते. आणि जसजसे दोन्ही मनात प्रेम वाढु लागते तसतसे त्यांच्यातील संवाद इतका सुलभ होउन जातो की सर्वच गोष्टी बोलण्याची देखील आवश्यकताच भासत नाही. फक्त नजरेतूनच किंवा देहबोलीतूनच ते आपल्या साथीदाराला काय म्हणायचे आहे ते ओळखतात.
*तात्पर्यः शिकवण - परस्परांत वादविवाद आणि भांडणतंटे होतच राहतात मात्र कितीही वादविवाद असला तरी मनामनातील अंतर वाढू देऊ नका... तसे होऊ दिल्यास दोन व्यक्तिंमधील दरी इतकी मोठी होईल की पुन्हा ती मिटवणे कधीच शक्य होणार नाही.*
〰〰〰〰〰〰〰〰〰
*📝शब्दांकन/ संकलन/तथा समूह प्रशासक*📝
*✒श्रीमती प्रमिलाताई सेनकुडे (शिंदे)*
जि.प.प्रा.शा.वाटेगाव
ता.हदगाव, जि. नांदेड
http://www.pramilasenkude.blogspot.in
*©मराठीचे शिलेदार समूह*
========***********=======
🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏 पुन्हा भेटू उद्या
फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार
========***********=========
Comments
Post a Comment