*🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर प्रस्तुत 📢*
📱 9423625769
1⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 1⃣
🕖 प्रसारण वेळ : रोज सकाळी 06:50 ते 07:00 am
----------------------------------------------------
http://fmbuleteen.blogspot.com
----------------------------------------------------
📅 दि. 10/12/2016 वार - शनिवार
========***********=========
*📆 . . दिनविशेष . . 📆*
*गीता जयंती*
🌷 १९४८ :- मानवी हक्क दिन प्रारंभ
🌷चक्रवर्ती राजगोपालाचारी यांचा. जन्म
*संकलक :- सौ. सुभद्रा सानप, बीड*
9403595764
========***********=========
*आजच्या ठळक बातम्या*
1⃣ निफाड (नाशिक) तालुक्यात निचांकी 7 अंश सेल्सियस तापमान, राज्यातील सर्वात कमी तापमानाची नोंद
2⃣मराठा मोर्चासाठी विशेष रेल्वे देण्याचे रेल्वे मंत्र्यांचे आदेश, दोन ठिकाणाहून सुटणार रेल्वे, वाशिम-नागपूर आणि सीएसटी नागपूर अशी रेल्वेसेवा.
3⃣ आयकर खात्याने दिल्लीच्या चांदनी चौकमधील एक्सिस बँकेच्या शाखेवर छापा मारुन 44 बनावट खात्यांची ओळख पटवली ज्यामध्ये 100 कोटी जमा होते.
4⃣ देशभरातील सिनेमागृहांमध्ये राष्ट्रगीतावेळी दिव्यांगांना उभे राहणे बंधनकारक नाही - सुप्रीम कोर्ट
5⃣ शिक्षण योजनेमध्ये मुस्लिम समाजाला 3 लाख जागा उपलब्ध करुन दिल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,
6⃣ ग्राम पंचायतींना आॅडिट करणे बंधनकारक आहे. आॅडिट न केल्यास १४ व्या वित्त आयोगाच्या एक पैशाचाही निधी ग्राम पंचायतींना मिळणार नाही, असे ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी शुक्रवारी विधानसभेत स्पष्ट केले.
7⃣ मुंबई कसोटीत दुस-या दिवसाचा खेळ संपला,तेंव्हा - इंग्लंडच्या पहिल्या डावात 400 धावा तर भारताच्या 1 गडी बाद 146 धावा, मुरली विजय 70 तर पुजारा 47 धावांवर नाबाद.
*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*
📱 9960358300
========***********=========
*🌷 फ्रेश सुविचार 🌷*
एकांतात मिळणाऱ्या क्षणांचं आपण काय करतो यावर आयुष्याकडे पाहाण्याचा आपला दृष्टीकोन व्यक़्त होतो.
*संकलक :- बालाजी चौधरी, लातूर*
7588876539
========***********=========
*आजचा मराठी शब्द*
*दृष्टिकोन*
*संकलक :- जगन्नाथ दिंडे, मुखेड*
8668453639
========***********=========
*🎂 आजचा वाढदिवस*
संदीप मस्के, प्राथमिक शिक्षक
अनिल यादव, धर्माबाद
दशरथ एम. शिंदे
*संकलक :- नासा येवतीकर, धर्माबाद*
9423625769
[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा वरील क्रमांकावर पाठवू शकता. ]
========***********=========
*आजची @@ गुगली @@*
" भूमिका "
सत्तेत की विरोधात
सांगता येत नाही
कोणत्या ही एका बाजूत
थांबता ही येत नाही
कोणती तरी एक बाजू
पक्की धरायला पाहिजे
भूमिकेसह आपले
मार्गक्रमण करायला पाहिजे
शरद ठाकर
सेलू जि परभणी
8275336675
========***********=========
*आजचा*
🎯 विचारवेध...........✍🏻
------------------------
मी स्वतंत्र आहे नि माझा संबंध कुणाशीही नाही किंवा इतरांशी माझे काही देणे घेणे नाही अशी म्हणणारी व्यक्ती स्वतःच्या जीवनात कोणतीच प्रगती करु शकत नाही. ती आपल्या कामात यशस्वीही होऊ शकत नाही. कारण जीवनाच्या प्रत्येक छोट्या मोठ्या प्रसंगाना तोंड देण्यासाठी, दैनंदिन व्यवहार सुरळीतपणे पार पाडण्यासाठी कुणाच्या ना कुणाच्या मदतीची गरज लागते. त्याच्या शिवाय त्याच्या जीवनाची नौका पैलतिरी जाऊ शकत नाही. माझा कुणाशीही संबध नाही असे म्हणणे चुकीचेच आहे.
- व्यंकटेश काटकर,नांदेड
भ्रमण..9421839590.
🍃🌺🍃🌺🍃🌺🍃
========***********=========
*आजची लिंक*
*" कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन "*
http://nasayeotikar.blogspot.com/2016/12/blog-post_8.html
*गीता जयंती विशेष प्रासंगिक लेख जरूर वाचा*
========***********=======
*आजची बोधकथा*
घुबडाची पिल्ले
एक गरूड व एक घुबड यांचं बरेच दिवस चालत असलेलं वैर एकदाशी संपुष्टात आलं. दोघांनीही एकमेकांशी प्रेमानं वागण्याचं त्याचप्रमाणे एकमेकांच्या पिल्लांना न खाण्याचं वचन दिलं.
आता ते एकमेकांचा निरोप घेणार इतक्यात गरूड घुबडाला म्हणाला,''घुबडराव, तुम्ही मला एक गोष्ट सांगा की, मी तुमची पिल्लं कशी
असतात ते अजून पाहिलेलं नाही
तेव्हा तुम्ही त्यांचं वर्णन करा. म्हणजे त्यांना ओळखणं व न खाणं माझ्या दृष्टीनं सोयीचं जाईल.'' घुबड म्हणाले,''गरूडराव, आपणच आपल्या तोंडाने आपली स्तुती करणे हा केवळ मूर्खपणा आहे पण तरीसुद्धा सांगतो माझी पिल्लं अगदी गोजिरी आहेत. अवर्णनीय सौंदर्य म्हणजे काय ते माझ्या पिल्लांकडे पाहून कळते. काय ते त्यांचे गोलसर चेहरे, काय ते सुंदर डोळे अगदी देवानं सारं रूपभांडार माझ्या पिल्लांमध्येच ओतलंय.'' एवढे बोलल्यावर गरूड व घुबड दोघेही उडून गेले. चार दिवसानंतर भूकेला गरूड भक्ष्याच्या शोधार्थ इकडेतिकडे संचार करत असताना एका झाडाच्या ढोलीत त्याला कुठल्यातरी पक्ष्याची अत्यंत कुरुप अशी तीन चार पिल्लं दिसली. गरुडाने विचार केला की घुबडाने ज्या अर्थी त्याची पिल्लं अत्यंत सुंदर असल्याचे सांगितले आहे त्याअर्थी ही पिल्ले त्याची असणेच शक्य नाही असे वाटून त्याने ती पिल्ले खाऊन टाकली. तेवढ्यात तिथे घुबड आले व आपली पिल्ले खाल्लेली पाहून घुबड खूप संतापले व
गरूडाला म्हणाले,'' नीच पक्ष्या तू ही शेवटी वचनभंग केलास. दिलेल्या वचनाला न जागणे म्हणजे काय हे तू दाखवून दिलेस. माझी पिल्ले खाऊन तू मोठा गुन्हा केला आहेस'' यावर गरूड म्हणाला,'' घुबडराव रागावू नका पण मी खूप भूकेला होतो आणि या झाडाच्या ढोलीत असणारी पिल्ले अतिशय कुरुप होती. ती तुमची असणे शक्यच नाही असे वाटून मी ती खाल्ली. तुम्ही तुमच्या पिल्लांचे रूपवर्णन अतिशय मोहक व
सुंदर असल्याचे केले होते. तुम्हीच तुमचा नाश स्वत:च्या बोलण्याने करून घेतला आहे.'' यावर घुबडाला काहीच बोलता आले नाही व
ते तिथून निघून गेले.
*तात्पर्य - कधीकधी आपण आपला नसता मोठेपणा इतरांसमोर मांडत असतो पण प्रत्यक्षात तसे नसते. खरी परिस्थिती कधी ना कधी उघडकीस येते याचे भान
ठेवून सत्य सांगितल्यास भविष्यातील धोके टाळता येतात.*
*सौजन्य :-* zpguruji.com
========***********=======
🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏 पुन्हा भेटू उद्या
फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार
========***********=========
Comments
Post a Comment