फ्रेश मॉर्निंग बुलेटिन दिनांक 19 डिसेंबर 2016

*🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर प्रस्तुत 📢*
📱 9423625769

1⃣  🎤  *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 1⃣ 
🕖 प्रसारण वेळ : रोज सकाळी 06:50 ते 07:00 am
----------------------------------------------------
http://fmbuleteen.blogspot.com
----------------------------------------------------
📅 दि. 19/12/2016 वार - सोमवार 
========***********=========
        *📆 . . *दिनविशेष . . 📆*
⌛१८४८ : लॉर्ड डलहौसी गव्हर्नर जनरल म्हणून भारतात आला.
⌛२००१ : व्यंगचित्रकार आर.के. लक्ष्मण यांच्या ‘कॉमन मॅन’च्या पुतळ्याचे पुणे येथे अनावरण.
💥जन्म
⌛१८५२ : प्रकाशाचा वेग शोधणारे ‘आल्बर्ट अब्राहम मिकेलसन’.
⌛१९७४ : रिकी पॉंटिंग, ऑस्ट्रेलियाचा क्रिकेट खेळाडू.
⌛१९६९ : नयन मोंगिया भारतीय क्रिकेटपटू.
💥मृत्यू
⌛१९१५ : भारत सेवक समाज संस्थेचे संस्थापक नामदार गोपाळ कृष्ण गोखले.
⌛१९१६ : ब्रम्हदेशाचा शेवटचा राजा ‘थिबा’.
⌛२०१० : गिरीधारीलाल केडिया, भारतीय उद्योगपती.
*संकलक :- सौ. सुभद्रा सानप, बीड*
                 9403595764
========***********=========
*आजच्या ठळक बातम्या*
1⃣ राज्यातील चार जिल्ह्यांमधील १९ नगर परिषदा आणि २ नगरपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी प्राथमिक अंदाजानुसार सरासरी ७२.७६ टक्के मतदान निवडणूक निर्णय अधिकारी सहारिया यांची माहिती
2⃣  येत्या सहा वर्षात 40 हजार मेगावॉट रुफ टॉप सौर ऊर्जा तयार करण्याचे लक्ष्य सरकारने डोळ्य़ासमोर ठेवले असल्याचे केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांनी व्यक्त केले
3⃣ दिल्ली, तेलंगणा, हरियाणा, पंजाब व चंदीगड राज्यांनंतर आता हिमाचल प्रदेशही १०० टक्के आधार कार्ड वितरीत करणारे बनले राज्य
4⃣ 100 रेल्वे स्थानकांवर वायफाय सुविधा देणार. कल्याणमध्ये लवकरच नवीन टर्मिनस सुरू करणार, रेल्वेचा विकास झाला तर देशाचाही विकास रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांचे प्रतिपादन
5⃣ पाकिस्तानामधील भारतीय सिनेमांवरील बंदी उठण्याची शक्यता, १९ डिसेंबरपासून हिंदी चित्रपट प्रदर्शित होणार - पाक मिडीयाची माहिती
6⃣लखनऊत झालेल्या ज्युनियर हॉकी विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम लढतीत भारताच्या युवा खेळाडूंनी बलाढ्य बेल्जियमचा 2-0 असा धुव्वा उडवत 15 वर्षांनंतर ज्युनियर हॉकी विश्वचषकाला घातली गवसणी. ज्युनियर हॉकीतील भारताचे हे दुसरे विजेतेपद
7⃣ इंग्लंडच्या 477 धावांना प्रत्युत्तर देताना तिसऱ्या दिवसअखेर भारताने 4 बाद 391 धावांपर्यंत मारली मजल, अवघ्या एका धावेने लोकेश राहुलचे हुकले द्विशतक हुकले
*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*
📱 9960358300
========***********=========
*🌷 फ्रेश सुविचार 🌷*
*जीवनामध्ये तुमच्या चांगल्या कामाबद्दल जर कुणी तुमची प्रशंसा* *केली नाही तर दुःखी होऊ नका ....*
   *कारण तुम्ही अशा जगा मध्ये राहता,*
       *जिथे "तेल आणि वात "जळते...*
*पण लोक म्हणतात " दिवा " जळत आहे..*
     
*संकलक :- बालाजी चौधरी, लातूर*
                  7588876539
========***********=========
*आजचा मराठी शब्द*
             *प्रशंसा*

*संकलक :- जगन्नाथ दिंडे, मुखेड*
                  8668453639
========***********=========
*🎂 आजचा वाढदिवस* 
👤 सुभाष चिखले पाटील
👤 संजय हरने

*संकलक :- नासा येवतीकर, धर्माबाद*
                  9423625769
[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा वरील क्रमांकावर पाठवू शकता. ]
========***********=========
*आजची @@ गुगली @@*

  " अहंकार "

माणसाच्या मनात
अहंकार असतो
अहंकार वाईटाचे
महाद्वार असतो

अहंका-याची शेवटी
पार धुळधान होते
इतिहास अभ्यासुन
कोणाला जान येते

   शरद ठाकर
सेलू जि परभणी
8275336675
========***********=========
*आजची लिंक*
प्रतिलिपी डॉट कॉम वर
*कल्पतरु सम तो* या स्पर्धेतील नागोराव सा. येवतीकर यांनी त्यांच्या प्रिय दादास म्हणजे डॉ. सुरेश येवतीकर यांचेवर लिहिलेला लेख

*प्रिय दादास .......*

http://marathi.pratilipi.com/read?id=6071141757091840&ret=/na-sa-yevtikar/priy-dadas

लेख वाचून आपले रिप्लाई देण्यासाठी email id आणि पासवर्ड टाकून प्रवेश करा आणि लेखास आपल्या आवडी नुसार स्टार पण द्या,
========***********=======
*आजची बोधकथा*
📝📚📝📚📝📚📝📚📝📚

*🌺 पारधी व साळुंकी*🌺
==================
एका पारध्याने पक्षी पकडण्यासाठी एके ठिकाणी जाळे मांडून ठेवले. त्यात एक साळुंकी सापडली. ती मोठमोठ्याने ओरडू लागली,  'अरे देवा! मी असा काय अपराध केला आहे ? मला अशा संकटात का घातलास? मी काही कोणाचे पैसे, सोन चोरलं नाही? मी फक्त गव्हाचा दाणा घेतला, तेवढयासाठी एवढी मोठी शिक्षा !

तात्पर्यः "चोरलेली वस्तू कितीही लहान व शुल्लक असली तरी त्यामुळे चोरीचा गुन्हयाचे स्वरूप लहान होते असे नाही."
〰〰〰〰〰〰〰
📝शब्दांकन/ संकलन📝
✒श्रीमती प्रमिलाताई सेनकुडे (शिंदे)
जि.प.प्रा.शा.वाटेगाव
ता.हदगाव, जि. नांदेड
http://www.pramilasenkude.blogspot.in
========***********=======
🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏 पुन्हा भेटू उद्या
फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार 
========***********=========

Comments