1⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 1⃣
📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹
📱 9960358300
🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢
📱 9423625769
🕖 प्रसारण वेळ : 06:50 ते 07:00 am
----------------------------------------------------
http://fmbuleteen.blogspot.com
----------------------------------------------------
📅 दि.28 / 11/2016 वार - सोमवार
========***********=========
📆 . . दिनविशेष . . 📆
⏳१९६० : मॉरिटानियाला फ्रांसपासून स्वातंत्र्य.
💥 जन्म :-
⏳१९५० : रसेल ऍलन हल्स, नोबेल पारितोषिक विजेता अमेरिकन भौतिकशास्त्रज्ञ.
💥 मृत्यू :-
⏳१८९० : महात्मा जोतिबा फुले, भारतीय समाजसुधारक.
⌛१९६७ : पांडुरंग महादेव तथा सेनापती बापट, भारतीय क्रांतिकारक स्वातंत्र्यसैनिक.
✏ सौजन्य : -
www.marathimati.com
========***********=========
*आजच्या ठळक बातम्या*
1⃣ काळा पैसा संपुष्टात आणण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. तर काही लोक भारतबंद करण्यासाठी निघाले आहेत, असे भारतबंदवरून विरोधकांनी पुकारलेल्या आक्रोश दिनावर नरेंद्र मोदींनी कडाडून केली टीका
2⃣ सर्व बँका आणि एटीएमपर्यंत चलन पोहोचवण्याचं काम सुरू आहे, लोकांनी कॅशलेस व्यवहारावर जास्त जोर द्यावा ऊर्जित पटेल यांचे प्रतिपादन
3⃣ पश्चिम बंगालच्या सिलिगुडीमधून 1009.15 किलोचं 7 कोटींचे अंमलीपदार्थ जप्त, मेट्रोपोलिटन पोलीस आणि एसएसबीच्या 41 बटालियनची संयुक्त कारवाई
4⃣ लातूर येथील आंध्र बँकेच्या सहव्यवस्थापक आणि क्याशिअरला 11 लाखांच्या नव्या नोटासह पकडले. 25 टक्के कमिशनवर नोटा एक्सचेंज करून देत असल्याचा पोलिसांना संशय.
5⃣ 164 नगरपरिषद व नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूका शांततेत संपन्न
6⃣ भंडारा जिल्ह्यात सुरू असलेल्या वनरक्षकपदाच्या भरतीसाठी आलेल्या भाग्यश्री चव्हाण रा. सिंदेवाही या २५ वर्षीय महिला उमेदवारचा चाचणी दरम्यान मृत्यू
7⃣ मोहाली कसोटीत भारताच्या 78.3 षटकांत 6 बाद 247 धावा, रविचंद्रन आश्विननं 78 चेंडूंमध्ये 54 धावा काढून अर्धशतक केलं साजरं
ज्येष्ठ साहित्यिक आनंद यादव यांचे पुण्यात निधन
🇮🇳 सौजन्य -
http://m.lokmat.com
========***********=========
*🌷 फ्रेश सुविचार 🌷*
ओरडण्याने ओरडणे बंद होत नाही ; स्वस्थ राहण्याने मात्र होते
[ या बुलेटिनसाठी सुविचार पाठवू शकता. ]
========***********=========
*आजचा मराठी शब्द*
*स्वस्थ*
========***********=========
*🎂 आजचा वाढदिवस*
👤 राम चव्हाण, नांदेड
[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा पाठवू शकता. ]
========***********=========
*आजचा विचारवेध*
🎯 विचारवेध.........✍🏻
--------------------------
सृजनशील मनाच्या मातीत बहुगुणी सद्विचाररुपी बीज पेरले तर आनंद,
नवचैतन्य,सुख,शांती आणि समाधानाची फुले फुलतील.तीच फुले तुमच्या जीवनात मानवतेचा सुगंध दरवळून तुमचे जीवन कृतार्थ बनवण्यास मदत करतील.
- व्यंकटेश काटकर,नांदेड.
भ्रमण.9421839590.
🍃🌺🍃🌺🍃🌺🍃🌺
========***********=========
*आजची लिंक*
*जागतिक एड्स निर्मूलन दिना निमित्त*
*साहित्य दरबार वैचारिक लेखमाला स्पर्धा*
*दिनांक 27 नोव्हेंबर 2016*
विषय -
*भरकटलेली युवा पिढी*
http://sahitydaarpan.blogspot.com/2016/11/blog-post_27.html
*लेख जरूर वाचा आणि इतराना वाचण्यासाठी share करा*
========***********=======
*आजची @@ गुगली @@*
"समाज रूण "
लक्षात ठेवा प्रत्येकावर
समाजाचं देणं आहे
आप्पलपोटे विचार करतात
मला काय त्याच घेणं आहे
प्रत्येकाने समाज ऋण
आनंदाने फेडलं पाहिजे
माणंसुकीच्या नात्याने
काही काम घडलं पाहिजे
शरद ठाकर
सेलू जि परभणी
8275336675
========***********=======
*आजची बोधकथा*
🎀 *कुंभार व माती* 🎀
〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰
*एक कुंभार मातीची चिलीम बनवित होता.*चिलीमचा आकार सुध्दा केला होता ! पण थोड्याच वेळात त्याने तो आकार बदलला !
मातीने विचारले, "अरे कुंभार दादा, तु छान चिलीम बनविली होती. मग का परत बदल केला?"
कुंभार म्हणाला, "मी चिलीम बनवत असताना माझी मति बदलली आणि घागर बनविण्याचा निर्णय घेतला !"
माती म्हणाली, "कुंभार दादा, तुमची मति बदलल्या मुळे, माझे जीवन बदलले ! मी चिलीम झाले असते तर मी ही जळाले असते आणि दुसऱ्यांना ही जाळले असते ! आता मी घागर झाल्यावर मी ही शीतल राहिल आणि इतरांना ही शीतलता देइल !"
〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰
🎀 *तात्पर्य* : - *जीवनात सुयोग्य निर्णय घेतल्यास, आपल्याला ही आनंद मिळतो आणि आपल्या मुळे इतरांना ही आनंद मिळतो.*
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
🙏 *शब्दांकन/संकलन*🙏
✍ *कविता देशमाने*
*जि.प.प्रा.शा. सानेगुरुजी नगर, नळेगाव, ता.चाकूर, जि. लातूर*
☘🔰☘🔰☘🔰☘🔰☘🔰☘
========***********=======
🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏 पुन्हा भेटू उद्या
फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार
========***********=========
Comments
Post a Comment