*🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर प्रस्तुत 📢*
📱 9423625769
1⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 1⃣
🕖 प्रसारण वेळ : रोज सकाळी 06:50 ते 07:00 am
----------------------------------------------------
http://fmbuleteen.blogspot.com
----------------------------------------------------
📅 दि. 18/12/2016 वार - रविवार
========***********=========
*📆 . . *दिनविशेष . . 📆*
➖➖➖➖➖➖➖➖➖
*अस्पृश्यता निवारण दिन*
💥 १९७१ :- श्रीमती इंदिरा गांधी यांना भारत रत्न पुरस्कार
*संकलक :- सौ. सुभद्रा सानप, बीड*
9403595764
========***********=========
*आजच्या ठळक बातम्या*
1⃣ बिपीन रावत नवे लष्करप्रमुख तर बी एस धनोआ वायुदलाच्या प्रमुखपदी.
2⃣ तब्बल 2 कोटींच्या नोटाबदली प्रकरणी आरबीआयचे कर्मचारी अटकेत.
3⃣ मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदावरुन शरद पवार पायउतार
4⃣ लष्कराच्या ताफ्यावर दहशतवादी हल्ला, 3 जवान शहीद.
5⃣ फक्त नोंदणीकृत राजकीय पक्षांना आयकरातून सूट देण्यात आल्याचं अर्थमंत्रालयानं केलं स्पष्ट
6⃣भारत विरुद्ध इंग्लंड पाचवा कसोटी सामन्यात दुस-या दिवसाचा खेळ संपला तेंव्हा इंग्लंड सर्व बाद 477 धावा तर भारताच्या नाबाद 60 धावा, के एल राहुल आणि पार्थिव पटेलची संयमी सुरुवात.आणि
7⃣ जागतिक बॅडमिंटनच्या सेमीफायनलमध्ये पी व्ही सिंधूचा पराभव.
*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*
📱 9960358300
========***********=========
*🌷 फ्रेश सुविचार 🌷*
माणसाने नेहमी कर्तव्यपरायण असावे
*संकलक :- बालाजी चौधरी, लातूर*
7588876539
========***********=========
*आजचा मराठी शब्द*
*कर्तव्य*
*संकलक :- जगन्नाथ दिंडे, मुखेड*
8668453639
========***********=========
*🎂 आजचा वाढदिवस*
👤 *रवि यम्मेवार, धर्माबाद*
👤 नितीन वंजे, देगलुर
👤 उदयराज कोकरे, नांदेड
*संकलक :- नासा येवतीकर, धर्माबाद*
9423625769
[ या बुलेटिनमध्ये वाढदिवस उपक्रम सुरु होऊन आज एक वर्ष पूर्ण. ]
========***********=========
*आजची @@ गुगली @@*
"गौडबंगाल "
कोटी कोटी रूपयांचे
त्यांच्या गौडबंगाल आहे
पैसा असुन सामान्य
मात्र कंगाल आहे
मिळतात त्यांना रोज ,
नव्या नोटा मिळतात
सामान्याचे मात्र येथे
रोजच बळी जातात
शरद ठाकर
सेलू जि परभणी
8275336675
========***********=========
*आजचा*
🎯 विचारवेध..........✍🏻
_______________________
खरे बोलण्यात जेवढा आनंद, विश्वास आणि स्वाभिमान प्राप्त होतो. तेवढा खोटे बोलण्यातून मिळत नाही. खरे बोलण्यामुळे इतर लोकांमध्ये आपली चांगली प्रतिष्ठा, आपल्या विषयीचे चांगले मत तयार होते आणि आपण त्याच्या विश्वासास पात्र ठरतो. हाच विश्वास आपल्या यशस्वी जीवनाचा मूलमंत्र आहे.
- व्यंकटेश काटकर,नांदेड
संवाद.9421839590.
📝✍🏻📝✍🏻📝✍🏻📝✍🏻
========***********=========
*आजची लिंक*
www.nasayeotikar.blogspot.com
========***********=======
*आजची बोधकथा*
*अहंकारी राजा*
एक अहंकारी राजा होता. त्याला आपल्या ऐश्वर्याचा आणि राज्याचा गर्व होता. तसेच आपली शक्ती आणि रूपावरही तो अहंगंड बाळगून असायचा. आपल्या बुद्धीचा टेंभा मिरवायचा. युद्धात जय मिळाला की त्याला गर्व चढायचा. आपल्यासमोर तो इतरांना तुच्छ लेखत असे. कोणाचा मुलाहिजा न बाळगता त्याचा तो अपमान करत असे. दुस-याला कमी लेखण्याचा त्याचा प्रयत्न असायचा. या कारणांमुळे लोक त्याच्यावर नाराज असायचे. त्याच राज्यात एका विद्वान पंडीताने त्याला वठणीवर आणण्याचे ठरविले. एके दिवशी तो पंडीत राजाच्या दरबारात गेला आणि राजाला प्रणाम केला. राजाने उद्दामपणे प्रतिनमस्कारही केला नाही उलट त्याने पंडीताला गर्वाने विचारले,’’बोला पंडीत महाराज, तुम्हाला काय मदत पाहिजे. काय मागायचे असेल ते मागून घ्या, दान पाहिजे असेल तर दान घ्या किंवा धन पाहिजे, सोनेनाणे, जमीन, धान्य जे काही मागायचे ते तुम्ही माझ्याकडून मागून घ्या’’ पंडीतजीने राजाकडे एकवार पाहिले व तो मोठमोठ्याने हसू लागला. राजाला व दरबारातील लोकांना पंडीताच्या हसण्याचे कारण काही कळेना, हसण्याचा भर ओसरल्यावर पंडीत म्हणाला,’’राजन, तुम्ही मला काय दान देणार कारण तुमच्याकडे मला देण्यासारखे काहीच नाही.’’ पंडीताचे हे बोलणे ऐकताच राजा संतापून लालबुंद झाला, राजाचे सैनिक पंडीताला मारायला धावून आले पण सेनापतीने सैनिकांना आवरले व पंडीताला पुढे काही बोलण्याची इच्छा आहे काय असे विचारले. त्यावर पंडीतजी म्हणाले,’’ महाराज, जरा थंड डोक्याने विचार करा, तुमचा जन्मच मुळी तुमच्या इच्छेने झाला नाही, मग रूप, सौंदर्य आणि पराक्रम हे गुण तुम्हाला कोठून मिळाले असते. आईवडीलांनी तुम्हाला जन्म दिला म्हणून तुम्ही जन्माला आलात. तुमचे धान्यभांडार हे धरतीमातेचे देणे आहे. तिने पिकवून तिच्या लेकरांसाठी अन्न पुरविले म्हणून तुम्ही ते सांभाळत आहात आणि खजिन्याचे म्हणाल तर धन हे करातून आलेले म्हणजेच प्रजेचे देणे आहे, राज्य हे तुम्हाला वाडवडीलांकडून मिळालेले वरदान आहे राहता राहिले शरीरातील प्राण पण तेही तुमचे नाहीत ते सुद्धा ईश्वराची कृपा आहे हे सगळेच जर तुम्हाला दुस-याने दिलेले असेल तर तुम्ही मला काय म्हणून देणार आणि दिलेल्या गोष्टीचा काय म्हणून गर्व बाळगणार.’’ एवढे बोलून पंडीताने राजदरबार सोडला व राजाने त्यादिवसापासून गर्व पण सोडून दिला,
तात्पर्यः- जे आपले नाही त्यावर गर्व बाळगणे व्यर्थपणाचे आहे.
वर्तमानपत्रातून संग्रहित
*सौजन्य :-* kthabodh.blogspot.in
========***********=======
🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏 पुन्हा भेटू उद्या
फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार
========***********=========
Comments
Post a Comment