फ्रेश मॉर्निंग बुलेटिन दिनांक 17 डिसेंबर 2016

*🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर प्रस्तुत 📢*
📱 9423625769

1⃣  🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 1⃣ 
🕖 प्रसारण वेळ : रोज सकाळी 06:50 ते 07:00 am
----------------------------------------------------
http://fmbuleteen.blogspot.com
----------------------------------------------------
📅 दि. 17/12/2016 वार - शनिवार 
========***********=========
        *📆 . . *दिनविशेष . . 📆*

          *भारतीय पेंशनर्स दिवस*
💥 १७७८ :- सुरक्षा दीप शोधक सर हंप्रे डेव्ही यांचा जन्म
💥 १९०१:- भारतात विमान उड्डान सुरु
💥 १९२९ :- भगतसिंह व राजगुरु यांनी ब्रिटीश पोलीस अधिकारी सॅडसे्" याचा वध केला

*संकलक :- सौ. सुभद्रा सानप, बीड*
                 9403595764
========***********=========
*आजच्या ठळक बातम्या*
1⃣ पेट्रोल आणि डिझेल महागलं, पेट्रोलच्या किंमतीत 2 रुपये 21 पैसे तर डिझेलच्या किंमतीत 1 रुपये 79 पैशांची वाढ, काल मध्यरात्रीपासून नवे दर लागू
2⃣ पंतप्रधान गरीब कल्याण योजना उद्यापासून सुरू होऊन 31 मार्च 2017 पर्यंत चालेल महसूल विभाग सचिव हसमुख अधिया.
3⃣  चलनातून बाद करण्यात आलेल्या 500 आणि 1000 च्या नोटांचा रुग्णालय, रेल्वे तिकीट आणि सरकारी कार्यालयांमधील वापराची मर्यादा वाढवण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार.
4⃣ नोटाबंदीमुळे भ्रष्टाचार किंवा काळा पैसा लगेच संपणार नाही, पण भ्रष्टाचार संपवण्याच्या दिशेने उचलेले एक पाऊल आहे  पंतप्रधान नरेंद्र मोदी.
5⃣  रत्नागिरीमध्ये थिबा राजांचे भव्य स्मारक उभारणार, केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांची घोषणा. केंद्राकडून 10 ते 15 कोटी रुपये देण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन.
6⃣ ऑस्ट्रेलिायावर 2 - 1 ने मात करत भारतीय हॉकी संघ ज्युनिअर हॉकी विश्वचषकाच्या फायनलमध्ये
7⃣ भारत विरुद्ध इंग्लंड पाचवा कसोटी सामन्यात दिवस अखेर इंग्लंड चार बाद  253 धावा
*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*
📱 9960358300
========***********=========
*🌷 फ्रेश सुविचार 🌷*
प्रत्येक क्षण अपल्याला काही ना काही शिकवत असतो.

*संकलक :- बालाजी चौधरी, लातूर*
                  7588876539
========***********=========
*आजचा मराठी शब्द*
             *स्मारक*

*संकलक :- जगन्नाथ दिंडे, मुखेड*
                  8668453639
========***********=========
*🎂 आजचा वाढदिवस* 
👤 सुधीर येलमे, संपादक, सा. इंद्रधनुष
👤 दिगंबर बेतीवार, नांदेड
👤 नारायण मुळे, धर्माबाद

*संकलक :- नासा येवतीकर, धर्माबाद*
                  9423625769
[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा वरील क्रमांकावर पाठवू शकता. ]
========***********=========
*आजची @@ गुगली @@*

       "सत्य "

सत्य बोल कोणाला
कधीच रूचत नाहीत
कटू असतात म्हणून
ते बोल पचत नाहीत

कटू असले तरी
सत्य हे सत्य असते
लक्षात ठेवा विजयी
नित्य हे नित्य असते

   शरद ठाकर
सेलू जि परभणी
8275336675
========***********=========
*आजचा*
🎯  विचारवेध.........✍🏻
*******************
एखाद्याच्या डोळ्यात प्रेमाने भरलेली माणसे आयुष्यभर हृदयात घर करुन राहतात ती शेवटच्या क्षणापर्यंत. कारण त्यांनी जीवापाड एकमेकांवर प्रेम केलेले असते  म्हणून. त्यांच्या सहवासात राहून त्यांनी खूप काही एकमेकांपासून शिकून घेतलेले असते. सुखदुःखाच्या वेळी एकमेकाला साथ दिलेली असते. संकटाच्या वेळी मदत केलेली असते. त्यांच्या कृतज्ञतेला कधीच विसरु शकत नाहीत. अशीच माणसे डोळ्यांत आयुष्यभर भरुन राहतात. असंच माणसानं जीवन जगायला पाहिजे. हाच तर माणुसकीचा खरा धर्म आहे.

🌹व्यंकटेश काटकर,
     नांदेड.9421839590

🍂🍃🍂🍃🍂🍃🍂🍃
========***********=========
*आजची लिंक*

*" P " अक्षरकोडे*

http://puzzlesofnasa.blogspot.com/2015/11/blog-post_95.html

शब्दकोडे खजिनासाठी वरील लिंक पहा
========***********=======
*आजची बोधकथा*
             
*🌺कष्टाचे मोल अनमोल 🌺*
*ग्रीसमध्ये हेलाक नावाचा एक धनवान आणि लोभी माणूस राहत होता. आपल्या दुकानावर येणाऱ्या प्रत्येक मा णसाला ठकवणे त्याचे नित्या चे काम झाले होते. त्यातून तो भरपूर धन जमा करायचा. मात्र ते धन त्याच्याकडे टिकत नसे. कधी आजारात खर्च होत असे तर दुकानदारीत कधी खोट येत असे. हे पाहून त्याची सून त्याला समजवायची कि बेइमानीचे पैसे कधीच टिकत नसतात. परंतु हेलाक तिचे कधीच ऐकत नसे.*
*एके दिवशी त्याच्या मनात विचार आला कि सून जे म्हणते आहे त्याची परिक्षा घेवून बघू. त्याने इमानदारीने धन जमा करून त्याचे एक सोन्याचे गंठण बनवले व ते एका कपड्यात बांधले व त्यावर स्वत:चे नाव टाकून चौकात ठेवून आला. बरेच लोक येत जाता त्या कपड्याकडे बघत पण कोणीही उचलून नेले नाही. सर्वांच्या पायात लागत होते म्हणून एका माणसाने ते तसेच उचलले आणि तळ्यात फेकून दिले. तळ्यातील एका मगरीने ते गिळले. काही दिवसांनी एका मच्छिमाराला जाळ्यात ती मगर सापडली. त्यांनी तिचे पोट फाडले तेंव्हा तिच्या पोटात कापडात बांधलेले सोन्याचे गंठण निघाले, मच्छीमारांनी हेलाकचे नाव त्यावर पाहिले व बक्षिसाच्या आशेने गंठण त्याला आणून दिले. अनेक महिन्यांनी आपले सोन्याचे गंठण मिळालेले पाहून तो खुश झाला. आता त्याचा सूनबाईच्या बोलण्यावर विश्वास बसला कि इमानदारीने मिळवलेले धन कुठेच जात नाही आणि बेइमानिचा पैसा कधीच टिकत नाही. त्याने खुश होवून त्या मच्छिमारांना चांगले बक्षीस दिले व सुनेला शाबासकी दिली.*

*तात्पर्य- कष्टाने कमावलेल्या धनाने मानसिक शांतता, सुख मिळते तर बेइमानीने मिळवलेल्या धनाने अनेक वाईट गोष्टी घडून येतात.*
*कारण जे राहते ते कष्टाच आणि जे जाते भ्रष्टाच.*
*----------------------------*
*📝 शब्दांकन/संकलन*
*✒श्रीमती प्रमिलाताई सेनकुडे (शिंदे)*
जि.प.प्रा.शा.वाटेगाव
ता.हदगाव, जि. नांदेड
http://www.pramilasenkude.blogspot.in
========***********=======
🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏 पुन्हा भेटू उद्या
फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार 
========***********=========

Comments