1⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 1⃣
📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹
📱 9970558244
🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢
📱 9423625769
🕖 प्रसारण वेळ : 06:50 ते 07:00 am
----------------------------------------------------
http://fmbuleteen.blogspot.com
----------------------------------------------------
📅 दि. 25/11/2016 वार - शुक्रवार
========***********=========
📆 . . दिनविशेष . . 📆
⏳२०१२ : बांगलादेशच्या ढाका शहरात कपडे बनविणाऱ्या कारखान्यात आग लागून ११७ ठार.
💥 जन्म :-
⏳१८८२ : सावळाराम लक्ष्मण हळदणकर, मराठी चित्रकार
💥 मृत्यू :-
⏳१९८४ : यशवंतराव चव्हाण, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री.
✏ सौजन्य : -
www.marathimati.com
========***********=========
*आजच्या ठळक बातम्या*
1⃣ महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासोबतच्या बैठकीनंतर राज्यभरातील तलाठ्यांचं आंदोलन मागे, सातबारा संगणकीकृत करण्यास तलाठ्यांची मान्यता.
2⃣ राष्ट्रीय महामार्गांवर २ डिसेंबरपासून टोल सुरू झाल्यानंतर १५ डिसेंबरपर्यंत जुन्या ५०० च्या नोटा स्वीकारल्या जातील - केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची माहिती.
3⃣ जुन्या नोटा ठराविक ठिकाणी स्वीकारण्याची मुदतवाढ होण्याची शक्यता अधिकृत सूत्र
4⃣ 2017 पासून नववीच्या वर्गासाठी पुर्नपरीक्षा होणार, नाशिक विभागाच्या माध्यमिक शिक्षण मंडऴाचे सचिव मच्छींद्र कदम यांची माहिती.
5⃣ नोटाबंदीमुळे हरयाणा सरकार क आणि ड श्रेणीच्या सरकारी कर्मचा-यांना त्यांच्या वेतनातील १० हजार रुपये रोखीने देणार.
6⃣ दक्षिण आफ्रिका-ऑस्ट्रेलिया तिसरी कसोटी, फॅफ डुप्लेसीसचं झुंजार शतक, आफ्रिका 9 बाद 229
7⃣ भारताची बॅडमिंटनपटू पी.व्ही.सिंधू हिने हाँगकाँग ओपनच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे. हाँगकाँग ओपनच्या दुसऱया फेरीत पी.व्ही.सिंधूने चीनच्या ह्सू या चिंग हिचा २१-१०, २१-१४ असा पराभव केला.
🇮🇳 सौजन्य -
http://m.lokmat.com
========***********=========
*🌷 फ्रेश सुविचार 🌷*
माणसाने आपल्या आयुष्यात सुख-दुःख मानापमान, स्फूर्ती-निंदा, लाभ हानी, प्रिय-अप्रिय ह्या गोष्टी समान समजाव्यात.
[ या बुलेटिनसाठी सुविचार पाठवू शकता. ]
========***********=========
*आजचा मराठी शब्द*
*स्फूर्ती*
========***********=========
*🎂 आजचा वाढदिवस*
👤 विलास ढवळे, जि.प. नांदेड
👤 नितीन देशमुख, पत्रकार, धर्माबाद
👤 अंकुश बल्लेवार
👤 शिवाजी पाटील कदम
👤 अथर्व नरेश वाघ
[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा पाठवू शकता. ]
========***********=========
*आजचा विचारवेध*
🌺 विचारवेध......✍🏻
**************
सा-यांचं आयुष्यच खरं तर एकमेकांच्या आधारावर अवलंबून असते. आधाराशिवाय कुणाचीही जीवननौका पार होऊ शकत नाही. मनामध्ये कोणताही संकुचित विचार न ठेवता ज्यांना आधाराची गरज आहे त्यांना सढळ मनाने, सढळ हाताने मदतीचा हात पुढे करणे हे आपले आद्य कर्तव्य आहे. ते आपण मानवतेचा दृष्टीकोन ठेवूनच आधार द्यावा. आधार हा आधारच असतो. आधाराचे व्रत सा-यांनीच करावे. त्यातच दोघांनाही खरे समाधान वाटते.
- व्यंकटेश काटकर, नांदेड
9421839590
🌺🌹🌺🌹🌺🌹🌺
========***********=========
*आजची लिंक*
*http://jeevangaurav.blogspot.in/2016/11/blog-post_26.html?m=1*
*जीवन गौरव अंक अकरावा*
*पाहण्यासाठी वरिल इंग्रजी निळ्या अक्षरावरती क्लिक करा.*
ध्यास शैक्षणिक व सामाजिक परिवर्तनाचा...!
========***********=======
*आजची बोधकथा*
📝🍃📝🍃📝🍃📝🍃📝🍃📝
🎀 *कोल्हा व लांडगा* 🎀
*एक कोल्हा एकदा एका लांडग्याला* म्हणाला, 'मित्रा माझी स्थिती किती वाईट आहे याची तुला कल्पना नाही. एखादा म्हातारा कोंबडा किंवा मरायला टेकलेली अशक्त कोंबडी यांच्या मांसावर मला उदरनिर्वाह करावा लागतो. त्यामुळे मी अगदी कंटाळल्यासारखा झालो आहे. शिवाय भक्ष्य मिळवताना आपला जीव धोक्यात घालण्याचा प्रसंग तुला क्वचित येत असेल. मला भक्ष्याच्या शोधासाठी गावठाणात लपतछपत फिरावं लागतं. तुझं तसं नाही. तू आपलं भक्ष्य रानात; कुरणात मिळवू शकतोस. ही तुझी विद्या मला शिकवशील तर बरं होईल. तुझ्या हाताखाली शिक्षणासाठी राहिल्याने कोल्ह्याच्या वंशात जन्म घेऊन पहिल्याने मेंढी मारून खाण्याचा मान मिळेल, अशी माझी अपेक्षा आहे. तू मला शिकवलंस तर आपले श्रम फुकट गेले असं म्हणायची वेळ तुझ्यावर नक्कीच येणार नाही.'
लांडगा म्हणाला, 'ठीक आहे, मी प्रयत्न करून पाहतो. प्रथम तू पलिकडच्या शेतात माझा भाऊ मरून पडला आहे त्याच कातडं पांघरून ये.' तसं करताच लांडग्याने त्याला निरनिराळे धडे शिकवले. गुरगुरणे, चावणे, लढाई करणे, मेंढ्याच्या कळपावर तुटून पडणे, एखादी मेंढी उचलून नेणे या गोष्टीचे शिक्षण कोल्ह्याला दिले.
सुरुवातीला हे सगळे कोल्ह्याला लवकर जमेना. पण तो मुळातच हुषार असल्याने ते सगले तो लवकरच व्यवस्थित करू लागला. त्याची हुशारी पाहून लांडग्याला आश्चर्य वाटले, शेवटी एक मोठा मेंढ्यांचा कळप कोल्ह्याला दिसताच त्याच्यावर तुटून पडून एका क्षणात त्याने मेंढ्या, धनगर व त्याचे कुत्रे यांची अगदी दाणादाण उडवून दिली. त्याने एक मोठी मेंढी आपल्या तोंडात धरली व तिला मारणार तोच शेजारच्या शेतातून कोंबड्याचा आवाज ऐकू आला. तो ओळखीचा आवाज ऐकताच आपल्या नव्या वेषाचे त्याला भान राहिले नाही व त्याने ते लांडग्याचे कातडे फेकून दिले व गुरूचा निरोपही न घेता तो तडक त्या कोंबड्याकडे धावला.
〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰
🎀 *तात्पर्य* : - *मूळचा स्वभाव कितीही शिक्षण झाले तरी जात नाही.*
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
🙏 *शब्दांकन/संकलन*🙏
✍� *कविता देशमाने*
*जि.प.प्रा.शा. सानेगुरुजी नगर, नळेगाव, ता.चाकूर, जि. लातूर*
☘🔰☘🔰☘🔰☘🔰☘🔰☘
========***********=======
🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏 पुन्हा भेटू उद्या
फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार
========***********=========
Comments
Post a Comment