फ्रेश मॉर्निंग बुलेटीन दिनांक 11 डिसेंबर 2016

*🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर प्रस्तुत 📢*
📱 9423625769

1⃣  🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 1⃣ 
🕖 प्रसारण वेळ : रोज सकाळी 06:50 ते 07:00 am
----------------------------------------------------
http://fmbuleteen.blogspot.com
----------------------------------------------------
📅 दि. 07/12/2016 वार - बुधवार 
========***********=========
       *📆 . . *दिनविशेष . . 📆*
      *आंतरराष्ट्रीय पर्वत दिवस*

⌛१८१६ : इंडियाना अमेरिकेचे १९वे राज्य झाले.
💥जन्म
⌛१९६९ : विश्वनाथन आनंद, भारतीय बुद्धिबळ खेळाडू, ग्रँडमास्टर.
⌛१९०९ : नारायण गोविंद कालेलकर, भाषाशास्त्रज्ञ.
⌛१९२२ : दिलीपकुमार, हिंदी चित्रपट अभिनेता.
⌛१९३५ : प्रणव मुखर्जी, भारतीय प्रजासत्ताकाचे १३वे राष्ट्रपती
💥मृत्यू
⌛१९८७ : जी.ए. तथा गुरूनाथ आबाजी कुलकर्णी, मराठी लेखक.
⌛१९९८ : राष्ट्रकवी प्रदीप, हिंदी कवी.
⌛२००४ : एम.एस. सुब्बुलक्ष्मी, गायिका आणि भारतरत्न, रेमन मॅगसेसे पुरस्कारविजेत्या.
⌛१९६३ : कोवलम माधव पणिक्कर, राजकारणी, इतिहासकार.
*संकलक :- सौ. सुभद्रा सानप, बीड*
                 9403595764
========***********=========
*आजच्या ठळक बातम्या*
1⃣आज तुमची बँक, तुमचं पाकीट हे सगळं तुमच्या मोबाईलमध्ये आलं आहे. सर्वांनी ई-बँकिंग, ई-वॉलेटच्या सुविधांचा वापर करण्यास सुरूवात करावी, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले
2⃣तामिळनाडुचे दिवंगत मुख्यमंत्री जयललिता यांचं स्मारक बांधण्याचा ठराव तामिळनाडू विधानसभेत मंजूर, 15 कोटी खर्च करुन बांधण्यात येणार स्मारक.
3⃣ परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांच्यावरील किडनी प्रत्यारोपण शस्त्रक्रिया पूर्ण
4⃣ नाबार्डकडून शनिवारी राज्यातील बहुतांश जिल्हा बँकांमध्ये तपासणी सुरू. सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीच्या दृष्टीने नाबार्डची तयारी. नाणेवारी, कोअर बँकींग, केवायसी पूर्तता याविषयीची माहिती घेण्यास सुरुवात.
5⃣ भारत विरुद्ध इंग्लंड कसोटी सामन्यात चौथ्या दिवसाचा खेळ संपला तेंव्हा भारताच्या 7 विकेट्स गमावत 451 धावा, कोहली 147 धावांवर नाबाद.
6⃣, अभिजीत काटकेचा पराभव करत विजय चौधरी ठरला महाराष्ट्र केसरी 2016, महाराष्ट्र केसरीची हॅटट्रिक.
7⃣हॉकी ज्युनिअर वर्ल्ड कपमध्ये भारतीय संघाकडून इंग्लंडचा 5-3 ने पराभव, क्वार्टरफायनलमध्ये दाखल
💥जेष्ठ अभिनेते, माजी आमदार राजाराम शिंदे यांचं वयाच्या 87व्या वर्षी चिपळूणमध्ये निधन.
*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*
📱 9960358300
========***********=========
*🌷 फ्रेश सुविचार 🌷*
जीवनातील काही पराभव हे विजयाहूनही अधिक श्रेष्ठ असतात .

*संकलक :- बालाजी चौधरी, लातूर*
                  7588876539
========***********=========
*आजचा मराठी शब्द*
             *श्रेष्ठ*

*संकलक :- जगन्नाथ दिंडे, मुखेड*
                  8668453639
========***********=========
*🎂 आजचा वाढदिवस* 
👤 इलियास शेख प्रा. शिक्षक दिग्रस
👤 प्रा. नितीन दारमोड, धर्माबाद
*संकलक :- नासा येवतीकर, धर्माबाद*
                  9423625769
[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा वरील क्रमांकावर पाठवू शकता. ]
========***********=========
*आजची @@ गुगली @@*

  " स्वाभिमान "

समाजात वागतांना जर
तुमचा वाकडा पाय आहे
तर तुमचे भविष्य विचारायची
सांगा गरजच काय आहे

स्वाभिमानाने जगायचे तर
मग निट वागले पाहिजे
माणसाने माणूस म्हणून
ताठ मानेने जगले पाहिजे

     शरद ठाकर
सेलू जि परभणी
8275336675
========***********=========
*आजचा*

🎯 विचारवेध.........✍

दुस-याला फसवून किंवा लुबाडून बेगडी जीवन जगण्यापेक्षा स्वतःला थोडे विसरून दुस-यासाठी काहीतरी सहकार्य करून जीवन जगणे केव्हाही मनाला समाधान देणारे आहे.त्यातच स्वाभिमानाने जगण्याचे खरे सूत्र दडले आहे.

- व्यंकटेश काटकर,नांदेड.

  संवाद.9421839590

☘☘☘☘☘☘☘

========***********=========
*आजची लिंक*
http://marathi.pratilipi.com/na-sa-yevtikar/hame-to-lut-liya

लेख जरूर वाचा
========***********=======
*आजची बोधकथा*
              चोर ते चोर अन वर शिरजोर
एका गावात एक पिठाची गिरणी होती. गिरणीचा मालक थोडासा लुच्‍चा इसम होता. तो गि-हाईकाच्‍या दळणातील थोडेसे धान्‍य अथवा पीठ काढून घेत असे. त्‍याची ही चोरी अनेकांच्‍या लक्षात येत असे पण गावात दुसरी गिरणी नसल्‍याने लोक गप्‍प बसत असत. एकेदिवशी धान्‍याच्‍या टोपलीत गिरणीमालकाला एक उंदीर सापडला. त्‍या उंदराला पकडून तो माणूस त्‍याच्‍या मांजराकडे देणार इतक्‍यात तो उंदीर विनवणीच्‍या सुरात त्‍या दळणक-याला म्‍हणाला,'' अहो मालक, मी चोर नाही. तुमच्‍याकडे येणा-या धान्‍यातील चारदोन दाणे खाऊन मी माझी भूक भागवितो आहे. तेव्‍हा मला कृपया तुम्‍ही सोडून द्यावे अशी माझी तुम्‍हाला विनंती आहे.'' त्‍याचे हे बोलणे ऐकून तो इसम त्‍याला म्‍हणाला,''अरे उंदरा धान्‍याचे चारदोन दाणे का होईना पण ते तू चोरून खातोसच ना. मग ही चोरीच आहे त्‍याबद्दल तुला शिक्षा झालीच पाहिजे.'' उंदीर म्‍हणाला,'' प्रत्‍येक दळणातले चारदोन दाणे खाणारा मी जरी चोर असलो तरी मी खूपच छोटी चोरी करतो तुम्‍ही तर प्रत्‍येक दळण दळण्‍याचे पैसेही घेता आणि वरून त्‍या दळणातील थोडे धान्‍य आणि थोडे पीठ अशी तिहेरी चोरी करता मग तुम्‍ही तर खूप मोठे चोर आहात. अशा या चोरीबद्दल तुम्‍ही स्‍वत:ला काय शिक्षा करून घेणार आहात.'' उंदराच्‍या या बोलण्‍याने माणूस खूपच संतापला व म्‍हणाला,'' चोरी करून ते करून वरून परत मलाच चोर ठरवतोस. काहीही झाले तरी माणूस आहे आणि माणूस हा पृथ्‍वीवरचा सर्वश्रेष्‍ठ प्राणी आहे. तो काय करतो, कुठे चुकतो, कुठे बरोबर असतो हे ठरवण्‍याचा अधिकार प्रत्‍यक्ष परमेश्‍वरालाही नाही. तू लहान का होईना चोरी केलीस आणि आता तू शिक्षेला पात्र आहेस'' असे म्‍हणून त्‍याने त्‍या उंदराला मांजराच्‍या स्‍वाधीन केले.

तात्‍पर्य - जगात लहान चोरांना शिक्षा मिळते आणि मोठ्या चोरांना प्रतिष्‍ठा मिळते.
वर्तमानपत्रातून संग्रहित

*सौजन्य :-* zpguruji.com
========***********=======
🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏 पुन्हा भेटू उद्या
फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार 
========***********=========

Comments