1⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 1⃣
📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹
📱 9960358300
🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢
📱 9423625769
🕖 प्रसारण वेळ : 06:50 ते 07:00 am
----------------------------------------------------
http://fmbuleteen.blogspot.com
----------------------------------------------------
📅 दि. 29/11 /2016 वार - मंगळवार
========***********=========
📆 . . दिनविशेष . . 📆
💥 जन्म :-
⏳१९०८ : एन.एस. क्रिश्नन, तमिळ चित्रपट अभिनेता.
१९३२ : जाक शिराक, फ्रांसचा राष्ट्राध्यक्ष
💥 मृत्यू :-
⏳१९३९ : माधव ज्युलियन, मराठी भाषेतील कवी, रविकिरण मंडळाचे संस्थापक.
१९५९ : गोविंद सखाराम सरदेसाई, मराठी इतिहासकार.
१९९३ : जे. आर. डी टाटा, भारतीय उद्योजक.
२०११ : इंदिरा गोस्वामी, आसामी साहित्यिक, कवयित्री, संपादिका.
✏ सौजन्य : -
www.marathimati.com
========***********=========
*आजच्या ठळक बातम्या*
1⃣ राज्यातील २५ जिल्ह्यांमधील १४७ नगरपालिका आणि १७ नगर पंचायतींसाठी झालेल्या निवडणुकीचा काल निकाल जाहीर झाला आहे. राज्यभरात नगरपालिका, नगर पंचायतींच्या भाजपनं वर्चस्व कायम राखलं आहे
2⃣ देशातील सर्व सेवा भविष्यात डिजिटलाइज्ड केल्या जातील. नागरिकांना मिळणा-या सेवा ह्या डिजिटल पद्धतीच्या असतील, असे केंद्रीय माहिती व प्रसारण राज्यमंत्री राजवर्धनसिंग राठोड यांनी सोमवारी येथे इफ्फीच्या समारोपावेळी केलेल्या भाषणावेळी सांगितले.
3⃣ अकोल्याचे शिक्षणाधिकारी मुकुंद प्रकाश यांना अटक करा, नागपुर हायकोर्टाचा आदेश, खोटी माहिती सादर केल्याबद्ल दिला आदेश.
4⃣ अल्बानियाची राजधानी तिराना येथे झालेल्या अंतिम स्पर्धेत मुंबईची सौंदर्यवती आणि विद्यमान ‘मिस इंडिया’ डिंपल पटेल हिची ‘जगतसुंदरी २०१६’ म्हणून निवड झाली
5⃣ ले. जनरल ए के भट्ट यांची डायरेक्टर जनरल ऑफ मिलिटरी ऑपरेशन्स (डीजीएमओ) म्हणून निवड करण्यात आली
6⃣ अण्णाभाऊ साठे महामंडळात 312 कोटींचा अपहार झाल्याचे निष्पन्न, बीडमध्ये राहणाऱ्याचे परभणीत बनावट बँक खाते काढून 24 कोटींचा अपहार, सी.आय.डी. प्रमुख संजीव कुमार यांची माहिती.
7⃣ इंग्लंड तिसऱ्या दिवसअखेर सामन्यात चार बाद 78 धावा, इंग्लंडसमोर भारताचे 134 धावांचे आव्हान.
🇮🇳 सौजन्य -
http://m.lokmat.com
========***********=========
*🌷 फ्रेश सुविचार 🌷*
एकांतात मिळणाऱ्या क्षणांचं आपण काय करतो यावर आयुष्याकडे पाहाण्याचा आपला दृष्टीकोन व्यक़्त होतो.
[ या बुलेटिनसाठी सुविचार पाठवू शकता. ]
========***********=========
*आजचा मराठी शब्द*
*निष्पन्न*
========***********=========
*🎂 आजचा वाढदिवस*
👤
[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा पाठवू शकता. ]
========***********=========
*आजचा*
🎯 विचारवेध..........✍🏻
--------------------------
कुणाला किती आयुष्य लाभले याला महत्व नाही तर मिळालेले आयुष्य किती आणि कसे घालवले याला महत्व आहे. आयुष्यात अनेक चढउतार किती आणि कसे पार केले याला महत्व आहे. ते पार करत असताना किती आणि कशाप्रकारे सामना करत यशस्वी झालात याला अधिक महत्व आहे. कारण ज्यांच्या आयुष्यात सुखदुःखाचा चढउतार असल्याशिवाय आयुष्याला पूर्णत्वही प्राप्त होत नाही.
- व्यंकटेश काटकर,नांदेड.
भ्रमण..9421839590.
🍃🌺🍃🌺🍃🌺🍃🌺
========***********=========
*आजची लिंक*
*जीवन सुंदर आहे*
http://nasayeotikar.blogspot.com/2016/10/blog-post.html
========***********=======
*आजची बोधकथा*
*जोपासना चांगल्या विचारांचा एकनिष्ठतेची*
=========================
एकदा तथागत गौतम बुद्ध एका ठिकाणी धम्म देसना देण्यासाठी गेले.समोर हजारो लोक बसलेले होते,तथागत काहीच न बोलता काही वेळ बसून राहिले व थोड्या वेळाने निघुन गेले. दुसऱ्या दिवशी परत धम्म देसना देण्यासाठी आले समोर पाचशे लोक बसलेले होते. परत तथागत काही वेळ काहीच न बोलता बसून राहिले व थोड्या वेळाने निघुन गेले.
परत तिसऱ्या दिवशी जेंव्हा ते धम्म देसना देण्या साठी आले तेंव्हा फक्त वीस लोक समोर बसलेले होते,आणि त्या दिवशी तथागतांनी धम्म देसना दिली.
जेंव्हा त्यांच्या शिष्याने त्यांना विचारले की पहिले दोन दिवस जास्त लोक असतांना तुम्ही धम्म देसना न देता तिसऱ्या दिवशी फक्त
वीस लोक असतांना का दिली?
तथागतांनी खुप छान उत्तर दिले,"ज्या लोकांना खरच धम्म ऐकायचा होता ते तिसऱ्या दिवसा पर्यन्त आपल्या निश्चयावर ठाम राहिले व तिसऱ्या दिवशी उपस्थित राहिले.परन्तु जे मला फक्त बघण्या साठी आले होते व जे आपल्या निश्चयावर ठाम नव्हते ते अपोआपच कमी होत गेले.मला फक्त धम्म ऐकून घेणारे नकोत तर आचरणात आनणारे अनुयायी हवेत.म्हणून मी तिसऱ्या दिवशी योग्य अशाच अनुयायांना धम्म दिला."
*बोधःजो पर्यन्त चांगल्या विचारांशी एकनिष्ठ राहण्यावर आपण ठाम नसतो तो पर्यन्त आपल्याला त्यापासून मिळणारा लाभ मिळत नाही.किती आहेत यापेक्षा कसे आहेत हे महत्वाचे.*
〰〰〰〰〰〰〰〰〰
*📝 संकलन* 📝
*✒श्रीमती प्रमिलाताई सेनकुडे (शिंदे)*
जि.प.प्रा.शा.वाटेगाव
ता.हदगाव, जि. नांदेड
http://www.pramilasenkude.blogspot.in
========***********=======
🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏 पुन्हा भेटू उद्या
फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार
========***********=========
Comments
Post a Comment