1⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 1⃣
📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹
📱 9960358300
🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢
📱 9423625769
🕖 प्रसारण वेळ : 06:50 ते 07:00 am
----------------------------------------------------
http://fmbuleteen.blogspot.com
----------------------------------------------------
📅 दि. 30/11 /2016 वार - बुधवार
========***********=========
📆 . . दिनविशेष . . 📆
⏳‘सांगत्ये ऎका’ या मराठी चित्रपटाने पुणे येथे ५५१ दिवसाचा विक्रम केला.
💥 जन्म :-
⏳१९१० : मराठीतील सुप्रसिध्द कवी. बा. भ. बोरकर(बाळकृष्ण भगवंत बोरकर)
⌛१८५८ : भारतीय शास्त्रज्ञ जगदीशचंद्र बोस
⌛१९३५ : आनंद यादव, मराठी लेखक
💥 मृत्यू :-
⏳१९०० : सुप्रसिध्द लेखक, कवी, नाटककार ऑस्कर वाइल्ड
✏ सौजन्य : -
www.marathimati.com
========***********=========
*आजच्या ठळक बातम्या*
1⃣ जम्मू-काश्मीरच्या नागरोटा येथे दहशतवाद्यांच्या हल्ल्यात दोन अधिका-यांसह पाच जवान शहीद
2⃣ मोदी सरकारनं देशाला कॅशलेस अर्थव्यवस्थेकडे नेण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. त्याच पार्श्वभूमीवर आयसीआयसीआय बँकेनं 100 गावांना कॅशलेस म्हणजेच डिजिटल बनवण्याचा घाट घातला आहे. आयसीआयसीआय बँकेनं गावं डिजिटल करण्यासाठी गुजरातमधून केली सुरुवात
3⃣ थेट नगराध्यक्ष निवडणूकिमुळे विकासाचे बारा वाजणार माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण
4⃣ मुंबईत 26/11च्या दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेले शशांक शिंदे यांच्या मुलीला राज्य सरकारनं विक्रीकर विभागात सहाय्यक आयुक्त म्हणून नोकरी देऊन केला सन्मान
5⃣ जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांसाठी आचारसंहिता लागणार 22 डिसेंबर पासून
6⃣ सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर महिलांचा हाजी अली दर्ग्यात प्रवेश, महिला दर्शनासाठी मजारपर्यंत जाणार.
7⃣ मोहाली येथे सुरू असलेल्या तिसऱ्या कसोटी सामन्यात भारताने इंग्लडचा 8 विकेटने पराभव करत पाच सामन्याच्या मालिकेत 2-0 ने घेतली आघाडी
🇮🇳 सौजन्य -
http://m.lokmat.com
========***********=========
*🌷 फ्रेश सुविचार 🌷*
ज्या गोष्टींशी आपला काहीही संबंध नाही त्यात नाक खुपसले की तोटाच होतो.
[ या बुलेटिनसाठी सुविचार पाठवू शकता. ]
========***********=========
*आजचा मराठी शब्द*
*दर्गा*
========***********=========
*🎂 आजचा वाढदिवस*
👤 राजेश्वर येवतीकर, येवती
👤 राजू दरेकर, गडचिरोली
👤 अविनाश गंगाधर धडेकर, येताळा
[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा पाठवू शकता. ]
========***********=========
*आजचा विचारवेध*
🎯 विचारवेध.........✍🏻
*******************
एखाद्याच्या डोळ्यात प्रेमाने भरलेली माणसे आयुष्यभर हृदयात घर करुन राहतात ती शेवटच्या क्षणापर्यंत.कारण त्यांनी जीवापाड एकमेकांवर प्रेम केलेले असते म्हणून.त्यांच्या सहवासात राहून त्यांनी खूप काही एकमेकांपासून शिकून घेतलेले असते.
सुखदुःखाच्यावेळी एकमेकाला साथ दिलेली असते.संकटाच्यावेळी मदत केलेली असते.
त्यांच्या कृतज्ञतेला कधीच विसरु शकत नाहीत.
अशीच माणसे डोळ्यांत आयुष्यभर भरुन राहतात. असंच माणसानं जीवन जगायला पाहिजे.हाच
तर माणुसकीचा खरा धर्म आहे.
🌹व्यंकटेश काटकर,
नांदेड.9421839590
🍂🍃🍂🍃🍂🍃🍂🍃
========***********=========
*आजची लिंक*
चित्र बोलते काही ..... यावर *प्रतिलिपि मराठी* यांनी आयोजीत केलेल्या चित्रावरून स्पर्धेसाठी मी एका चित्रावरून एक कविता पाठवली आहे
http://marathi.pratilipi.com/na-sa-yevtikar/aaji-ajoba
क्लिक करा आणि Like करा
========***********=======
*आजची @@ गुगली @@*
"स्पर्धा "
स्पर्धेच्या या युगात
ज्याची त्याची धाव आहे
सारे काही मलाच
मिळवायची हाव आहे
स्वतःसाठी धावतांना
आपल्यांचाही विचार करा
आपल्यांसह प्रगतीतच
आनंद माना की खरा
शरद ठाकर
सेलू जि परभणी
8275336675
========***********=======
🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏 पुन्हा भेटू उद्या
फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार
========***********=========
Comments
Post a Comment