1⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 1⃣
📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹
📱 9970558244
🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢
📱 9423625769
🕖 प्रसारण वेळ : 06:50 ते 07:00 am
----------------------------------------------------
http://fmbuleteen.blogspot.com
----------------------------------------------------
📅 दि. 22/11 /2016 वार - मंगळवार
========***********=========
📆 . . दिनविशेष . . 📆
⏳२००५ : एंजेला मर्केल जर्मनीची सर्वप्रथम स्त्री चान्सेलर झाली.
💥 जन्म :-
⏳१९६७ : बोरिस बेकर, जर्मन टेनिस खेळाडू.
💥 मृत्यू :-
⏳२००२ : गोविंदभाई श्रॉफ, हैद्राबाद मुक्तिसंग्रामाचे अध्वर्यू.
✏ सौजन्य : -
www.marathimati.com
========***********=========
*आजच्या ठळक बातम्या*
1⃣ माजी मंत्री सुशीलकुमार शिंदे यांना सोलापूर विद्यापीठाची डी. लिट पदवी जाहीर
2⃣ रब्बी साठी बियाणे खरेदीसाठी जाणाऱ्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा. बियाणे खरेदीसाठी पाचशे रुपयांच्या जुन्या नोटा चालणार.
3⃣ राजीव गांधी जीवनदायी योजनेत रुग्णांना लाभ देणाऱ्यात कोल्हापूर राज्यात पहिले, भंडारा जिल्हा सर्वात मागे.
4⃣ केरळमधील प्रसिद्ध सबरीमाला मंदिर आता सबरीमाला श्री अयप्पास्वामी मंदिरम्हणून ओळखले जाणार.
5⃣ 2019 पर्यंत राज्यातील सर्वांना हक्काचं घर उपलब्ध करून देणार, मुख्यमंत्री देवेंद्रफडणवीस यांची फैजपूरच्या जाहीर सभेत घोषणा.
6⃣ माजी गृहसचिव जी.के. पिल्लई यांच्याकडे बीसीसीआयचा कार्यभार सोपवावा, लोढा समितीची सर्वोच्च न्यायालयात मागणी.
7⃣ इंग्लंडविरोधातील दुसरा कसोटी सामना भारताने तब्बल 246 धावांनी विजय मिळवला आहे. भारताने फक्त 158 धावांवर इंग्लंड संघाला ऑल केलं आऊट
🇮🇳 सौजन्य -
http://m.lokmat.com
========***********=========
*🌷 फ्रेश सुविचार 🌷*
ज्या चांगल्या बाबी आपण निर्माण केल्या नाहीत त्या नष्ट करण्याचा आधिकार आपल्याला नाही.
[ या बुलेटिनसाठी सुविचार पाठवू शकता. ]
========***********=========
*आजचा मराठी शब्द*
*नष्ट*
========***********=========
*🎂 आजचा वाढदिवस*
👤 चिं. अनुराग मारुती खुडे रा. पाचुंदा
ता. माहूर जि. नांदेड
👤 साईप्रसाद यनगंदेवार, माध्यमिक शिक्षक
जि. प. हा. करखेली
👤 अरुण पवार, प्राथमिक शिक्षक
👤 पांडुरंग पुट्ठेवाड, संपादक रानफुल
[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा पाठवू शकता. ]
========***********=========
🎯 विचारवेध..........✍🏻
+×+×+×+×+×+×+×+×+×+×
जीवनाच्या उत्कर्षासाठी चांगला विचार करणे आणि जो केलेला विचार आपल्या हिताचा नाही तो सोडून देणे ह्या दोन विचारामधला फरक आहे. चांगला विचार याच्यासाठी करायचा की, त्यातून नवीन काहीतरी जन्म घेऊन जीवनाला चालना मिळेल आणि सद्यस्थितीत बदल घडवून आणेल हा सकारात्मक विचार निर्माण होण्यासाठी चांगला विचार करणे. जो विचार केल्यानंतर तो आपल्या फायद्याचा नाही.अशा विचाराला थारा न देता सोडून देणे.हा ही विचार करायला पाहिजे.
या दोन्ही विचांराचा फरक जाणून जीवन जगतो तो जीवनात चांगला यशस्वी होतो. ज्यांना कोणत्याही विचारामधला फरक कळत नाही तो आपल्या जीवनात यशस्वी होऊ शकत नाही.
- व्यंकटेश काटकर, नांदेड
भ्रमण.9421839590.
✅❎✅❎✅❎✅❎
========***********=========
*आजची लिंक*
से नो टू सेल्फी
http://nasayeotikar.blogspot.com/2016/11/selfi.html
========***********=======
*आजची बोधकथा*
📝📚📝📚📝
*♻ मोह* ♻
=========================
एका नगरात एक पुजारीबाबा राहत होते. शेजारच्या गावातील पुजाऱ्याचे अकस्मात निधन झाल्याने या
पुजारी बाबाना त्या गावात पुजारी म्हणून नियुक्त केले गेले. त्यानंतर एकदा त्या गावी जाण्यासाठी पुजारी बाबा बसमध्ये चढले, त्यांनी कंडक्टरला पैसे दिले आणि ते आपल्या जागेवर जाऊन बसले.
कंडक्टरने तिकिटाचे पैसे घेतले व उरलेली रक्कम पुजारीबाबाना परत केली तेंव्हा त्यांच्या असे लक्षात आले कि त्यात १० रुपये जास्त आले आहेत. पुजारीबाबानी असा विचार केला कि आता कंडक्टर घाईत आहे तेंव्हा त्यांना थोड्या वेळाने पैसे परत करू या. काही वेळ झाला कंडक्टर अजूनही त्याचे तिकिटे देण्याचे काम करतच होता.
पुजारीबाबांच्या मनात एक विचार आला कि आता
तर कंडक्टर इतका घाईत आहे कि त्याला ते १० रुपये परत केले काय आणि नाही केले काय काय फरक पडणार आहे. सरकारी बस कंपनी इतके पैसे मिळवते प्रवाशांकडून मग इतक्या छोट्या रकमेने त्यांना काय होणार? लाखो रुपयांचे व्यवहार करणाऱ्या कंपनीकडून हे १० रुपये आपल्या सारख्या पुजाऱ्याला भेट मिळाले असेच आपण समजू. आपण याचा काही तरी सदुपयोग करू शकू.
पुजारीबाबांच्या मनात असे विचार चालू असतानाच त्यांचे उतरायचे ठिकाण आले. बसमधून उतरताना अचानक त्यांचा हात खिशाकडे गेला व त्यातून ती दहा रुपयाची नोट त्यांनी बाहेर काढली व कंडक्टरला परत दिली व म्हणाले,
"भाऊ !! .......तुम्ही मघाशी मला तिकिटाचे पैसे परत करताना घाईगडबडीत हे दहा रुपये जास्त दिले आहेत."
कंडक्टर हसून म्हणाला,"महाराज! तुम्हीच या गावाचे नवे पुजारी आहात का?"
पुजारीबाबा हो म्हणाले.
त्यावर कंडक्टर पुन्हा बोलू लागला," महाराज, माझ्या मनात तुमचे प्रवचन ऐकण्याची खूप इच्छा होती. तुम्हाला बसमध्ये चढताना पाहिले आणि मनात एक विचार आला कि चला आपल्याला या कामामधून वेळ मिळत नाही आणि तुमची भेट घडून येत नाही तेव्हा तुम्ही जसे प्रवचनात उपदेश करता ते आचरणात आणता काय याचा पडताळा घ्यावा म्हणून मी ते दहा रूपये तुम्हाला मुद्दाम जास्त दिले होते. पण मला आता कळून चुकले आहे की तुम्ही जसे बोलता तसेच तुमचे पवित्र आचरण आहे.
महाराज मला क्षमा करा.'' एवढे बोलून कंडक्टरने
गाडी पुढे जाण्यासाठी बेल वाजवली.
पुजारीबाबांना आता घाम फुटला होता, ते घाम
पुसत आकाशाकडे पहात म्हणाले,'' प्रभो, तुझी लीला अपरंपार आहे, दहा रूपयांचा मोह मला आत्ता किती महागात पडू शकला असता पण तुम्ही मला त्यातून वाचवले. देवा तू खरंच दयाळू आहेस. अचानक का होईना त्या दहा रूपयांच्या मोहातून तू मला बाहेर काढले व समाजात होणारी माझी बदनामी थांबवली.''
*तात्पर्यः*
मोह हा वाईट असतो, ज्याक्षणी मोहाने मन ग्रासते त्याक्षणीच मानव प्रगतीकडून अधोगतीकडे प्रवास करू
लागतो.
〰〰〰〰〰〰〰〰〰
*📝 संकलन/समूह प्रशासक*
*✒श्रीमती प्रमिलाताई सेनकुडे (शिंदे)*
जि.प.प्रा.शा.वाटेगाव
ता.हदगाव, जि. नांदेड
http://www.pramilasenkude.blogspot.in
*©मराठीचे शिलेदार समूह*
========***********=======
🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏 पुन्हा भेटू उद्या
फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार
========***********=========
Comments
Post a Comment