फ्रेश मॉर्निंग बुलेटीन दिनांक 01 डिसेंबर 2016

*🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर प्रस्तुत 📢*
📱 9423625769

1⃣  🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 1⃣
🕖 प्रसारण वेळ : रोज सकाळी 06:50 ते 07:00 am
----------------------------------------------------
http://fmbuleteen.blogspot.com
----------------------------------------------------
📅 दि. 01/12/2016 वार - गुरुवार
========***********=========
                 *📆 . . दिनविशेष . . 📆*

          *लोकशिक्षण दिन (भारत)*
            *एड्स प्रतिबंधक दिन*
⏳१९६५ : भारतात सीमा सुरक्षा दल (बॉर्डर सिक्युरीटी फोर्स) ची स्थापना
💥 जन्म :-
⏳१८८५ : काकासाहेब कालेलकर, मराठी, गुजराती लेखक, इतिहासकार, पत्रकार, गांधीवादी.
⏳१९०९ : बा. सी. मर्ढेकर, मराठी कवी व लेखक
💥 मृत्यू :-
⏳११३५ : हेन्री पहिला, इंग्लंडचा राजा.
⏳१९७३ : डेव्हिड बेन गुरियन, इस्त्रायलचा पहिले पंतप्रधान

*संकलक :- सौ. सुभद्रा सानप, बीड*
                 9403595764
========***********=========
*आजच्या ठळक बातम्या*
1⃣ राज्य सरकारी कर्मचार्‍यांना 
रोखीने पगार मिळणे अशक्य
2⃣  कॅशलेस व्यवहारांना सुरुवात, कॅन्टीनमध्ये कार्ड पेमेंटला सुरुवात लोकसभा अध्यक्षांनी दिली माहिती.
3⃣ कॅबिनेटने ओबीसीच्या सेंट्रल यादीत नवीन 15 जातींचा समावेश करण्यास दिली मंजुरी
4⃣  पेट्रोल प्रतिलिटर 13 पैशांनी महागले, तर डिझेल प्रतिलिटर 12 पैशांनी स्वस्त ; काल मध्यरात्रीपासून नवे दर लागू
5⃣  बंगालच्या उपसागरात वादळाची स्थिती तयार झाली असून  हे वादळ येत्या २ डिसेंबरला तामिळनाडूतील वेदारानियम आणि चेन्नई दरम्यानच्या किनारपट्टीला धडकणार, भारतीय हवामान खात्याच्या वादळाची पूर्वसूचना देणा-या विभागाने दिली  माहिती
6⃣  भारताच्या सायना नेहवालची मकाऊ ओपनच्या दुसऱ्या फेरीत धडक, इंडोनेशियाच्या हाना रमादिनीवर 21-23, 21-14, 21-18 असा मिळविला विजय
7⃣ विराट कोहलीनं कसोटी फलंदाजांच्या आयसीसी क्रमवारीत तिसऱ्या स्थानावर घेतली झेप, भारताच्या कसोटी कर्णधाराची आयसीसी क्रमवारीतली ही कामगिरी ठरली सर्वोत्तम
*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*
📱 9960358300
========***********=========
*🌷 फ्रेश सुविचार 🌷*
*प्रार्थना म्हणजे मनाचे खरे स्नान होय*

*संकलक :- बालाजी चौधरी, लातूर*
                  7588876539
========***********=========
*आजचा मराठी शब्द*
             *स्नान*
*संकलक :- जगन्नाथ दिंडे, मुखेड*
                  8668453639
========***********=========
*🎂 आजचा वाढदिवस*
👤 विठ्ठलराव पा. मुजळगे, धर्माबाद
👤 श्याम दरबस्तेवार, प्रा. शिक्षक
👤 योगेश पा. जायशेट, धर्माबाद

*संकलक :- नासा येवतीकर, धर्माबाद*
                  9423625769
[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा वरील क्रमांकावर पाठवू शकता. ]
========***********=========
*आजची @@ गुगली @@*

  "राजकारण"

राजकारण म्हणजे
मोठा राडा आहे
म्हणून प्रगतीला
मोठा खोडा आहे

याला त्याला अडवून
प्रगती होत नाही
खेचा खेची मध्ये
कोणीच पुढे जात नाही

    शरद ठाकर
सेलू जि परभणी
  8275336675

========***********=========
*आजचा*
🎯 वि  चा  र  वे  ध...✍🏻

🍃🍂🍃🍂🍃🍂🍃🍂

आपले जीवन म्हणजे एक कोरा कॅनव्हाॅस आणि त्यावर रेखाटलेले चित्र म्हणजे आपल्या जीवनाची निश्चित केलेल्या ध्येयाची  सीमारेषा. त्या रेखाटलेल्या आकारामध्ये विविध रंगांनी रंगवून पूर्ण केलेली चित्र म्हणजे आपले परिपूर्ण जीवन. जसा एखादा चित्रकार आपल्या मनाने, कल्पनेने आणि विशिष्ट हेतूने चित्र रेखाटून त्या चित्रात जीवनाचे वास्तव दर्शन घडवतो त्याचप्रमाणे आपल्या जीवनाला खरे रुप द्यायचे असेल तर प्रयत्न, योग्य दिशा, निश्चित ध्येय समोर ठेवले तर आपलेही जीवन सुंदर बनू शकते. त्यातून  जीवन जगण्याची आशा पल्लवीत होते.

- व्यंकटेश काटकर,नांदेड
  9421839590
========***********=========
*आजची लिंक*
जागतिक A I D S निर्मूलन दिन त्यानिमित्त लेख

http://nasayeotikar.blogspot.com/2016/11/a-i-d-s.html

खबरदारी हाच सर्वोत्तम उपाय
========***********=======
*आजची बोधकथा*
एका माणसाने त्‍याच्‍या घरी एक पोपट पाळला होता. पिंज-यात ठेवलेल्‍या पोपटाला चांगले खायलाप्‍यायला मिळत असे व पोपट बोलका असल्‍याने घरातील लोकांकडून त्‍याचे फार कौतुकही केले जाई. पण पोपटाच्‍या मनात मात्र पारतंत्र्याचे शल्‍य दाटून येई. अखेर एकेदिवशी पोपटाला संधी चालून आली. त्‍या माणसाने पोपटाला खाणे देण्‍यासाठी पिंज-याचे दार उघडले होते व त्‍याच्‍याहातून ते तसेच उघडे राहिले होते. माणसाला अचानक काही काम आल्‍याने तो ते दार उघडे टाकून निघून गेला असता पोपट पिंज-याच्‍या बाहेर निघून गेला. पण लहानपणापासूनच पिंज-यात राहिला असल्‍याने त्‍याला फारसे नीट उडताच येत नव्‍हते. एका झाडावर गेला असता त्‍याला इतर पोपटांशी बोलता येईना कारण लहानपणापासूनच तो परकी भाषा शिकत असल्‍याने त्‍याला पोपटांची भाषा येत नव्‍हती म्‍हणून इतर पोपटही त्‍याला सहकारी मानत नव्‍हते. पिंज-यात आयते खायची सवय असल्‍याने त्‍याला अन्न मिळवणे अवघड जाऊ लागले व ऊन वारा पाऊस यांची कधीच सवय नसल्‍याने तो आजारी पडला व मरून गेला.
तात्‍पर्य : - जास्‍त काळ पारतंत्र्यात(गुलामगिरीत) राहिल्‍याने तशीच गुलामगिरीची सवय अंगात मुरुन राहते. मग परक्याची भाषा, संस्‍कृतीच आपली वाटू लागते आणि मिळालेले स्‍वातंत्र्य टिकवण्‍यासाठीची जिद्द अंगी राहत नाही. परक्‍या संस्‍कृतीचे चांगले काही घेताना आपल्‍या संस्‍कृतीचे विस्‍मरण होऊ न देणे हाच खरा शहाणपणा.
*सौजन्य :-* zpguruji.com
========***********=======
🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏 पुन्हा भेटू उद्या
फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार
========***********=========

Comments

Post a Comment