*🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर प्रस्तुत 📢*
📱 9423625769
1⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 1⃣
🕖 प्रसारण वेळ : रोज सकाळी 06:50 ते 07:00 am
----------------------------------------------------
http://fmbuleteen.blogspot.com
----------------------------------------------------
📅 दि. 16/12/2016 वार - शुक्रवार
========***********=========
*📆 . . दिनविशेष . . 📆*
➖➖➖➖➖➖➖➖➖
💥१९७१. भारत पाक युध्दात पूर्व पाकिस्तानातील पाकिस्तानी सैन्यानी शरणागती पत्करली व बांगला देश मुक्त झाला.
💥१८५४ भारतातील पहिल्या इंजिनिअरिंग कॉलेजची पूणे स्थापना
💥 १९९० आनंद यादव यांच्या झोंबी या आत्मचरित्रात्मक कादंबरीला साहित्य अकादमी पुरस्कार
*संकलक :- सौ. सुभद्रा सानप, बीड*
9403595764
========***********=========
*आजच्या ठळक बातम्या*
1⃣ भाजपच्या युवा मोर्चाच्या अध्यक्षपदी पुनम महाजन यांची निवड करण्यात आली आहे.
2⃣ अमरावतीचे तत्कालीन आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांचा स्वेच्छानिवृत्तीचा निर्णय, विधानसभेनं शिक्षा दिल्यानं नाराज, आमदार सुनील देशमुख यांनी केली होती अवमानाची तक्रार.
3⃣ गुजरातमध्ये हुक्का पार्लर बंद करण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपानी यांनी दिली आहे.
4⃣ शेतक-यांना कर्ज देण्यासाठी सरकारचे पुरेपूर प्रयत्न सुरु आहेत, सहकारी बँकाँना करण्यात येणा-या चलन पुरवठ्यात वाढ करण्यात आली आहे अर्थसचिव शक्तीकांत दास यांचे प्रतिपादन
5⃣ उदगीर नगरपरिषदेत सत्तांतर. काँग्रेसच्या ३५ वर्षाच्या सत्तेला खालसा करीत भाजपाची सत्ता, १८ जागांसह नगराध्यक्ष पदाचे उमेदवार बसवराज बागबंदे सव्वा तीन हजार मतांनी विजयी.
6⃣ ज्युनियर हॉकी विश्वचषकमध्ये उपांत्य फेरीत भारताची गाठ ऑस्ट्रेलियाशी पडणार.
7⃣ चेन्नईत भारतविरोधात होणा-या पाचव्या कसोटी सामन्यात इंग्लंडचा गोलंदाज जेम्स अँडरसन खेळणार नाही.
*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*
📱 9960358300
========***********=========
*🌷 फ्रेश सुविचार 🌷*
तुम्ही आयुष्यात किती माणसे जोडली यावरुन तुमची श्रीमंती कळते.
*संकलक :- बालाजी चौधरी, लातूर*
7588876539
========***********=========
*आजचा मराठी शब्द*
*श्रीमंती*
*संकलक :- जगन्नाथ दिंडे, मुखेड*
8668453639
========***********=========
*🎂 आजचा वाढदिवस*
👤 उमेश कोटलवार, प्रा. शिक्षक, रत्नागिरी
👤 श्याम पेरेवार
👤 शिवकुमार उपलंचवार
*संकलक :- नासा येवतीकर, धर्माबाद*
9423625769
[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा वरील क्रमांकावर पाठवू शकता. ]
========***********=========
*आजची @@ गुगली @@*
" झुट "
माणसा माणसांत
सारी फुटाफुट आहे
वरवर दिसणारा
माणूस झुट आहे
वरवर पहाता माणूस
अगदी सरळ दिसतो
जवळून पाहिल्यास
खुप करळ असतो
शरद ठाकर
सेलू जि परभणी
8275336675
========***********=========
*आजचा*
========***********=========
*आजची लिंक*
http://marathi.pratilipi.com/na-sa-yevtikar
विविध लेख वाचता येतील
========***********=======
*आजची बोधकथा*
मनाची शुद्धता
दोन तरुण साधु उंच डोंगरावर असणाऱ्या आपल्या मठाकडे निघाले होते. रस्त्यामध्ये एक ओढा होता. तो ओढा खूप पाण्याने भरलेला असून खोलही होता. त्या ओढ्याच्या काठी एक तरुण युवती बसलेली होती. त्या तरुणीलाही तो ओढा पार करून पलीकडील बाजूस असणाऱ्या गावात जायचे होते. पण ओढ्याला असणाऱ्या पाण्यामुळे ती तो ओढा पार करू शकत नव्हती. पावसाळ्याचे दिवस होते, पाउस पडत होता, ओढा जोराने खळखळत वाहत होता. तरुणीला तर ओढा पार करून पलीकडे जाणे गरजेचे होते. पाण्याला ओढ जास्त असल्याने ती एकट्याने पाण्यात उतरण्याचे धाडस करत नव्हती. दोन साधुंपैकी एका साधूने हे दृश्य पाहिले व त्याने त्या तरुणीला विश्वासपूर्वक दोन गोष्टी सांगितल्या व त्या तरुणीला आपल्या खांद्यावर बसवले आणि त्या तिघांनी मिळून तो ओढा पार केला. तरुणीने तो ओढा पार होताच साधूचे आभार मानले व ती आपल्या गावात निघून गेली. दोन्ही साधू आपल्या आश्रमाकडे निघाले. ज्या साधूने तरुणीला खांद्यावर घेतले होते त्याच्याशी दुसरा साधू बराच वेळ काहीच बोलला नाही. खूप वेळ घुश्यात चालल्यावर त्या साधूने दुसऱ्या साधूच्या मनातील चलबिचल ओळखली व तो त्याला म्हणाला,"मित्र! बरेच वेळ मी पाहतो आहे पण तुला काही तरी खुपते आहे.तेंव्हा विना संकोच तू मनातील गोष्ट मला सांग." तो दुसरा साधू म्हणाला,"हे मित्रा, आपल्या संप्रदायामध्ये स्त्री स्पर्श सुद्धा वर्ज्य आहे. तरी तू त्या स्त्रीला खांद्यावर बसवून ओढा पार केलास हे काही मला आवडले नाही. स्त्रीकडे बघणे, स्पर्श करणे हे महत्पाप तू केले आहेस. तेंव्हा तू माझ्या मनातून उतरला आहेस." त्यावर तो मदत करणारा साधू म्हणाला,"असं आहे तुझ्या नाराजीचे कारण! पण मित्रा, ती स्त्री जेंव्हा माझ्या खांद्यावरून उतरली तेंव्हाच मी तिला सोडले, मात्र तू अजूनही तिला मनात बाळगून आहेस. मी तिला मदत करण्याच्या दृष्टीने स्पर्श केला पण तू अजूनही मनातून तिला वारंवार स्पर्श करत आहेस. संन्यास याचा अर्थ कुणाचीही सेवा न करता अलिप्त राहणे असा न होता मनातील वासना आणि विकारांवर ताबा मिळवणे असा होतो. ज्यावेळी त्या स्त्रीला मी उचलून खांद्यावर घेतले तेंव्हाही माझ्या मनात फक्त सेवेची भावना होती मग ती स्त्री आहे का पुरुष याचा मी विचार केला नाही. मनातून सुद्धा विकार जर संपविता आले तरच साधुपण आले असे समजता येईल आणि मग त्यासाठी संन्यास घेण्याचीही आवश्यकता नाही. गृहस्थ राहूनही जर विकारांवर नियंत्रण करता आले तर त्या व्यक्तीला साधुपण मिळेल."
तात्पर्य- मनातून चांगले आचरण असल्यास बाहेरील आचरण हे चांगलेच होते. मनात पाप ठेवून चांगले बनता येत नाही.
*सौजन्य : ramdas11.blogspot.in
========***********=======
🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏 पुन्हा भेटू उद्या
फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार
========***********=========
Comments
Post a Comment