*🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर प्रस्तुत 📢*
📱 9423625769
1⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 1⃣
🕖 प्रसारण वेळ : रोज सकाळी 06:50 ते 07:00 am
----------------------------------------------------
http://fmbuleteen.blogspot.com
----------------------------------------------------
📅 दि. 08/12/2016 वार - गुरुवार
========***********=========
*📆 . . दिनविशेष . . 📆*
💥 १६५४ :- दासबोध ग्रंथाचा संकल्प १६५४
💥 १८८७ :- कवी *नवी*उर्फ बालकृष्ण शर्मा या प्रसिध्द हिंदी कवीचा जन्मदिन
*संकलक :- सौ. सुभद्रा सानप, बीड*
9403595764
========***********=========
*आजच्या ठळक बातम्या*
1⃣ पाकिस्तानाचे प्रवासी विमान कोसळले,21 मृतदेह मिळाले
2⃣ कॅबिनेटने निवडणूक आयोगाच्या 1 हजार कोटी रुपयांच्या वोटिंग मशीन खरेदी करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली.
3⃣ डोनाल्ड ट्रम्प यांची टाइम्स पर्सन ऑफ द इअर 2016 पुरस्कारासाठी निवड.
4⃣ मुंबई-पुणे अवघ्या 25 मिनिटात, सुपरसॉनिक ट्रेनसाठी हायपरलूपचा सरकारकडे प्रस्ताव.
5⃣ 4 लाख कोटी रुपये किंमतीच्या 19 अब्ज नव्या नोटा गेल्या एका महिन्यात चलनात आणल्याचे आरबीयने सांगितले, अजूनही नव्या नोटा चलनात आणण्यात येणार आहेत त्यामुळे घाबरुन जाण्याचं कारण नाही, लवकरच परिस्थिती रुळावर येईल असा विश्वास आरबीआयने व्यक्त केला आहे.
6⃣ इंग्लंड विरुद्धच्या दोन कसोटी सामन्यांसाठी सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश टी.एस.ठाकूर यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने बीसीसीआयला 1 कोटी 33 लाखाचा निधी खर्च करण्याची मंजुरी दिली.
7⃣ दुखापतीमुळे अजिंक्य रहाणे इंग्लंड विरुद्धच्या कसोटी मालिकेतून बाहेर, कर्नाटकच्या मनिष पांडेची रहाणेच्या जागी निवड.
*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*
📱 9960358300
========***********=========
*🌷 फ्रेश सुविचार 🌷*
प्रत्येक बाबतीत दुसऱ्याच अनुकरण करु नका; स्वतःची वेगळी ओळख निर्माण करा.
*संकलक :- बालाजी चौधरी, लातूर*
7588876539
========***********=========
*आजचा मराठी शब्द*
*सर्वोच्च*
*संकलक :- जगन्नाथ दिंडे, मुखेड*
8668453639
========***********=========
*🎂 आजचा वाढदिवस*
👤 अनिल सुत्रावे, सहाशिक्षक
हुतात्मा पानसरे हायस्कूल धर्माबाद
*संकलक :- नासा येवतीकर, धर्माबाद*
9423625769
[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा वरील क्रमांकावर पाठवू शकता. ]
========***********=========
*आजची @@ गुगली @@*
"कॅशलेस "
सारा व्यवहार आता
पहा कॅशलेस आहे
पैसा नाही म्हणून
तोंडाला फेस आहे
घरी दारी सारेच
द्या म्हणतात नोटा
पैसा नाही म्हटले की
म्हणतात व्यवहार खोटा
शरद ठाकर
सेलू जि परभणी
8275336675
========***********=========
*आजचा*
🎯 विचारवेध...........✍🏻
________________________
जे सर्वसामान्य लोक दैनंदिन जीवन जगत असतात ते जीवन जगत असताना त्यांच्या मनामध्ये कधीच कोणत्याही गोष्टीची हाव असत नाही. त्यांना आजचा दिवस कामाचा, आनंदाचा आणि सुखाचा कसा जाईल एवढीच अपेक्षा करत असतात. मग त्यांना धनसंचय, चैनीच्या वस्तू किंवा आवश्यकतेपेक्षा जास्त
सुख मिळावे याची कधीच अपेक्षा करीत नाहीत.
तसेच ते मोठ्यांकडे पाहून कधीही जगत नाहीत. ते जगतात आपल्यापेक्षा खालच्या सर्वसाधारण लोकांकडे पाहून. कारण त्यांच्यापेक्षा आपण फार सुखी आहोत. जे आहे ते फार चांगले आहे. यातच आपण सुखी आहोत. हेच आपले जीवन जगण्याचे खरे सूत्र आहे असे मानत आपल्या जीवनात खरा आनंद मिळवतात.
- व्यंकटेश काटकर,नांदेड
संवाद.9421839590.
🌿🌸🌿🌸🌿🌸🌿🌸
========***********=========
*आजची लिंक*
7 /12 डॉ. रोहिणी हरीश बुटले
http://saadmanuski.blogspot.com/2016/12/7-12.html
यांचा 20 वर्षाचा प्रवास जरूर वाचा
========***********=======
*आजची बोधकथा*
खरे काय नि खोटे काय
एका गावाच्या बाहेरच्या बाजूला एक झोपडी होती. त्यामध्ये एक गरीब कुटूंब राहत होते. कामानिमित्ताने घरातील यजमान बाहेरगावी गेले होते. झोपडीत फक्त आई आणि तिचा तीन वर्षाचा मुलगा राहिले होते. आईकडे तो मुलगा काही तरी मागत होता व आईजवळ ती वस्तू आणण्यासाठी पैसे नसल्याने ती त्याला गप्प बसविण्याचा प्रयत्न होती पण मुलगा काही गप्प होईना. त्याने त्या वस्तूचा आपला हट्ट पूर्ण होत नसल्याचे पाहून मोठ्याने रडायला सुरुवात केली. आई त्याला गप्प करण्याचा प्रयत्न करू लागली पण मुलगा काही शांत होईना. त्याच वेळेस भूकेने व्याकूळ झालेला एक लांडगा त्या झोपडीपाशी आला व भक्ष्याचा शोध घेऊ लागला. आईला व मुलाला झोपडीबाहेर काय आले आहे याची किंचितशीसुद्धा कल्पना आली नाही. आई आपल्या रडणा-या मुलाचे रडणे थांबविण्यासाठी म्हणाली,'' अरे तुला कितीवेळा समजावून सांगितले तरी तू गप्प काही बसत नाहीयेस. आता जर तु गप्प बसला नाहीस आणि रडणे थांबविले नाही तर मी तुला लांडग्याला देऊन टाकीन. मग तो लांडगा तुला खाऊन टाकेल.'' आपल्या नावाचा उच्चार झालेला पाहून लांडग्याला खूप आनंद झाला व आपल्याला आता भूकेच्या वेळेस कोवळे लुशलुशीत माणसाचे मांस खायला मिळणार म्हणून लांडगा मनामध्ये खूप खूश झाला. त्याने तिथेच आपली बैठक मांडली व माणूस कधी बाहेर फेकला जातो याची वाट पाहू लागला. तेवढ्यात त्याच्या कानावर त्या मुलाच्या आईचे शब्द आले की,'' अरे माझ्या बाळा, मी कशी बरे तुला लांडग्याकडे देईन, मी तुझी आई आहे रे. तो मेला, दुष्ट, धूर्त लांडगा मरू दे तिकडेच आणि चुकून जरी तो इकडे आला ना तर मी त्याला जळत्या लाकडाने बडवीन आणि बाळा तुझे रक्षण करीन.'' आईचे हे बोलणे ऐकून निराश झालेला तो लांडगा तिथून निघून जाताना मनाशीच बडबडला,'' माणसांचे जगच खरे निराळे आहे, आता एक बोलतील आणि नंतर वेगळेच बोलतील. यांच्या मनातले खरे काय आणि खोटे काय हे ब्रह्मदेवाचा बापसुद्धा सांगू शकणार नाही.''
तात्पर्य :- जिभेवर एक आणि मनात एक असणा-यां माणसांपासून कायम सावध राहिलेलेच बरे.
*सौजन्य :-* zpguruji.com
========***********=======
🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏 पुन्हा भेटू उद्या
फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार
========***********=========
Comments
Post a Comment