*🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर प्रस्तुत 📢*
📱 9423625769
1⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 1⃣
🕖 प्रसारण वेळ : रोज सकाळी 06:50 ते 07:00 am
----------------------------------------------------
http://fmbuleteen.blogspot.com
----------------------------------------------------
📅 दि. 14/12/2016 वार - बुधवार
========***********=========
*📆 . . दिनविशेष . . 📆*
➖➖➖➖➖➖➖➖➖
💥 १९७७ महाराष्ट्र वाल्मिक ग .दि. माडगुळकर स्मृतिदिन
💥 १९१८ बी .के. एस.अय्यंगार भारतीय योग यांची जयंती
💥 १९४६ संजय गांधी यांची जयंती
*संकलक :- सौ. सुभद्रा सानप, बीड*
9403595764
========***********=========
*आजच्या ठळक बातम्या*
1⃣ संसदेच्या हिवाळी अधिवेशनातील शेवटचे तीन दिवस पंतप्रधान नरेंद्र मोदी संसदेत उपस्थित राहणार. संसदीय कामकाज मंत्री व्यंकय्या नायडू यांनी दिली माहिती.
2⃣ एकाचवेळी दोन ठिकाणांहून निवडणूक लढवण्यावर येणार बंदी ?
3⃣ तामिळनाडूमध्ये वरदा चक्रीवादळात १६ लोकांचा मृत्यू झाला असून तामिळनाडू सरकार मृतांच्या कुटुंबियांना ४-४ लाख रुपये मदत करणार
4⃣ नोटाबंदी झाल्यापासूनचं सीसीटीव्ही फुटेज जपून ठेवा, आरबीआयचा बँकांना आदेश
5⃣ केरळमध्ये राष्ट्रगीताला उभं न राहणा-या 11 जणांना अटक
6⃣ विराटच्या करिअरमध्ये सचिनचा 'तो' सल्ला ठरला निर्णायक
7⃣ लोढा समितीच्या शिफारशींचा पुनर्विचार करण्याची मागणी करणारी बीसीसीआयची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली
8⃣ प्रियंका चोप्रा बनली युनिसेफची सदिच्छादूत
*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*
📱 9960358300
========***********=========
*🌷 फ्रेश सुविचार 🌷*
सौंदर्य हे कोणत्याही वस्तूत नसून पाहण्याच्या दृष्टीत असते.
*संकलक :- बालाजी चौधरी, लातूर*
7588876539
========***********=========
*आजचा मराठी शब्द*
*दृष्टी*
*संकलक :- जगन्नाथ दिंडे, मुखेड*
8668453639
========***********=========
*🎂 आजचा वाढदिवस*
सारंग भंडारे, येवती
*संकलक :- नासा येवतीकर, धर्माबाद*
9423625769
[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा वरील क्रमांकावर पाठवू शकता. ]
========***********=========
*आजची @@ गुगली @@*
" भाव "
सुधारायचा तर
सारा गाव आहे
स्वत:सुधारायचे
कुठे नाव आहे ?
स्वतःबदलले तर
बदलेल की गाव
तरच मिळेल ना
तुम्हाला हो भाव !
शरद ठाकर
सेलू जि परभणी
8275336675
========***********=========
*आजचा*
🎯 विचारवेध.........✍🏻
________________________
जीवनात घडलेल्या प्रसंगाची सत्यता पडताळून पाहण्यासाठी वास्तवता पहावी लागते कल्पकता नाही. कल्पनेने राईचा पर्वतही करता येतो पण त्यात सत्य नसते आणि त्यामुळे योग्य निर्णय देणे अवघड जाते. अशावेळी अन्यायाच्याच बाजूने निर्णय दिला जाण्याची शक्यता असते. त्यासाठी वास्तव परिस्थितीचे अवलोकन करुन निर्णय देणे म्हणजे न्याय बाजूला दुजोरा देणे होय. मग तो प्रसंग कोणताही असो. म्हणून कोणताही निर्णय देत असताना किंवा घेत असताना घाई करु नये हे अगदी खरे आहे.
- व्यंकटेश काटकर,नांदेड.
भ्रमण.9421839590.
🍃🌺🍃🌺🍃🌺🍃🌺
========***********=========
*आजची लिंक*
*उपक्रम :- आजचा मराठी शब्द*
http://zppschirli.blogspot.com/2016/08/blog-post_8.html
आपण ही आपल्या उपक्रमाची लिंक याठिकाणी पोस्ट करू ईच्छित असाल तर आपल्या उपक्रमाची लिंक पोस्ट करा
========***********=======
*आजची बोधकथा*
एकदा एका विमानतळावर एक मुलगी वाट पाहत बसली होती. थोड्या वेळाने तिने तिथल्याच स्टोअरमधून एक पुस्तक आणि बिस्कीटपुडा खरेदी केला. कुणाचा त्रास होऊ नये म्हणून ती “व्हीआयपी वेटिंग एरिया’त जाऊन पुस्तक वाचत बसली.
तिच्या शेजारी दुसरे एक गृहस्थ वर्तमानपत्र वाचत बसले होते. शेजारी बिस्किटाचा पुडा होता. तिने एक बिस्कीट खाताच त्यांनीही त्याच पुड्यातून एक बिस्कीट घेऊन खाल्ले. त्या गृहस्थाचा निर्लज्जपणा पाहून तिचा पारा चढला. “काय निर्लज्ज मनुष्य आहे हा! माझ्या अंगी थोडी हिंमत असती, तर याला इथल्या इथे चांगलंच सरळ केलं असतं!’ ती मनात विचार करत होती.
दोघांचेही एक-एक बिस्कीट खाणे सुरूच होते. आता शेवटचे बिस्कीट उरले.
“आता हा हावरट मनुष्य ते बिस्कीट स्वत: खाईल, का मला अर्धे देण्याचा आगाऊपणा करेल?’ ती विचार करत होती. “”आता हे अतिच झालं,” असे म्हणत ती दुसऱ्या खुर्चीवर जाऊन बसली.
थोड्या वेळाने राग शांत झाल्यावर पुस्तक ठेवायला तिने पर्स उघडली. पाहते तर काय, तिचा बिस्कीटपुडा पर्समध्येच होता.
आपण कुणा दुसऱ्याची बिस्किटे खाल्ली, याची तिला खूप लाज वाटली. एका शब्दानेही न बोलता त्या व्यक्तीने आपली बिस्किटे तिच्यासोबत वाटली होती. तिने नजर टाकली, तर शेवटचे बिस्कीटही त्याने तिच्यासाठी ठेवले होते.
निष्कर्ष – आयुष्यात कितीतरी वेळा आपण दुसऱ्याच्या वाट्याचे खाल्ले आहे; पण आपल्याला त्याची जाणीवच नसते. दुसऱ्यांविषयी मत बनवताना किंवा वाईट बोलताना आपण सर्व गोष्टींचा आढावा घेतलाय
*सौजन्य :-* https://majhimarathi.wordpress.com
========***********=======
🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏 पुन्हा भेटू उद्या
फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार
========***********=========
Comments
Post a Comment