फ्रेश मॉर्निंग बुलेटिन दिनांक 20 डिसेंबर 2016

*🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर प्रस्तुत 📢*
📱 9423625769

1⃣  🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 1⃣ 
🕖 प्रसारण वेळ : रोज सकाळी 06:50 ते 07:00 am
----------------------------------------------------
http://fmbuleteen.blogspot.com
----------------------------------------------------
📅 दि. 20/12/2016 वार - मंगळवार 
========***********=========
   *📆 . . दिनविशेष . . 📆*
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
🎀 १९५६ :- संत गाडगेबाबा स्मृतिदिन
🎀 १९३३ :- शास्रसुधारक विष्णू.    
             वामन बापट स्मृतिदिन
🎀 १९०६ :- निबंध लेखक सदाशिव केळकर यांचे निधन
*संकलक :- सौ. सुभद्रा सानप, बीड*
                 9403595764
========***********=========
*आजच्या ठळक बातम्या*
1⃣ व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपवरील सदस्याने पोस्ट केलेल्या कोणत्याही बदनामीकारक, अश्लील अथवा आक्षेपार्ह मजकुरासाठी आता अ‍ॅडमिनला जबाबदार धरण्यात येणार नाही, असा निर्णय दिल्ली उच्च न्यायालयानं दिलाप
2⃣ नांदेड जिल्ह्यातील नगरपालिका निवडणुकाचा निकाल जाहीर, उमरी नगरपालिकेत सर्वच्या सर्व 17 जागांवर राष्ट्रवादीचा विजय, राष्ट्रवादीच्या अनुराधा खांडरे नगराध्यक्ष
3⃣ सकाळी 7 ते 11 या वेळेत मुंबईत अवजड वाहनांना प्रवेश बंदी. मुंबईतील वाहतूक कोंडी रोखण्यासाठी मुंबई वाहतूक पोलीस आयुक्तांचा निर्णय.
4⃣ 30 डिसेंबरपर्यंत जुन्या नोटा भरण्याबाबात नवा नियम, 5 हजारांहून जास्त नोटा भरण्यावर निर्बंध.
5⃣ मुंबईतील पश्चिम रेल्वेवरील राम मंदिर स्टेशनचे 22 डिसेंबरला उद्घाटन, रेल्वेमंत्री सुरेश प्रभूंच्या हस्ते उद्घाटन होणार.
6⃣  कर्मचारी भविष्य निधी संघटनेने (EPFO) 2016-17 वर्षासाठी भविष्य निधी ठेवींवर कपात करून  8.65 टक्के व्याज जाहीर
7⃣ करुण नायर त्रिशतक फटकावणारा भारताचा सर्वात युवा फलंदाज. नायर 303 धावांवर नाबाद. भारताचा पहिला डाव 6 बाद 759 धावांवर घोषित.
*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*
📱 9960358300
========***********=========
*🌷 फ्रेश सुविचार 🌷*
जो दररोज आपल्या आत्मरुपाचे ध्यान करतो ,चिंतन करतो तो नेहमी भगवंताजवळच असतो

*संकलक :- बालाजी चौधरी, लातूर*
                  7588876539
========***********=========
*आजचा मराठी शब्द*
             *आत्मरूप*

*संकलक :- जगन्नाथ दिंडे, मुखेड*
                  8668453639
========***********=========
*🎂 आजचा वाढदिवस* 
👤शंकर विठठलराव हासगुळे
     स.शि.तोरणा.ता.बिलोली
👤 पल्लवी टेकाळे, कुपटी
      ता. माहूर जि. नांदेड
👤 गजानन मुडेले, देगलुर
👤 सोपान हेलंबे, उमरी

*संकलक :- नासा येवतीकर, धर्माबाद*
                  9423625769
[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा वरील क्रमांकावर पाठवू शकता. ]
========***********=========
*आजची @@ गुगली @@*

    "बाईकर्स"

बाईकर्सचा खेळ म्हणजे
जीवाशी खेळ आहे
सांगता येत नसते
कधी कशी वेळ आहे

अनमोल जीवनात या
सावधानतेने जगा
आयुष्य पुन्हा नाही
जग आनंदाने बघा

  शरद ठाकर
सेलू जि परभणी
8275336675
========***********=========
*आजचा*
☀🔅॥ विचार धन ॥🔅☀

आपल्या मुखावाटे आपल्या शरीरात जे अन्न जाते, त्यावर आपण खूप नियंत्रण ठेवतो. आपण आपला आहार सदोदित संतुलित ठेवायचा प्रयत्न करतो. वैद्दकिय सल्ल्यानुसार आवश्यक ते पथ्य पाळतो. जेवायच्या आधी आपण दररोज स्वच्छ हात धुतो. शुद्ध पाणी पितो. वेळोवेळी आपण उपवास करतो. आपल्या तोंडातून जे काही आत जाते ते पोटात जाते आणि शेवटी ते शरीराबाहेर टाकले जाते. हे आपल्याला माहित असूनसुद्धा ही सगळी काळजी आपण घेतोच.

पण आपल्या मुखावाटे बाहेर पडणा-या शब्दांची तशाच प्रकारची काळजी आपण घेत नाही. ज्या मुखातून आपण परमेश्वराचे गुणगान करतो, त्याच मुखातून आपण खुशाल अपशब्द उच्चारतो. ज्या झ-यातून केवळ निर्मळ पाणी झरले पाहिचे, तो झरा आपणच प्रदूषित करतो. आपल्या अमंगल वाणीने तो झरा आपणच विटाळून टाकतो.
         
        🏵 ॥ रामकृष्णहरी ॥ 🏵
    संजय नलावडे, मुंबई
========***********=========
*आजची लिंक*
अमरावतीच्या वृषाली वानखडे, यांनी नागोराव सा. येवतीकर अर्थात नासा यांचेवर *कल्पतरु सम तो* या ऑनलाइन स्पर्धेसाठी पाठविलेला लेख खास आपल्यासाठी

*नासा नावात जादू.......*

http://marathi.pratilipi.com/read?id=4993337028247552&ret=/vrushali-vankhade/nasa-navaat-jaadu

लेख वाचून आपले रिप्लाई देण्यासाठी email id आणि पासवर्ड टाकून प्रवेश करा आणि लेखास स्टार पण जरूर द्या

निळ्या लिंकवर क्लिक करा लगेचच पूर्ण लेख वाचण्यास मिळेल.
========***********=======
*आजची बोधकथा*
 🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
*🙏मानवतेचे महान पुजारी यांना विनम्र अभिवादन*🙏

  *🌺जीवन विचार*🌺
〰〰〰〰〰〰〰
जीवनात स्वच्छता , आचार -विचारात स्वच्छता ही आजच्या काळाची गरज आहे. म्हणून खराटा, केरसुणी, खापर आणि खोरं ही तर निर्मळतेची धन्य धन्य  साधनं आहेत. ही झाडूची भावडंच आहेत.
संत गाडगेबाबा, महात्मा गांधी आणि सेनापती बापट या महापुरुषांनी आपल्या हाती झाडू घेतला.
संत गाडगेबाबांचा खराटा मनुष्याच्या अंतर्बाह्य स्वच्छ जीवनाचे प्रतीक आहे.स्वच्छता , समता आणि बंधुत्व या ञिवेणी संगमावरील तीर्थस्थान होतं गाडगेबाबांचं !
स्वातंत्र्य,  स्वावलंबन, स्वाध्याय आणि स्वाभीमान ही स्वच्छतेच्या पुस्तकातील पाने आहेत.
प्रत्येक मनुष्याच्या जीवनात स्वच्छतेचे स्फुल्लिंग निर्माण झालं तर सुखी आणि संपन्न देशाचं भाग्य जवळ आलं अस
म्हटलं पाहिजे !!
*श्री संत गाडगेबाबा*
🙏🙏💐💐🙏🙏
====================
🙏🏼शब्दांकन / संकलन🙏🏼
✒  प्रमिलाताई सेनकुडे (शिंदे)
जि.प.प्रा.शा. वाटेगाव,
ता.हदगाव, जिल्हा नांदेड.
http://www.pramilasenkude.blogspot.in
========***********=======
🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏 पुन्हा भेटू उद्या
फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार 
========***********=========

Comments