दिनांक 23 नोव्हेंबर 2016


1⃣  🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 1⃣
📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹
📱 9970558244
🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢
📱 9423625769
🕖 प्रसारण वेळ : 06:50 ते 07:00 am
----------------------------------------------------
http://fmbuleteen.blogspot.com
----------------------------------------------------
📅 दि.23 /11 /2016 वार - बुधवार
========***********=========
               📆 . . दिनविशेष . . 📆
⏳२००३ : जॉर्जियाच्या राष्ट्राध्यक्ष एदुआर्द शेवर्दनात्झेने राजीनामा दिला.
💥 जन्म :-
⏳१८७२ : कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर, मराठी लेखक.
💥 मृत्यू :-
⏳१९३७ : जगदीश चंद्र बोस, भारतीय वनस्पती शास्त्रज्ञ.
✏ सौजन्य : -
www.marathimati.com
========***********=========
*आजच्या ठळक बातम्या*
1⃣ काळा पैसा आणि भ्रष्टाचार आपण का सहन करायचा. आपल्य़ाला आता भविष्याचा विचार करायला हवा. त्याबाबत कोणतीही तडजोड करता कामा नये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे प्रतिपादन
2⃣ बदलापूर येथील स्टेशन परिसरात नगरपालिकेची मोठी कारवाई, स्टेशन परिसरातील रस्त्यालगतच्या दुकानांवर कारवाई.
3⃣ जम्मू-काश्मिरच्या माछिल सेक्टरमध्ये दहशतवाद्यांबरोबर चकमकीत तीन जवान शहीद, एक जवानच्या मृतदेहाची विटंबना केली
4⃣ दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी अरुण जेटलींनी दाखल केलेल्या अब्रूनुकसानीच्या याचिकेवर स्थगिती आणण्याची केलेली मागणी सर्वोच्च न्यायलयाने फेटाळली.
5⃣ जुन्या नोटा स्वीकारण्यास जिल्हा बँकांना घातलेल्या बंदी विरोधात जिल्हा बँक असोशिएशनने उच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेवरील सुनावणी पुढे ढकलण्यात आली आहे, २४ नोव्हेंबरला गुरुवारी आता सुनावणी होईल.
6⃣ नांदेड विधान परिषद निवडणुकीत कॉंग्रेसचे अमर राजुरकर विजयी, राजुरकर यांना 251 मते तर अपक्ष उमेदवार श्याम सुंदर शिंदे यांना 208 मते, 12 मतदान ठरले बाद, 43 मतांनी कॉंग्रेसचा विजय
7⃣इंग्लंडविरुद्धच्या आगामी तीन कसोटीसाठी भारतीय संघाची घोषणा, गंभीर आऊट तर भुवनेश्वर कुमार इन
💥 गायक, संगीतकार एम. बालमुरलीकृष्ण यांचं 86व्या वर्षी निधन, बालमुरलीकृष्ण पद्मविभूषण, पद्मभूषण, पद्मश्री पुरस्कारांचे मानकरी
🇮🇳 सौजन्य -
http://m.lokmat.com
========***********=========
*🌷 फ्रेश सुविचार 🌷*
सौंदर्य हे वस्तूत नसते; पाहणाऱ्याच्या दृष्टीत असते.

[ या बुलेटिनसाठी सुविचार पाठवू शकता. ]
========***********=========
*आजचा मराठी शब्द*
             *सौंदर्य*
========***********=========
*🎂 आजचा वाढदिवस*
👤 जगन्नाथ भगत
👤 आदित्य खांडरे

[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा पाठवू शकता. ]
========***********=========
*आजचा विचारवेध*
🎯 विचारवेध...........✍🏻
_______________________
पानाफुलांनी व फळांनी झाड जसे खुलून दिसते आणि सभोवतालचा परिसराला मंत्रमुग्ध करुन सोडते.त्याचप्रमाणे सज्जन माणसांचे आहे.सज्जन माणसंही जेथे जेथे असतील त्यांचा सहवास ज्यांना ज्यांना लाभला आहे त्या माणसांना आनंद,सुख आणि समाधान नक्कीच मिळते.जणू सज्जन माणसे विशाल वृक्षाची भूमिका बजावत असतात.

- व्यंकटेश काटकर,
    नांदेड.
संवाद..9421839590.

🌳🌹🌳🌹🌳🌹🌳🌹
========***********=========
*आजची लिंक*
ऑफलाइन शाळेची ऑनलाइन कामे

http://nasayeotikar.blogspot.com/2016/08/on-off.html
========***********=======
*आजची बोधकथा*
🌻🍃🌻🍃🌻🍃🌻🍃🌻
 
   🌄 *महाराष्ट्र शिक्षक पॅ नल*🌄
••●==🇲=◆=🇸=◆=🇵==●••
    🔰 *बोधकथा क्रमांक१७*  🔰

        *स्वत:च्या नाशाची कारणे*
*~~~~~~~~~~~~~~~~~~*
एकदा वनराज सिंह खूप आजारी पडला. त्याची प्रकृती विचारण्यासाठी सगळे पशू रोज येत असत, पण कोल्हा मात्र येत नसे. कोल्ह्याचे आणि लांडग्याचे शत्रुत्व होते. या गोष्टीचा फायदा घेऊन लांडग्याने सिंहास सांगितले की, 'महाराज, कोल्हा हल्ली आपल्या दरबारात नसतो. त्यावरून तो आपल्या विरुद्ध काही कपट-कारस्थान करत असावा असं मला वाटतं. हे ऐकून सिंहाने ताबडतोब कोल्ह्याला बोलावणे पाठवले व त्याला विचारले, 'काय रे, मी इतका आजारी असूनही तू मला भेटायला आला नाहीस, याचा अर्थ काय ?'

तेव्हा कोल्ह्याने उत्तर दिले. 'महाराज, मी आपल्याच करता एखादा चांगलासा वैद्य पहात होतो. कालच मला एका मोठ्या वैद्याने सांगितलं की नुकतंच काढलेलं लांडग्याचं कातडं पांघरलं असता, हा रोग बरा होईल.'

सिंहाला ते खरे वाटले व त्याने कातड्यासाठी ताबडतोब लांडग्याला ठार मारले.
=========================
*तात्पर्य: दुसर्‍याच्या विनाशाची इच्छा करणारे लोक बहुधा स्वतःच नाश पावतात.*
=========================
     ✒शब्दांकन/ संकलन ✍🏻
      *श्रीमती वर्षा देशमुख*  
   *जि.प.के.प्रा.शा दावरवाडी*   
     *ता.पैठण जि .औरंगबाद*
••●==🇲=◆=🇸=◆=🇵==●••
========***********=======
🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏 पुन्हा भेटू उद्या
फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार
========***********=========

Comments