फ्रेश मॉर्निंग बुलेटिन दिनांक 15 डिसेंबर 2016

*🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर प्रस्तुत 📢*
📱 9423625769

1⃣  🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 1⃣ 
🕖 प्रसारण वेळ : रोज सकाळी 06:50 ते 07:00 am
----------------------------------------------------
http://fmbuleteen.blogspot.com
----------------------------------------------------
📅 दि. 15/12/2016 वार - गुरुवार 
========***********=========
   *📆 .  . *दिनविशेष . . 📆*
➖➖➖➖➖➖➖➖➖
💥१९५० :- भारताचे पोलादी पुरुषसरदार वल्लभभाई पटेल स्मृतीदिन
💥१९१३ :-  नामयोगी गोंदेवलेकर स्वामी महाराज समाधी दिन
💥 १७४९ :- छत्रपती शाहू महाराज यांचे निधन

*संकलक :- सौ. सुभद्रा सानप, बीड*
                 9403595764
========***********=========
*आजच्या ठळक बातम्या*
1⃣ 2017 मध्ये जीएसटीची अंमलबजावणी होण्याची शक्यता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे प्रतिपादन
2⃣ प्राप्तीकर विभागाची बँक ऑफ महाराष्ट्रच्या पुण्यातील शाखेवर धाड, लॉकरमधून 10 कोटी रुपये जप्त.
3⃣  पुणे आणि लातूर जिल्ह्यातील 14 नगरपरिषदांसाठी आज सरासरी 76 टक्के मतदान झाल्याची प्राथमिक माहिती, थेट नगराध्यक्षपदाच्या 14 आणि सदस्यपदाच्या 324 जांगासाठी झाले मतदान
4⃣ नाशिकममध्ये हेल्मेट न वापरणाऱ्या 1 हजार 679 दुचाकी चालकांवर आठ दिवसात कारवाई, एकूण 8 लाख 40 हजार रुपयांचा दंड वसूल.
5⃣ दिव्यांग हक्क कायदा (2014) राज्यसभेत पारित.
6⃣  भारताच्या पी.व्ही सिंधूने दुबई वर्ल्ड सुपर सिरीजमध्ये मिळवला पहिला विजय, जपानच्या अकाने यमागुचीचा (12-21, 21-8, 21-15) केला पराभव.
7⃣ संगीतकार ए.अार. रहमान पुन्हा एकदा ऑस्करच्या शर्यतीत
*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*
📱 9960358300
========***********=========
*🌷 फ्रेश सुविचार 🌷*
खरे सुख भोगात नसून त्यागात असते.

*संकलक :- बालाजी चौधरी, लातूर*
                  7588876539
========***********=========
*आजचा मराठी शब्द*
             *त्याग*

*संकलक :- जगन्नाथ दिंडे, मुखेड*
                  8668453639
========***********=========
*🎂 आजचा वाढदिवस* 
👤बालाजी सुंकेवार, कलाशिक्षक, देगलुर
👤सुशील केकान, नांदेड
👤अनिल जाधव शिरपुरकर
👤रामकृष्ण लोखंडे
👤श्रीधर काटेगर
*संकलक :- नासा येवतीकर, धर्माबाद*
                  9423625769
[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा वरील क्रमांकावर पाठवू शकता. ]
========***********=========
*आजची @@ गुगली @@*

    "सज्जन "

चूकीचा माणूस हल्ली
सज्जन वाटतं आहे
चूकीचं बोलणं पण
त्यांनाच पटत आहे

चूक वागणारा सज्जन
कसा असू शकतो
वाईट माणूस कधीच
सज्जन नसू शकतो

    शरद ठाकर
सेलू जि परभणी
8275336675
========***********=========
*आजचा*
🎯 वि चा र वे ध.....✍🏻
*************************
इतरांच्या जेव्हा भावना आपल्याला समजायला लागतात तेव्हा आपलं आणि त्यांचं नातं घट्ट व्हायला लागतं. जेव्हा नातं घट्ट व्हायला लागतं तेव्हा आपुलकी,प्रेम,जिव्हाळा
यांचेही जाळे अधिक विणले जाते तेव्हा ख-या माणुसकीचे दर्शन व्हायला लागते. आपल्यालाही एक नवीन अतुट नाते जोडल्याचे समाधान वाटते. माणसाने
माणसाशी माणसाप्रमाणे
इतरांसोबत वागल्याचा प्रत्यय अनुभवास यायला लागतो.अशा नात्यातून मानवतेचे अतुट नाते जोडल्याचे आपल्या मनाला समाधान वाटते.

- व्यंकटेश काटकर,नांदेड.
  संवाद.9421839590.

🍃🌹🍃🌹🍃🌹🍃🌹
========***********=========
*आजची लिंक*
इंग्रजी - मराठी शब्दकोडे

http://puzzlesofnasa.blogspot.com/2015/11/blog-post_71.html

========***********=======
*आजची बोधकथा*
              
🌺 *अपेक्षा मदतीची*🌺

*एक माणूस खाण्याचे पदार्थ एका गाढवावर लादून नेत होता. त्याच्याबरोबर त्याचा कुत्राही होता. काही वेळाने तो थकून जाऊन एका झाडाखाली झोपला व गाढव इकडेतिकडे चरत राहिले. कुत्र्याला खूप भूक लागली म्हणून तो गाढवाला म्हणाला, 'तुझ्या पाठीवरच्या खाण्याच्या पदार्थांपैकी मला थोडे देशील तर माझी भूक भागेल.' तेव्हा गाढव म्हणाले, 'थोडा वेळ थांब. आपला धनी जागा झाला म्हणजे तुला खायला देईलच.' ते ऐकून कुत्रा गप्प बसला.*

*थोड्या वेळाने एक भला मोठा लांडगा तेथे आला व त्याने गाढवावर झेप घेतली तेव्हा गाढवाने कुत्र्याला आपल्याला वाचविण्याची याचना केली. तेव्हा कुत्रा उपहासाने हसून म्हणाला, 'जरा वेळ थांब. आपला मालक जागा झाला म्हणजे तुझं रक्षण करेलच.' एवढे तो म्हणेपर्यंत लांडग्याने गाढवाचे नरडे फोडून त्याला ठार केले.*

*तात्पर्यः दुसर्‍यांनी आपल्याला मदत करावी असे जर वाटत असेल तर आपणही दुसर्‍याला मदत केली पाहिजे.*
*-----------------------------------*
*📝 संकलन*
*✒श्रीमती प्रमिलाताई सेनकुडे (शिंदे)*
जि.प.प्रा.शा.वाटेगाव
ता.हदगाव, जि. नांदेड
http://www.pramilasenkude.blogspot.in
========***********=======
🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏 पुन्हा भेटू उद्या
फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार 
========***********=========

Comments