*🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर प्रस्तुत 📢*
📱 9423625769
1⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 1⃣
🕖 प्रसारण वेळ : रोज सकाळी 06:50 ते 07:00 am
----------------------------------------------------
http://fmbuleteen.blogspot.com
----------------------------------------------------
📅 दि. 13/12/2016 वार - मंगळवार
========***********=========
*📆 . . दिनविशेष . . 📆*
➖➖➖➖➖➖➖➖➖
*श्री दत्त जयंती*
💥 माल्टा : प्रजासत्ताक दिन
💥 १९७५:- कृष्णा प्रवासाची सांगता
💥१९९६ :- कोफी अन्नान सयुक्त राष्ट्रसंघाच्या सरचिटणीसपदी
💥 २००३:- प्रसिध्द बंगाली लेखिका महाश्वेतादेवी यांना ऑफिसर ऑफ आर्टस एॅन्ड लिटरेचर हा फ्रान्सचा दुसऱ्या क्रमांकाचा सर्वोच्च नागरी किताब जाहिर
*संकलक :- सौ. सुभद्रा सानप, बीड*
9403595764
========***********=========
*आजच्या ठळक बातम्या*
1⃣ अरबी समुद्रातील शिवस्मारकाच्या भूमिपूजनला अखेर मिळाला मुहूर्त, २४ डिसेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते होणार भूमिपूजन.
2⃣ नोटाबंदीनंतर बँकांनी बाद नोटा काही ठरावीक मंडळींना आणि काळ्या पैशाच्या बदल्यात बदलून दिल्याचे आरोप होत असतानाच, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बँकांच्या ५00 शाखांमध्ये स्टिंग आॅपरेशन केले
3⃣ नंदुरबार जिल्ह्यात कुपोषणानंतर आता सिकलसेल आजाराचे आव्हान, जिल्हयात 35 हजार सिकलसेलग्रस्त. आदिवासींमध्ये प्रमाण अधिक
4⃣ वरदा चक्रीवादळाच्या तडाख्यात आत्तापर्यंत सात जणाचा मृत्यू झाल्याचे समजते.
5⃣ नविन वर्षात 01 जानेवारीपासून वाहनांच्या किमतीत 5 ते 25 हजार रुपयांनी वाढ करण्याचा टाटा मोटर्सचा निर्णय.
6⃣ हॉकी ज्यूनिअर वर्ल्ड कप भारताने जिंकली, भारताने दक्षिण अफ्रिकेवर 2-1 असा विजय मिळविला.
7⃣ मुंबईत इंग्लंडविरुद्धच्या चौथ्या कसोटीत भारताचा ३६ धावा आणि १ डावाने दणदणीत विजय. दुस-या डावात इंग्लंडचे सर्व गडी १९५ धावांत बाद, कर्णधार विराट कोहली (२३५) ठरला सामनावीर
8⃣ एबी डिव्हिलियर्सने दक्षिण आफ्रिकेच्या कसोटी संघाच्या कर्णधारपदाचा राजीनामा दिला आहे. एबीने राजीनामा दिल्यानंतर सीएसए चीफ हारुण लोगार्ट यांनी एबीचा राजीनामा स्विकारत फाफ डू प्लेसिसकडे कसोटी संघाच्या कर्णधारपदाची सुत्र दिली
*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*
📱 9960358300
========***********=========
*🌷 फ्रेश सुविचार 🌷*
जो करी मनोरंजन मुलांचे ; नाते जडेल प्रभुशी तयाचे - साने गुरुजी
*संकलक :- बालाजी चौधरी, लातूर*
7588876539
========***********=========
*आजचा मराठी शब्द*
*स्मारक*
*संकलक :- जगन्नाथ दिंडे, मुखेड*
8668453639
========***********=========
*🎂 आजचा वाढदिवस*
👤रोहन माधव कुरमुडे, धर्माबाद
👤राजेश वाघ, सहशिक्षक, नांदेड
👤अनिल गायकवाड, सहशिक्षक, बिलोली
👤शेख सोहेल अहमद, धर्माबाद
*संकलक :- नासा येवतीकर, धर्माबाद*
9423625769
[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा वरील क्रमांकावर पाठवू शकता. ]
========***********=========
*आजची @@ गुगली @@*
"महंत "
काळ्याच पांढर करण्यात
संत महंताचा हात आहे
आधुनिक महंताची तर
पहा वाईटाला साथ आहे
अध्यात्म म्हणजे हल्ली
महंताचा धंदा आहे
काळं पांढर करणाराचा
तर रूपया बंदा आहे
शरद ठाकर
सेलू जि परभणी
8275336675
========***********=========
*आजचा*
🎯 विचारवेध.........✍🏻
"""""""""""""""""""""""""""""""
फुलांचा हार जसा अनेक फुलांनी बनतो आणि कुणाच्यातरी गळ्यात आदराने पडतो. त्यामुळे त्याच्या गुणांचा गौरव फुलांच्या हाराने केला जातो. फुलांना आनंदाचे, स्वागताचे, सत्काराचे, पूजेचे आणि प्रेमाचेही प्रतिक म्हणून आपण सारे स्वीकार करतो. त्याप्रमाणेच आपणही आपल्या विचाराने, कर्तृत्वाने इतरांच्याही जीवनात फुलांसारखे स्थान मिळवण्याचा प्रयत्न करावा. आपलेही स्थान फुलांसारखेच आदराचे, सन्मानाचे निर्माण होईल.
- व्यंकटेश काटकर,नांदेड
भ्रमण.9421839590.
💠🌹💠🌹💠🌹💠🌹
========***********=========
*आजची लिंक*
नमस्कार मंडळीनो ...
प्रतिलिपीवर नवे काही, नवी स्पर्धा
http://marathi.pratilipi.com/event/kalpataru-sam-to-spardha
या लिंक वर क्लिक करा व पहा सविस्तर माहिती ... *शेवटची तारीख 15 डिसेंबर*
========***********=======
*आजची बोधकथा*
एकदा एका साधुने त्याच्या शिष्यांना विचारले, ” आपण रागात असताना जोरात ओरडतो किंवा कोणाशी भांडण झाले असल्यास आपोआप आपला आवाज वाढतो, असेका?”. सर्व शिष्य विचार करु लागले. एक शिष्याने उत्तर दीले, “रागावलेले असताना आपण स्वतःवरचे नियंत्रण हरवुन बसतो, आणि म्हणुनच कदाचीत ओरडून बोलतो.”
यावर साधुमहाराज म्हणाले, ” पण ज्या व्यक्तीवर आपण रागावलेले असतो ती समोरच असते तरी सुध्दा आपण ओरडतो।जरी सौम्य आणि मृदु आवाजात बोलणे शक्य असले तरी देखील रागात आपण चढ्या आवाजातच बोलतो”. यावर सर्व शिष्यांनी विचार केला आणि आपापल्या परीने उत्तर देण्याचा प्रयत्न केला, मात्र कोणत्याच उत्तराने साधुचे समाधान झाले नाही. शेवटी साधुमहाराजांनी स्वतःच उत्तर दीले. ते म्हणाले, ” जेव्हा दोन व्यक्ती एकमेकांवर रागावलेल्या असतात तेव्हा त्यांच्या मनांमध्ये अंतर वाढलेले असते आणि हेच अंतर भरुन काढण्याकरीता ते चढया आवाजात बोलतात.”
“आता मला सांगा की जेव्हा दोन व्यक्ती परस्परांच्या प्रेमात असतात तेव्हा अतीशय हळू आणि शांतपणे बोलतात, असे का?” असा प्रश्न विचारुन मग स्वतःच उत्तर देत ते म्हणाले,” कारण त्यांची मनं जवळ आलेली असतात. दोन मनांतील अंतर कमी झालेले असते.
आणि जसजसे दोन व्यक्ती मधील प्रेम वाढु लागते तसतसे त्यांच्यातील संवाद इतका सुलभ होउन जातो की सर्वच गोष्टी बोलण्याची देखील आवश्यकताच भासत नाही. फक्त नजरेतुनच किंवा देहबोलीतुनच ते आपल्या साथीदाराला काय म्हणायचे आहे ते ओळखतात.
शिकवण - परस्परांत वाद विवाद आणि भांडण तंटे होतच राहतात मात्र कितीही वादविवाद असला तरी मनामनातील अंतर वाढु देउ नका।तसे होउ दील्यास दोन व्यक्तींमधील दरी इतकी मोठी होइल की पुन्हा ती मिटवणे कधीच शक्य होणार नाही…..
*सौजन्य :-* https://majhimarathi.wordpress.com
========***********=======
🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏 पुन्हा भेटू उद्या
फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार
========***********=========
Comments
Post a Comment