फ्रेश मॉर्निंग बुलेटीन दिनांक 05 डिसेंबर 2016

*🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर प्रस्तुत 📢*
📱 9423625769

1⃣  🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 1⃣ 
🕖 प्रसारण वेळ : रोज सकाळी 06:50 ते 07:00 am
----------------------------------------------------
http://fmbuleteen.blogspot.com
----------------------------------------------------
📅 दि. 05/12/2016 वार - सोमवार 
========***********=========
                 *📆 . . दिनविशेष . . 📆*

*आंतरराष्ट्रीय स्वयंसेवक दिन*

⌛१४९२ : क्रिस्टोफर कोलंबसने हिस्पॅनियोला बेटावर पाय ठेवला व नव्या जगात पाउल ठेवणारा पहिला युरोपियन ठरला.
💥 जन्म :-
⌛१४४३ : पोप ज्युलियस दुसरा.
💥 मृत्यु :-
⌛२०१३ : नेल्सन मंडेला, दक्षिण आफ्रिकेचा राष्ट्राध्यक्ष, राष्ट्रपिता, वर्णद्वेषविरोधी नेता

*संकलक :- सौ. सुभद्रा सानप, बीड*
                 9403595764
========***********=========
*आजच्या ठळक बातम्या*
1⃣ आरबीआय लवकरच 20 आणि 50 रुपयांच्याही नव्या नोटा आणणार, जुन्या नोटा चलनातून बाद होणार नाहीत
2⃣ आंदमान बेटांना पहाटेच्या सुमारास भूकंपाचा धक्का, भूकंपाची तीव्रता ४.८ रिक्टर स्केल; कोणत्याही जिवीत अथवा वित्तहानीचे वृत्त नाही
3⃣ शासनाने पाचशे आणि एक हजार रुपयांच्या नोटा रद्द केल्यानंतर 3 डिसेंबर पर्यंत बँकामध्ये 9.85 कोटी रुपये जमा झाले आहेत. ही सर्व रक्कम ही पाचशे आणि हजार रूपयांच्या नोटाच्या स्वरूपात आहे. 
4⃣ महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी-मार्च २०१७मध्ये घेतल्या जाणाऱ्या बारावी परीक्षेसाठी खासगी विद्यार्थ्यांचे नियमित शुल्कासह आॅनलाइन परीक्षा अर्ज येत्या ८ ते १९ डिसेंबर या कालावधीत स्वीकारले जाणार
5⃣ गेले दोन महिने उपचार घेत असलेल्या तमिळनाडूच्या मुख्यमंत्री जे. जयललिता यांना आज संध्याकाळी हद्यविकाराचा तीव्र झटका आला. त्यांच्यावर चेन्नईच्या अपोलो इस्पितळात तज्ज्ञ डॉक्टरांकडून उपचार सुरू अाहेत, असे रविवारी रात्री इस्पितळ प्रशासनाने जाहीर केले
6⃣  भारतीय गोल्फ खेळाडू मुकेश कुमारने जिंकली पॅनासॉनिक ओपन स्पर्धा.
7⃣  आशिया चषक टी 20 च्या अंतिम सामन्यात भारतीय महिला संघांने पाक महिला संघाचा 17 धावाने केला पराभव
*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*
📱 9960358300
========***********=========
*🌷 फ्रेश सुविचार 🌷*
तारुण्याचा काळ म्हणजे जीवनाचा रचनाकाळ होय

*संकलक :- बालाजी चौधरी, लातूर*
                  7588876539
========***********=========
*आजचा मराठी शब्द*
             *तारुण्य*

*संकलक :- जगन्नाथ दिंडे, मुखेड*
                  8668453639
========***********=========
*🎂 आजचा वाढदिवस* 
👤 साईनाथ कल्याणकर, येवती
👤अशोक चिंचलोड, येवती

*संकलक :- नासा येवतीकर, धर्माबाद*
                  9423625769
[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा वरील क्रमांकावर पाठवू शकता. ]
========***********=========
*आजची @@ गुगली @@*

   " सत्य वचन "

लक्षात ठेवा सत्य वचन
कोणालाही झोंबत असते
सत्य वचन न ऐकणारांची
प्रगती थांबत असते

झोंबले तरी सत्य वचन
ऐकून घेतले पाहिजे
कडू असले तरीही ते
पोटात घातले पाहिजे

    शरद ठाकर
सेलू जि परभणी
8275336675
========***********=========
*आजचा*
🎯 विचारवेध..........✍🏻
_____________________

मंदिरावरच्या कळसाने आणि मंदिरात असलेल्या देवतेच्या मूर्तीमुळे मंदीर जसे शोभून दिसते त्याप्रमाणे माणसाचे चारित्र्य त्याच्यातील असणा-या सद्विचाराने आणि दुस-यांकडे पाहण्याची चांगली वृती या दोन गोष्टीमुळे शोभून दिसते.

- व्यंकटेश काटकर,नांदेड
  संवाद.9421839590.

🍃🌸🍃🌸🍃🌸🍃🌸
========***********=========
*आजची लिंक*
FM Buletin विषयी प्रतिक्रिया :- कवयित्री सौ. शशिकला बनकर, भोसरी, पुणे
http://fmbuletin.blogspot.com/2016/12/feedback-shashikala.html

जरूर वाचा आणि आपल्या प्रतिक्रिया आमच्या पर्यंत पोहोचवा.
========***********=======
*आजची बोधकथा*
               वेळ
लष्‍करातला एक घोडा रस्‍त्‍याने चालला होता. त्‍याच रस्‍त्‍याने पाठीवरून ओझे घेऊन जाणा-या एका गाढवाला घोड्याने पाहिले व म्‍हणाला,''अरे मूर्ख प्राण्‍या, पटकन बाजूला हो नाहीतर माझ्या पायाखाली फुकट तुडविला जाशील.'' त्‍याचे ते उर्मटपणाचे बोलणे ऐकून ते गाढव निमूटपणे बाजूला झालं पण त्‍या घोड्याचा उमदेपणा व त्‍याचा रूबाब, ऐट पाहून ते गाढव मनातल्‍या मनात म्‍हणालं,''देवा, हा जन्‍म मला ओझे वाहणा-या गाढवाचा दिला आहेस पण पुढचा जन्‍म मात्र मला अशा लष्‍करी, उमद्या जातीच्‍या घोड्याच्याच पोटी घाल मात्र याचा उर्मटपणा मला देऊ नकोस.'' 
थोड्याच दिवसांनी एका लढाईत तो घोडा जखमी झाला व लढाईच्‍या दृष्‍टीने निकामी झाला तेव्‍हा त्‍याच्‍या सरदार मालकाने त्‍याला एका कुंभाराला विकले. त्‍या घोड्याच्‍या दुर्दैवाने त्‍याचा मालक व त्‍या गाढवाचा मालक एकच होता. दोघांनाही आता कुंभाराचे साहित्‍य घेऊन बाजारात जाणे भाग असे. त्‍या उमद्या पण जखमी घोड्याला आपल्‍यासारखेच ओझे वाहताना, हमाली करताना पाहून आता गाढवाने पुन्‍हा प्रार्थना केली,'' हे देवा, या लष्‍करी घोड्याचा शेवटचा काळ किती कठीण आहे रे, 
प्रथम वैभव भोगून हा आता अत्‍यंत कठीण दिवस काढत आहे, 
याच्‍या चलतीच्‍या काळात हा उन्‍मत्तपणे वागल्‍यामुळे याच्‍या या परिस्थितीबद्दल कोणालाही याच्‍याबद्दल सहानुभूतीही राहिली नाही. 
देवा, असा उद्दाम व उर्मट घोडा बनण्‍यापेक्षा मी आहे तो गाढवच बरा आहे.''

तात्‍पर्य :- तुम्‍ही रसिक वाचक कथेतील मर्म जाणून घ्‍याल अशी अपेक्षा आहे.
*सौजन्य :-* zpguruji.com
========***********=======
🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏 पुन्हा भेटू उद्या
फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार 
========***********=========

Comments