फ्रेश मॉर्निंग बुलेटिन दिनांक 21 डिसेंबर 2016

*🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर प्रस्तुत 📢*
📱 9423625769

1⃣  🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 1⃣ 
🕖 प्रसारण वेळ : रोज सकाळी 06:50 ते 07:00 am
----------------------------------------------------
http://fmbuleteen.blogspot.com
----------------------------------------------------
📅 दि. 21/12/2016 वार - बुधवार  ========***********=========
        *📆 . . दिनविशेष . . 📆*
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
🎀१९०९ नाट्यगृहात कलेक्टर जॅक्सनचा वध.
🎀 १९५५ आचार्य अत्रे यांच्या महात्मा ज्योतिबा फुले या चित्रपटास राष्ट्रपती रौप्य पदक प्राप्त झाले.
🎀१९९७ मराठी श्रेष्ठ कवी पी सावळाराम यांचे निधन

*संकलक :- सौ. सुभद्रा सानप, बीड*
                 9403595764
========***********=========
*आजच्या ठळक बातम्या*
1⃣  मध्यप्रदेशातील जबलपूरमध्ये स्वच्छतेचा संदेश देत जनजागृती करण्यासाठी एक लाख शाळकरी मुलं उतरली रस्त्यावर
2⃣ भ्रष्टाचार आणि काळ्या पैशावर नियंत्रण आणण्यासाठी भारताने घेतलेल्या नोटाबंदी निर्णयापासून प्रभावित होत आता पाकिस्ताननेही घेतला नोटाबंदीचा निर्णय
3⃣ 2018 पासून इयत्ता दहावीची बोर्ड परीक्षा अनिवार्य करण्यासंदर्भातचा प्रस्ताव सीबीएसई नियामक मंडळाने केला  मंजूर
4⃣ नोटाबंदीसाठी आरबीआयची पूर्ण तयारी होती, 30 डिसेंबरनंतरही आवश्यक तितक्या चलनाचा पुरवठा अर्थमंत्री अरुण जेटली.
5⃣  केरळ राज्यातील कोट्टयम जिल्ह्यात १२ जानेवारीपासून सौरऊर्जेवर चालणारी बोटसेवा होणार  सुरु
6⃣ भारताने शेवटची कसोटी एक डाव आणि 75 धावांनी जिंकली,इंग्लंडचा डाव 207 धावांवर संपुष्टात. भारताने कसोटी मालिका 4 - 0 ने जिंकली.
7⃣ इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेतील 4-0 अशा विजयासह भारताचा कर्णधार विराट कोहलीने सर्वाधिक कसोटी विजय मिळवून देण्याच्या बाबतीत माजी कर्णधार मोहम्मद अझरुद्दीनशी साधली बरोबरी
*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*
📱 9960358300
========***********=========
*🌷 फ्रेश सुविचार 🌷*
प्रतिभा ही अनंत परिश्रमांत सामावलेली असते.*

*संकलक :- बालाजी चौधरी, लातूर*
                  7588876539
========***********=========
*आजचा मराठी शब्द*
             *प्रतिभा*

*संकलक :- जगन्नाथ दिंडे, मुखेड*
                  8668453639
========***********=========
*🎂 आजचा वाढदिवस* 

*संकलक :- नासा येवतीकर, धर्माबाद*
                  9423625769
[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा वरील क्रमांकावर पाठवू शकता. ]
========***********=========
*आजची @@ गुगली @@*

       "नाद "

इथे रोज नवा
नवा वाद आहे
वाद उकरणे
काहींचा नाद आहे

स्वतःच्या नादापाई
काही उकरतात वाद
वादविवादाने लोकांच्या
मनातुन होतात बाद

   शरद ठाकर
सेलू जि परभणी
8275336675
========***********=========
*आजचा*

========***********=========
*आजची लिंक*
वसमतच्या संगीता देशमुख यांनी त्यांच्या वडिलांवार  *कल्पतरु सम तो* या ऑनलाइन स्पर्धेसाठी पाठविलेला लेख खास आपल्यासाठी

*माझे बाबा.......*

http://marathi.pratilipi.com/sangita-deshmukh/maze-baba

लेख वाचून आपले रिप्लाई देण्यासाठी email id आणि पासवर्ड टाकून प्रवेश करा आणि लेखास स्टार पण जरूर द्या

निळ्या लिंकवर क्लिक करा लगेचच पूर्ण लेख वाचण्यास मिळेल.
========***********=======
*आजची बोधकथा*
            
🌺 *कोल्ह्याची  समस्या* 🌺
=================
एका झाडाच्या ढोलीत काही धनगरांनी आपली भाजी  भाकरी ठेवली होती. एका भुकेलेल्या कोल्हयाने ती पाहिली आणि आत शिरून त्याने ती खाऊन टाकली पण पोट मोठं झाल्या कारणाने त्याला त्या ढोलीतून बाहेर पडता येईना. त्यांच रडणं - ओरडन ऐकून जवळून जाणारा दुसरा एक कोल्हा तेथे आला आणि काय झाल ते विचारू लागला . सगळी हकीकत समजल्यावर तो म्हणाला, "अस्स, मग आता आत जाताना जितका बारीक होतास तितका होईपर्यंत तू आत राहा. मग तुला सहज बाहेर पडता येईल. "

*तात्पर्य :-  काही कठीण समस्या केवळ काळानेच सुटू शकतात.*
*----------------------------*
*📝 शब्दांकन/संकलन*
*✒श्रीमती प्रमिलाताई सेनकुडे (शिंदे)*
जि.प.प्रा.शा.वाटेगाव
ता.हदगाव, जि. नांदेड
http://www.pramilasenkude.blogspot.in
========***********=======
🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏 पुन्हा भेटू उद्या
फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार 
========***********=========

Comments