फ्रेश मॉर्निंग बुलेटिन दिनांक 01 जानेवारी 2017


*🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर प्रस्तुत 📢*
📱 9423625769

1⃣  🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 1⃣ 
🕖 प्रसारण वेळ : रोज सकाळी 06:50 ते 07:00 am
----------------------------------------------------
http://fmbuleteen.blogspot.com
----------------------------------------------------
📅 दि. 01/01/2017 वार - रविवार 
========***********=========
        *📆 . . दिनविशेष . . 📆*
*नविन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा*
💥ख्रिस्ती वर्षारंभ दिन.
⌛१८६२ : इंडियन पीनल कोड अस्तित्वात आले.
⌛१९१९ : गव्हर्नमेंट ऑफ इंडिया अ‍ॅक्ट अमंलात आला व देशात कायदेमंडळे स्थापन झाली.
⌛१९३२ : ना. भि. परुळेकर (नारायण भिकाजी परुळेकर) यांनी ‘सकाळ’ हे वृत्तपत्र सुरु केले.
⌛२०१० : आत्मघातकी दहशतवाद्याने पाकिस्तानच्या लक्की मारवात गावात चालू असलेल्या व्हॉलीबॉल स्पर्धेच्या ठिकाणी कारबॉम्ब स्फोट केला. १०५ ठार, १०० जखमी.
⌛२०१३ : कोट दि आईव्होरच्या आबिजान शहरात नवीन वर्षाच्या स्वागतासाठी जमलेल्या गर्दीत चेंगराचेंगरी होउन ६० व्यक्ती ठार, २०० जखमी.
💥जन्म
⌛१८९२ : महादेव हरिभाई देसाई गांधीवादी कार्यकर्ते.
⌛१८९४ : सत्येंद्रनाथ बोस भारतीय भौतिकशास्त्रज्ञ.
⌛१९०२ : कमलाकांत वामन केळकर भारतीय भूवैज्ञानिक.
⌛१९३६ : राजा राजवाडे, साहित्यिक.
⌛१९४३ : रघुनाथ अनंत माशेलकर(रमेश माशेलकर), पद्मश्री, पद्मभूषण पुरस्कार विजेते.
💥मृत्यू
⌛१७४८ : योहान बर्नोली, स्विस गणितज्ञ.
⌛१९५५ : डॉ. शांतीस्वरुप भटनागर.

*संकलक :- सौ. सुभद्रा सानप, बीड*
                 9403595764
========***********=========
*आजच्या ठळक बातम्या*
1⃣  - भारतात ज्येष्ठ नागरिकांची संख्या जास्त आहे, ज्येष्ठ नागरिकांच्या खात्यातील साडे सात लाख रुपयांपर्यतच्या रकमेवर 8 टक्क्यांचा व्याजदर दिला जाईल, दर महिन्याला व्याजाचे पैसे ते घेऊ शकतात पंतप्रधान नरेंद्र मोदी.
2⃣ अनिल बैजल यांनी घेतली दिल्लीच्या नायब राज्यपालपदाची शपथ
3⃣ अखिलेश यादव, रामगोपाल यादव यांचे समाजवादी पक्षातील निलंबन रद्द
4⃣  सदाभाऊ खोत यांच्याकडे स्वच्छता आणि ग्रामीण पाणीपुरवठा ही आणखी दोन खाती देणार, मुख्यमंत्र्यांची शिराळ्यात घोषणा.
5⃣ येत्या नविन वर्षातएटीएममधून पैसे काढण्याच्या मर्यादेत वाढ 1 जानेवारीपासून एटीएममधून रोज 4500 रुपये काढता येणार, चेकद्वारे आठवड्याला 24 हजारच काढता येणार,
6⃣ ऑस्ट्रेलिया आणि न्यूज़ीलैंड मध्ये नववर्षाचं जल्लोषात स्वागत.
7⃣  मिशेल स्टार्कच्या अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर आॅस्ट्रेलियाने दुसऱ्या कसोटी सामन्यात शुक्रवारी अखेरच्या दिवशी पाकिस्तानचा एक डाव व १८ धावांनी पराभव करीत तीन सामन्यांच्या मालिकेत २-० अशी विजयी आघाडी घेतली.
*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*
📱 9960358300
========***********=========
*🌷 फ्रेश सुविचार 🌷*

जेव्हा एखादा मार्ग तुम्ही निवडता तेव्हा तो तुम्ही शेवट पर्यंत चालला पाहीजे.  व्यक्तीगत कारणासाठी त्यापासून दूर जाऊ नये.

*संकलक :- सुनील रेगुलवाड, उमरी*
                  7588876539
========***********=========
*आजचा मराठी शब्द*
             *व्यक्तिगत*

*संकलक :- जगन्नाथ दिंडे, मुखेड*
                  8668453639
========***********=========
*🎂 आजचा वाढदिवस* 
👤 अनिकेत भारती, नांदेड

*संकलक :- नासा येवतीकर, धर्माबाद*
                  9423625769
[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा वरील क्रमांकावर पाठवू शकता. ]
========***********=========
*आजची @@ गुगली @@*

   "स्वागत "

नव्याचे नवलाईने
नेहमी स्वागत असते
एक दिवस स्वागताने
सांगा कुठे भागत असते

स्वागताचा तोच जोश
कायम राहिला पाहिजे
प्रत्येक दिवस नवा
म्हणून पाहिला पाहिजे

    शरद ठाकर
सेलू जि परभणी
  8275336675
========***********=========
*आजचा*

========***********=========
*आजची लिंक*
नविन वर्षावर आधारित मुक्त कविता लेखन

http://sahitydaarpan.blogspot.com/2016/12/blog-post_31.html
========***********=======
*आजची बोधकथा*
            *स्‍वातंत्र्य-पारतंत्र्य*

अमेरिकेत एकेकाळी गुलामगिरीची प्रचलित होती. निग्रो लोकांची शेळ्या मेंढ्यांप्रमाणे खरेदीविक्री होत असे. अब्राहम लिंकन यांनी गुलामगिरीची प्रथा मोडून काढण्‍यासाठी प्रयत्‍न केल्‍यामुळे या प्रथेचा अंत झाला व निग्रो लोकांची गुलामीतून सुटका झाली. मुक्त झाल्‍यानंतर निग्रो लोकांनी रोजगाराचा शोध सुरु केला. एक वृद्ध, अशक्‍त वृद्ध निग्रो माणूस कामाच्‍या शोधात भटकत होता. पण त्‍याला काम काही मिळाले नाही. फिरून फिरून तो थकला व एके जागी बसला. तेथे त्‍याची भेट एका मालक जातीच्‍या ओळखीच्‍या माणसाबरोबर झाली. वृद्ध निग्रोची ती अवस्‍था पाहून तो माणूस म्‍हणाला,''तुझे हे होणारे हाल मला पाहवत नाहीत. तू कशाने इतका त्रस्‍त झाला आहे'' वृद्ध म्‍हणाला,''मला काम मिळत नाही'' तो माणूस म्‍हणाला,''काही दिवसांपूर्वी तर तुझी अवस्‍था चांगली होती.'' निग्रो म्‍हणाला,'' त्‍यावेळी मला बराच आराम होता. माझा मालक खूप दयाळू माणूस होता. मला तो फारसे काम लावत नसे. माझ्यावर अत्‍याचार करत नसे. कठीण कामे करण्‍यास लावित नसे.'' सहानुभूती दाखवून तो माणूस म्‍हणाला,'' अरे मित्रा मग तर ते गुलामीचे दिवसच चांगले म्‍हणायला हवे की, ही मुक्ती काही तुला मानवली नाहीये असेच दिसून येतेय. ती तुझ्या कोणत्‍याच कामी येत नाहीये.'' हे ऐकताच बसलेला तो निग्रो माणूस ताडकन उठून उभा राहिला व उंच स्‍वरात ओरडून बोलला,''मालक, गुलामगिरी स्‍वीकारण्‍यापेक्षा हे मुक्त जीवन हजारपट चांगले आहे. कारण आमच्‍या जीवनावर केवळ आमचाच अधिकार आहे; ते सावरण्‍यासाठी आम्ही स्‍वतंत्र आहोत. मालकाकडून पिंज-यात मिळणा-या पेरूच्‍या फोडी खाण्‍यापेक्षा उंच आकाशात उपाशीपोटी भरारी घेणे पोपटाला खूप आवडते हे लक्षात आहे ना.''

तात्‍पर्य :- मनुष्‍याच्‍या सर्वांगीण विकासासाठी स्‍वातंत्र्य ही पहिली अट आहे, पारतंत्र्य पतनाचे तर मुक्ती प्रगतीचे द्वार आहे.

वर्तमानपत्रातून संग्रहित
========***********=======
🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏 पुन्हा भेटू उद्या
फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार 
========***********=========

Comments