*🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर प्रस्तुत 📢*
📱 9423625769
1⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 1⃣
🕖 प्रसारण वेळ : रोज सकाळी 06:50 ते 07:00 am
----------------------------------------------------
http://fmbuleteen.blogspot.com
----------------------------------------------------
📅 दि. 09/12/2016 वार - शुक्रवार
========***********=========
*📆 . . दिनविशेष . . 📆*
💥 १९०० डेव्हिसकप टेनिस स्पर्धेचा प्रारंभ
*संकलक :- सौ. सुभद्रा सानप, बीड*
9403595764
========***********=========
*आजच्या ठळक बातम्या*
1⃣ महाराष्ट्रात लवकरच रिअल इस्टेट बिलाची अंमलबजावणी, राज्य सरकारतर्फे अधिसूचना जारी, रिअल इस्टेट बिलाची अंमलबजावणी करणारा महाराष्ट्र पहिलं राज्य ठरणार.
2⃣ जिल्हा सहकारी बँकांवरील निर्बंधांबाबत मुख्यमंत्र्यांसह शिष्टमंडळाची केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांच्याशी चर्चा. शिष्टमंडळाच्या मागण्यांबाबत मुख्यमंत्री सकारात्मक
3⃣ नोटाबंदीनंतर महिनाभरात शिर्डीच्या साईचरणी 17 कोटी 43 लाख रुपयांचं दान.
4⃣ ग्रामीण भागात डिजिटल व्यवहारांना प्रोत्साहन देण्यासाठी स्वाइप मशीन आणि मायक्रो एटीएमची संख्या वाढवली जाईल केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली.
5⃣ बीड जजिल्ह्यात शौचालय नसलेल्या २१ कर्मचाऱ्यांविरुध्द गुन्हा नोंद करण्याचे झेडपी सीईओचे आदेश.
6⃣ ज्युनियर हॉकी विश्वचषक स्पर्धेत भारताची कॅनडावर 4-0 ने मात
7⃣ मुंबई कसोटीत पहिल्या दिवसअखेर इंग्लंडच्या पाच बाद 288 धावा. जेनिंग्सचे शतक, अश्विनचे चार बळी.
14 हजार विद्यार्थी खाजगी शाळेतुन जिल्हा परिषदच्या शाळेत प्रविष्ट
*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*
📱 9960358300
========***********=========
*🌷 फ्रेश सुविचार 🌷*
यश आपयशापेक्षा कर्तव्य करणे अधिक महत्त्वाचे आहे.
*संकलक :- बालाजी चौधरी, लातूर*
7588876539
========***********=========
*आजचा मराठी शब्द*
*कर्तव्य*
*संकलक :- जगन्नाथ दिंडे, मुखेड*
8668453639
========***********=========
*🎂 आजचा वाढदिवस*
👤 कु. राजश्री माधव कुरमुडे, धर्माबाद
👤 अक्षय यम्मलवार, नांदेड
👤 राहुलराज वाघमारे
*संकलक :- नासा येवतीकर, धर्माबाद*
9423625769
[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा वरील क्रमांकावर पाठवू शकता. ]
========***********=========
*आजची @@ गुगली @@*
" सत्ता "
सत्तेच्या काळात
माणसाची वट असते
सत्ता गेली की मग
तोंडावर बोट असते
डोक्यात न शिरू देता
सत्ता भोगली पाहिजे
सत्ता नसताना आपुलकीने
माणसं वागली पाहिजे
शरद ठाकर
सेलू जि परभणी
8275336675
========***********=========
*आजचा*
🎯 विचारवेध........✍🏻
➖➖➖➖➖➖➖➖
ज्यांना आपण आपली समजतो ती आपली कधीच नसतात. त्यांच्यावर कधीच विश्वास ठेऊ नये. कारण ती माणसे कधीच आपल्याविषयी चांगला विचार करत नाहीत. हा अनुभव जवळपास सा-यांनाच आलेला असतो. त्यापेक्षा इतर माणसांवर प्रेम करा. त्यांच्या मदतीला धाऊन जा, संकटकाळी मदतीचा हात पुढे करा. मग हीच माणसे मनामध्ये कोणताही विचार न आणता ते तुमच्या कोणत्याही मदतीला धाऊन येतात. कारण अशी माणसे तुम्ही केलेल्या कृतज्ञतेला कधीच विसरू शकत नाहीत आणि तुमच्याबद्दल कधीही वाईट विचार आणत नाहीत.
अशी नाती आपण आपल्या जीवनात जपायला हवीत. यापासून तरी आपली म्हणणारी माणसं सुधारू शकतील.
- व्यंकटेश काटकर.नांदेड
भ्रमण.9421839590
🍂🍃🍂🍃🍂🍃🍂🍃
========***********=========
*आजची लिंक*
*दफ्तराच्या ओझ्यापासून सुटका*
http://nasayeotikar.blogspot.com/2016/09/school-bag.html
उपाययोजना
========***********=======
*आजची बोधकथा*
*♻ खरे स्वरूप* ♻
=================
*एक धनगर समुद्राकाठी बसून मेंढ्या चारीत असता समुद्र पाहून फार मोहीत झाला. तेव्हा समुद्र अगदी शांत होता व त्यावर गलबते फिरत होती. ते पाहून आपणही समुद्रात व्यापार करावा असे त्यास वाटले व त्याने मेंढ्या विकून एक गलबत विकत घेतले व तो माल भरून व्यापारास निघाला. परंतु वाटेत मोठे वादळ झाले व त्यामुळे गलबत बुडू नये म्हणून सगळा माल त्याला समुद्रात फेकून द्यावा लागला. शेवटी त्याचे जहाज एका खडकावर आपटून फुटले व तो कसाबसा वाचला*.
*यानंतर त्याने ज्या माणसाला आपल्या मेंढ्या विकल्या होत्या, त्याच्याकडे तो मेंढ्या राखण्यासाठी चाकरी करू लागला. असाच एकदा पुन्हा तो समुद्रकाठी आला असता समुद्राकडे बघून म्हणाला.*
*'आता काही मी तुला विसरणार नाही. तुझं स्वरूप मला चांगलं समजलं आहे.'*
*तात्पर्यः ज्याने आपल्याला एकदा फसविले त्याचा पुन्हा विश्वास धरणे धोक्याचे आहे*.
〰〰〰〰〰〰〰
*📝 शब्दांकन/संकलन*
*✒श्रीमती प्रमिलाताई सेनकुडे (शिंदे)*
जि.प.प्रा.शा.वाटेगाव
ता.हदगाव, जि. नांदेड
http://www.pramilasenkude.blogspot.in
========***********=======
🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏 पुन्हा भेटू उद्या
फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार
========***********=========
Comments
Post a Comment