1⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 1⃣
📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹
📱 9970558244
🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢
📱 9423625769
🕖 प्रसारण वेळ : 06:50 ते 07:00 am
----------------------------------------------------
http://fmbuleteen.blogspot.com
----------------------------------------------------
📅 दि. 24/11 /2016 वार - गुरुवार
========***********=========
📆 . .आजचा दिनविशेष . . 📆
*राष्ट्रीय ग्राहक दिन*
⏳१९७६ : तुर्कस्तानच्या पूर्व भागात झालेल्या भूकंपात ४,०००-५,००० मृत्युमुखी.
💥 जन्म :-
⏳१९३७ : केशव मेश्राम, मराठी भाषेतील लेखक, कवी, नाटककार व समीक्षक.
💥 मृत्यू :-
⏳१९६३ : मारोतराव कन्नमवार, महाराष्ट्राचा मुख्यमंत्री
✏ सौजन्य : -
www.marathimati.com
========***********=========
*आजच्या ठळक बातम्या*
1⃣ नोटा बंदीच्या निर्णया विरोधात विरोधी पक्ष २८ नोव्हेंबर रोजी देशभरात करणार निदर्शने
2⃣ ज्यांचे पैसे बुडतात, तेच आरडाओरडा करतात, निर्णयाची माहिती त्यांना आधी का नाही दिली, हीच बाब त्यांना खुपते आहे भाजपा खासदार परेश रावल
3⃣ जीएसटी परिषदेची 25 नोव्हेंबरची बैठक 2 आणि 3 डिसेंबरला होणार
4⃣ दोन महिन्यांचा पगार बँकेत नको तर रोख स्वरूपात द्या, राज्य सरकारी कर्मचारी संघटनेची मागणी
5⃣ बंगळुरु केजी रोडवरील एटीएममध्ये कॅश भरण्यासाठी निघालेला व्हॅनचालक गाडी घेऊन पळाला, १ कोटी ३७ लाखाची कॅश होती.
6⃣ तब्बल 8 वर्षानंतर मोहाली येथे होणाऱ्या इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या कसोटी सामन्यासाठी पार्थिव पटेलची भारतीय संघात अंतिम १६ जणांमध्ये करण्यात आली निवड
7⃣ शानदार फॉर्मात असलेला भारतीय कर्णधार विराट कोहली कारकिर्दीत प्रथमच एका कॅलेंडर वर्षात एक हजार धावांचा पल्ला गाठण्याच्या समीप पोहोचला आहे.
🇮🇳 सौजन्य -
http://m.lokmat.com
========***********=========
*🌷 आजचा फ्रेश सुविचार 🌷*
आपल्याला जे आवडतात त्यांच्यावर प्रेम करण्यापेक्षा ज्यानां आपण आवडतो त्यांच्यावर प्रेम करा.
[ या बुलेटिनसाठी सुविचार पाठवू शकता. ]
========***********=========
*आजचा मराठी शब्द*
*कारकिर्द*
========***********=========
*🎂 आजचा वाढदिवस*
👤 खंडू मोरे, सकाळ बातमीदार
👤 पंडित नलावाडे
👤 नागेश सब्बनवार, धर्माबाद
👤 गंगाधर वाढवणकर, येवती
[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा पाठवू शकता. ]
========***********=========
*आजचा सुविचार धारा..*
चेहऱ्यावर नेहमी गोड हास्यासाठी राखीव जागा ठेवा. कारण जितके हास्य चेहऱ्यावर फुलेल तितकचं सुख समाधान खळखळून खुलुन दिसेल. खुलणारा चेहरा अन प्रसन्न झालेलं मन नेहमीच एक आगळा वेगळा आनंद देऊन जाईल
रोहिदास होले, गोपाळवाडी
दौंड, पुणे 9028341536
========***********=========
*आजची लिंक*
*नासा येवतीकर यांचे वैचारिक पुस्तक*
*पाऊलवाट : शिक्षण क्षेत्रातील एक दिशादर्शक*
http://nasayeotikar.blogspot.com/2016/11/blog-post_23.html
नांदेडचे प्रसिध्द ग्रामीण कथाकार
*श्री दिगंबर कदम*
यांनी पुस्तक-परिचय करून दिले आहे.
पुस्तकाची मूळ किंमत 160 रु. पण
सवलतीच्या दरात फक्त 100 रु.
========***********=======
*आजची बोधकथा*
📝🍃📝🍃📝🍃📝🍃📝🍃📝
🎀 *कोल्हा* 🎀
*एका कोल्ह्याचे शेपूट लोखंडी* सापळ्यात सापडले असता ते तोडून तो पळाला. प्रथम त्याला आनंद झाला की प्राणांवरचे शेपटीवर निभावले.
पण जेव्हा तो आपल्या मंडळीत जाऊ लागला, तेव्हा त्याला आपल्या लांडेपणाचे फार वाईट वाटून तो मनात म्हणाला, 'मी मेलो असतो तर बरं झालं असतं. पण ही अप्रतिष्ठा वाईट, पण जे झाले त्याला उपाय नाही. आता हेच कसं शोभवून नेलं म्हणजे झालं ! यासाठी काय बरं युक्ती करावी ?'
याचा तो विचार करीत असता त्याला एक युक्ती सुचली ती अशी की आपण सर्व कोल्हे मंडळींना एकत्र जमवून सांगावे की, 'माझी शेपटी मी तोडून टाकून ही भूषणाची नवी पद्धत काढली आहे. ही चांगली आहे अन् तुम्हीसुद्धा अवश्य करावं.'
मग त्याने सगळ्या कोल्ह्यांना आपल्या घरी बोलावले व आपल्या युक्तीप्रमाणे त्यांच्यापुढे भाषण दिले. तो म्हणाला, 'अहो, या शेपटीपासून काहीच फायदा नाही. आपल्याला शेपटी म्हणजे ओझंच. शेपटी तोडून टाकल्यानं एक प्रकारचं सौंदर्य येऊन शिवाय पळण्यातली अडचण दूर होते. मी ह्या गोष्टीचा अनुभव घेतला आहे नि शेपटी तोडल्यापासून सुखी आहे. हे सुख तुम्हाला प्राप्त व्हावं असं मला वाटलं.'
इतके बोलून आपले कितीजण ऐकतात हे पाहण्यासाठी तो सगळ्यांकडे पाहू लागला. इतक्यात एक म्हातारा कोल्हा त्याची लबाडी ओळखून मान वाकडी करून म्हणाला, 'अहो, पंडित महाराज, आपली हुषारी पुरे. शेपटी काढल्यामुळे तुमचं कल्याण झालं असेल, यात शंका नाही. अन् आमच्यावर जेव्हा वेळ येईल तेव्हा आम्हीही आपली शेपटी कापून टाकू. तोपर्यंत तुम्ही आम्हाला आग्रह करू नये हेच बरं.'
〰〰〰〰〰〰〰〰〰
🎀 *तात्पर्य* : - *आपली अप्रतिष्ठा होऊ नये म्हणून आपले दोष हे नसून गुण आहेत असे बरेचजण सांगतात पण शहाणे लोक त्यांच्या बोलण्यावर विश्वास ठेवत नाहीत.*
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
🙏 *शब्दांकन/संकलन*🙏
✍� *कविता देशमाने*
*जि.प.प्रा.शा. सानेगुरुजी नगर,
नळेगाव, ता.चाकूर, जि. लातूर*
☘🔰☘🔰☘🔰☘🔰☘🔰☘
========***********=======
🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏 पुन्हा भेटू उद्या
फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार
========***********=========
Comments
Post a Comment