दिनांक 27 नोव्हेंबर 2016

1⃣  🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 1⃣ 

📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹

📱 9960358300

🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢

📱 9423625769

🕖 प्रसारण वेळ : 06:50 ते 07:00 am

----------------------------------------------------

http://fmbuleteen.blogspot.com

----------------------------------------------------

📅 दि. 27/11 /2016 वार - रविवार

========***********=========

               📆 . . दिनविशेष . . 📆


⏳संत ज्ञानेश्वर महाराज यांनी समाधी घेतली.

✏ सौजन्य : -

www.marathimati.com

========***********=========

*आजच्या ठळक बातम्या*

1⃣ काळ्या पैशाविरोधात लढण्यासाठी कॅशलेस व्यवहार होणं आवश्यक, चर्चा करण्यासाठी बँक अधिका-यांची बैठक बोलावली आहे शिवराज सिंग चौहान.

2⃣ संयुक्त राष्ट्रात दाखवला जाणार अमिताभ बच्चन यांचा 'पिंक' सिनेमा - PTI

3⃣ 500 न्यायाधीशांच्या जागा रिक्त, सरकार सुविधा देण्यास तयार नाही - सरन्यायाधीश टी. एस. ठाकूर

4⃣ मुंबईतुन पाच कोटी तर दिल्लीतून तीन कोटी असे आठ कोटींच्या जुन्या नोटा जप्त, केंद्रीय औद्योगिक सुरक्षा विभागाची कारवाई

5⃣ जनरल कामर जावेद बाजवा पाकिस्तानचे नवे लष्करप्रमुख, पाकिस्तानच्या पंतप्रधानांनी केली घोषणा.

6⃣ भारताची अव्वल बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधूने हाँगकाँग सुपर सीरीज बॅडमिंटन स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे.

7⃣  भारत विरुद्ध इंग्लंड तिसरा कसोटी सामना, पहिल्या दिवसअखेर इंग्लंडच्या ८ बाद २६८ धावा.

💥 क्युबाचे माजी राष्ट्राध्यक्ष फिडेल कॅस्ट्रो यांच्या निधनाबद्दल क्युबामध्ये नऊ दिवसांचा दुखवटा जाहीर करण्यात आला आहे.

🇮🇳 सौजन्य -

http://m.lokmat.com

========***********=========

*🌷 फ्रेश सुविचार 🌷*

तुम्हाला ज्या विषयाची माहिती आहे त्याविषयी कमी बोला, आणि ज्या विषयाची माहिती नाही त्या विषयी मौन पाळा.


[ या बुलेटिनसाठी सुविचार पाठवू शकता. ]

========***********=========

*आजचा मराठी शब्द*

             *औद्योगिक*

========***********=========

*🎂 आजचा वाढदिवस* 

👤 ओमकार बच्चूवार, धर्माबाद


[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा पाठवू शकता. ]

========***********=========

*आजचा विचारवेध*

🎯 विचारवेध...........✍🏻

➖➖➖➖➖➖➖➖


जी माणसे मनाने दुबळी असतात ती आपल्या कामात यशस्वी होत नाहीत. कारण त्यांच्या कामामध्ये सतत मन ढवळाढवळ करत राहते.

कोणताही ठाम निर्णय घेण्यासाठी मनाची तयारी नसते.तेव्हा आपल्या मनाला कमकुवत न बनवता त्याला सक्षम कसे बनवता येईल याचा विचार करण्याचा प्रयत्न केला पाहिजे.एकदा का सक्षम मन झाले की,कोणतेही काम यशस्वीपणे पार पाडता येते.सतत आपल्या मनाला कोणत्या ना कोणत्या चांगल्या कामात गुंतवले तर कामही चांगल्या दर्जाचे होईल व मनही सक्षम होईल.

अशामुळे मन दुबळे होणार नाही.उलट मन सशक्त व आशावादी बनेल.


- व्यंकटेश काटकर,नांदेड.

   भ्रमण..9421839590


♻✅♻✅♻✅♻✅

========***********=========

*आजची लिंक*

तुम्ही आम्ही पालक डिसेंबर 2016 चा अंक सर्वत्र प्रकाशित झाला आहे.


यावेळी अंकाचा विषय होता


*पाल्यांचे करियर : स्वप्न की स्वप्नाचे ओझे*


http://saadmanuski.blogspot.com/2016/11/blog-post.html


पूर्ण पुस्तक वाचण्यासाठी आजच मासिकाचे वर्गणीदार व्हावे. अधिक माहितीसाठी वरील लिंकला भेट द्या

========***********=======

*आजची*


*@@ गुगली @@*


  "माझ मत "


माझ मत फक्त 

माझा हक्क आहे 

योग्य उमेद्वारालाच 

माझ मत पक्क आहे


अमिषाला टाळून 

या करूया मतदान 

मत आहे अनमोल 

याच ठेवा भान


   शरद ठाकर 

सेलू जि परभणी 

8275336675

========***********=======

*आजची बोधकथा*


*♻  सत्कर्म* ♻

=========================

जगज्जेता अलेक्झांडर

जवळजवळ संपूर्ण जग जिंकून आपल्या सैन्यासह

माघारी आपल्या देशात परतत होता. परंतु जाताना तो अतिशय गंभीर आजारी झाला.

अनेक उत्कृष्ट उपाय करूनही आजारातून बरे होण्याची कोणतीही लक्षणे दिसत नव्हती.

जिंकलेले संपूर्ण साम्राज्य, एवढी मोठी शूर

सेना, आपली जगज्जेती तीक्ष्ण तलवार आणि अमाप संपत्ती, ह्या सर्वांचा त्याग करून आपणाला आता मृत्यूला सामोरे जावे लागणार

ह्याची त्याला जाणीव झाली. आपण आता कोणत्याही परिस्थितीत आपल्या मायदेशी जीवंत पोहचू शकत नाही हे त्याला कळून चुकले.

मृत्यूच्या शेवटच्या घटका मोजत असताना त्याने आपल्या सरदाराला पाचारण

केले आणि म्हणाला ” मी आता लवकरच हे जग

सोडून निघून जाणार आहे, माझ्या तीन इच्छा आहेत आणि त्या पूर्ण करण्याची सर्वस्वी तुमची जबाबदारी आहे."

सरदाराला साश्रूपूर्ण होय म्हणण्याशिवाय

गत्यंतर नव्हते.

अलेक्झांडर म्हणाला:


*१*. माझी पहिली इच्छा “

माझ्या खाजगी डॉक्टरनेच

माझी शवपेटी एकट्यानेच उचलून न्यावी”

*२*. माझी दुसरी इच्छा “

माझी शवपेटी स्मशानभूमीवर

नेण्याच्या संपूर्ण रस्त्यावर मी आतापर्यंत जिंकलेले सर्व सोने, चांदी, जडजवाहीर पसरून ठेवावे”

*३*. आणि माझी अंतिम इच्छा ” माझे

दोन्ही हात शवपेटीेच्या बाहेर काढून लोंबकळत ठेवावे.”

आपला राजा आपणाला 

कायमचे सोडून जाणार, हे ऐकून सर्व सेना अतिशय दुःखी झाली.

सरदाराने इच्छा पूर्ण करण्याचे आश्वासन दिले,

तरी देखील हिम्मत करून प्रश्न विचारला,

” हे राजन, ह्या कसल्या विचित्र इच्छा."

राजाने एक दीर्घ श्वास

घेतला आणि म्हणाला,

“माझ्या आयुष्यात मी जे

काही आता शिकलो, ते सर्व जगाला माहीत व्हावे म्हणूनच ह्या तीन इच्छांची पूर्तता करणे

गरजेचे आहे”

माझ्या खाजगी डॉक्टरने

माझी शवपेटी एकट्यानेच उचलून न्यावी, ह्यातून मला जगाला एक संदेश

द्यावयाचा आहे की, जगातील कोणीही उत्कृष्ट डॉक्टर देखील तुम्हाला मरणापासून वाचवू शकत नाही

.मरण हे अंतिम सत्य आहे. त्यामुळे

जीवन हे गृहीत न धरता ते चांगल्या प्रकारे कोणालाही न दुखावता कसे जगता येईल

हा प्रत्येकाने प्रामाणिकपणे प्रयत्न करणे गरजेचे आहे.

जगज्जेता म्हणून नावलौकिक प्राप्त करण्यासाठी मी आयुष्यभर सतत लढाया केल्या,

अपार संपत्ती गोळा केली,पण मरताना मात्र मी काहीच घेवून जाणार नाही,

म्हणूनच

माझी दुसरी इच्छा 

“माझी शवपेटी स्मशानभूमीवर

नेण्याच्या संपूर्ण रस्त्यावर मी आतापर्यंत जिंकलेले सर्व सोने, चांदी, जडजवाहीर पसरून ठेवावे,केवळ संपत्ती कोणत्याही प्रकारे

जमविणे म्हणजेच जीवन नाही." हा संदेश

लोकांना मिळेल

आणि अशी संपत्ती मिळविण्यासाठी केलेली

धावाधाव म्हणजेच जीवनातील अमूल्य

वेळेचा कालापव्य.

जनतेला कळू द्या मी रिकाम्या हातानेच ह्या जगात आलो आणि रिकाम्या हातानेच हे

जग सोडून जात आहे, 

म्हणून

माझी तिसरी इच्छा 

” माझे दोन्ही हात

शवपेटीेच्या बाहेर काढून लोंबकळत ठेवावे."

हे सर्व सांगून थोड्याच वेळात त्याचा मृत्यू झाला.


*तात्पर्य*

*माणुस मरतांना शेवटी काहीच सोबत नेत नाही.फक्त कर्मच सोबत येते .म्हणजे जेव्हा काळाची उडी पडेल तेव्हा कोणीही वाचवू शकत नाही*.

*सगळं इथेच ठेवून जायचे आहे.*

*एक माणूस म्हणून या संसारात चांगले  वागावे, आणि  चांगली कर्मे करावीत*.

〰〰〰〰〰〰〰〰〰

*📝 संकलन / समूह प्रशासक*

*✒श्रीमती प्रमिलाताई सेनकुडे (शिंदे)*

जि.प.प्रा.शा.वाटेगाव

ता.हदगाव, जि. नांदेड

http://www.pramilasenkude.blogspot.in

*©मराठीचे शिलेदार समूह*

========***********=======

🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏 पुन्हा भेटू उद्या

फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार 

========***********=========

Comments