*🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर प्रस्तुत 📢*
📱 9423625769
1⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 1⃣
🕖 प्रसारण वेळ : रोज सकाळी 06:50 ते 07:00 am
----------------------------------------------------
http://fmbuleteen.blogspot.com
----------------------------------------------------
📅 दि. 12/12/2016 वार - सोमवार
========***********=========
*📆 . . दिनविशेष . . 📆*
💥 ईद ए मिलाद
💥 स्वदेशी दिन
💥१९३० :- परदेशी मालाच्या बहिष्कारासाठी बाबू गेणूचे बलीदान
💥 १९९२ :- पं.महादेवशास्री जोशी यांचे निधन
💥 १९४९ :- महाराष्ट्राचे लाडके नेते गोपीनाथ मुंढे यांची जयंती
*संकलक :- सौ. सुभद्रा सानप, बीड*
9403595764
========***********=========
*आजच्या ठळक बातम्या*
1⃣ 90 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी डॉ.अक्षयकुमार काळे, 700 मतांनी विजयी
2⃣ इस्लामचे प्रेषित म्हणून हजरत मुहम्मद पैगंबर हे मानव जातीसाठी कृपावंत म्हणून ओळखले जातात. त्यांची जयंती (ईद-ए-मिलाद) आज सर्वत्र ‘अमन दिन’ म्हणून साजरी केली जाणार
3⃣ तमिळनाडूमध्ये वरदा चक्रीवादळाच्या पार्श्वभुमिवर 12 डिसेंबरला कांचीपुरम, तिरुवल्लूर,चेन्नई आणि विलुपुरमच्या किनारी भागांमध्ये पब्लिक हॉलीडे घोषित .
4⃣ नागपूरमध्ये काल एटीएममधून दोन हजाराची एक बनावट नोट निघाल्यामुळे बँक प्रशासनासह सर्वत्र खळबळ उडाली आहे.
5⃣ रेल्वे प्रवाशांच्या खिशाला लवकरच झळ बसण्याची शक्यता आहे. रेल्वे मंत्रालय तिकिट दरात वाढ करण्याच्या तयारीत असल्याचं वृत्त आहे.
6⃣ कसोटीत नवव्या क्रमांकावर फलंदाजीस येऊन शतक फटकावणारा जयंत यादव पहिला भारतीय फलंदाज.
7⃣ मुंबई कसोटीत चौथ्या दिवसाचा खेळ संपला, इंग्लंडच्या 6 बाद 182 धावा, भारतापेक्षा अजूनही 49 धावांनी पिछाडीवर.
*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*
📱 9960358300
========***********=========
*🌷 फ्रेश सुविचार 🌷*
तनशुध्दी स्नानाने होते .धनशुध्दी दानाने होते तर मनशुध्दी ध्यानाने होते
*संकलक :- बालाजी चौधरी, लातूर*
7588876539
========***********=========
*आजचा मराठी शब्द*
*ध्यान*
*संकलक :- जगन्नाथ दिंडे, मुखेड*
8668453639
========***********=========
*🎂 आजचा वाढदिवस*
👤माधव सोनटक्के, प्राथमिक शिक्षक
👤नागनाथ परसुरे, प्राथमिक शिक्षक
👤शुभानन गांगल, पुणे
*संकलक :- नासा येवतीकर, धर्माबाद*
9423625769
[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा वरील क्रमांकावर पाठवू शकता. ]
========***********=========
*आजची @@ गुगली @@*
" बकणे "
राजा म्हणतो रंक म्हणतो
मला बोलू देत नाहीत
पण कोणी कोणाचे कुठे
तोंड शिवून घेत नाहीत
घसा कोरडा होई पर्यंत
बक बक बकत असतात
बोलू देत नाहीत म्हणून
सा-या समोर घोकत असतात
शरद ठाकर
सेलू जि परभणी
8275336675
========***********=========
*आजचा*
🎯 विचारवेध..........✍🏻
====================
चेह-यावरुन किंवा हातावरच्या रेषेवरुन जीवनाचे भविष्य सांगणा-या ज्योतिष्याकडून आपले जीवन सुखी व समृध्द बनत नाही. तर आपण करणा-या परिश्रमाने आणि बुद्धीने मिळवलेल्या कौशल्यातून जीवन सुखी व समृद्ध बनू शकते.
- व्यंकटेश काटकर,नांदेड
संवाद.9421839590.
🌿🌹🌿🌹🌿🌹🌿🌹
========***********=========
*आजची लिंक*
*साहित्य दरबार वैचारिक लेखमाला स्पर्धा*
विषय :-
*आजची बचत ; उद्याचे भविष्य*
http://sahitydaarpan.blogspot.com/2016/12/blog-post.html
वरील लिंक ला क्लिक करून सर्व लेख वाचा
========***********=======
*आजची बोधकथा*
*सर्वात उत्तम व सर्वात वाईट वस्तू*
ग्रीस देशातील झांथस या तत्ववेत्याकडे इसाप नावाचा एक स्वयंपाकी काम करत होता. एकदा इसापच्या मालकाकडे पाहुणे आले असताना मालकाने इसापला बोलावून घेतले व म्हणाला,'' इसाप या पाहुण्यांसाठी तुझ्या दृष्टीने सर्वात उत्तम वस्तू आणून व त्या पदार्थापासून सुंदर व चविष्ट अशी पाककृती करून खाऊ घाल.'' इसाप बाजारात गेला व त्याने बोकडाच्या जिभांचे तुकडे आणले व त्याचा उत्कृष्ट असा पदार्थ तयार करून तो पाहुण्यांना खाऊ घातला. सर्वांनी अगदी आवडीने तो पदार्थ खाल्ला. या मेजवानीला चार पाच दिवस उलटून गेल्यावर मालकाने इसापला बोलावले व म्हणाला,''इसाप, तुझे स्वयंपाकातील कौशल्य पाहुण्यांना बरेच मानवले आहे असे दिसून येते. हे पाहुणे काही जायचे नावच काढत नाहीयेत. आता तू एक काम कर की बाजारात जा आणि तुझ्या दृष्टीने जी सर्वात वाईट वस्तू आहे ती घेऊन ये व त्याचा पदार्थ बनवून या पाहुण्यांना खाऊ घाल जेणेकरून हे इथून निघून जातील'' इसाप पुन्हा बाजारात गेला व त्याने पुन्हा बोकडांच्या जिभाच आणल्या व पाहुण्यांना पाककृतीमध्ये खाऊ घातल्या. मालकाच्या हे लक्षात आले व त्याने इसापला बाजूला घेतले व विचारले,'' सर्वात चांगली वस्तू म्हणून आणि वाईट वस्तू म्हणूनही तू जिभांचीच का निवड केली.'' इसाप उत्तरला,'' मालक, जीभ हा अवयव जेवढी चांगली आहे तेवढीच वाईटही आहे. विद्या, ज्ञान, धर्म, तत्वज्ञान यांचा प्रसारही जिव्हा करते आणि शिव्या, भांडणे, निंदानालस्ती, वाईट विचारही जिभेच्याच माध्यमातून बाहेर पडतात. चांगले विचार प्रसार करणारी जीभ जेव्हा वाईंटाच्या आश्रयाला जाते तेव्हा ती बंड, खून, मारामा-या, लबाड्या यांना चिथावणी देते व त्यातूनच समाजात वाईट वृत्ती वाढीस लागते.''
तात्पर्य - जिभेचा वापर आपण कशा पद्धतीने करतो यावर तिचे चांगलेपण व वाईटपण अवलंबून असते. जिभेने ओव्या गायच्या की शिव्या द्यायच्या हे आपल्याच हातात आहे. काय खरं की नाही.
वर्तमानपत्रातून संग्रहित
*सौजन्य :-* zpguruji.com
========***********=======
🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏 पुन्हा भेटू उद्या
फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार
========***********=========
Comments
Post a Comment