*🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर प्रस्तुत 📢*
📱 9423625769
1⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 1⃣
🕖 प्रसारण वेळ : रोज सकाळी 06:50 ते 07:00 am
----------------------------------------------------
http://fmbuleteen.blogspot.com
----------------------------------------------------
📅 दि. 22/12/2016 वार - गुरुवार
========***********=========
📆 .. *दिनविशेष . . 📆*
*सूर्याच्या उत्तरायणास प्रारंभ*
*सर्वात लहान दिवस*
*आयन दिन*
⏳१९०९ : भारतीय क्रांतिकारी अनंत कान्हेरे नी नाशिकचा जिल्हाधिकारी जॅक्सनची गोळ्या घालून हत्या केली.
💥 जन्म
👏१८८७ : श्रीनिवास रामानुजन, भारतीय गणितज्ञ.
⏳१९०३ : आबासाहेब तथा भालचंद्र दिगंबर गरवारे, भारतीय उद्योगपती.
💥 मृत्यू
⏳डॉ. बाबासाहेब आंबेडकराना आपले आडनाव देणार्या गुरुवर्य कृष्णाजी केशव आंबेडकर.
⏳१९४५ : शाहीर पठ्ठे बापूराव.
⏳१९७५ : संगीतकार वसंत देसाई यांचा मृत्यू लिफ़्टमध्ये सापडून झाला.
⏳१९७९ : नरहर रघुनाथ फाटक, भारतीय इतिहास संशोधक, संत साहित्याचे अभ्यासक.
⏳१९९७ : पी. सावळाराम (निवृत्तीनाथ रावजी पाटील), भावगीतकार, ठाण्याचे नगराध्यक्ष.
⏳१९९७ : पंडित प्रभाशंकर गायकवाड, सनईवादक.
*संकलक :- सौ. सुभद्रा सानप, बीड*
9403595764
========***********=========
*आजच्या ठळक बातम्या*
1⃣ जळगावात 10 जानेवारी रोजी उत्तर महाराष्ट्रस्तरीय कुमार साहित्य संमेलन होणार
2⃣ प्रसिद्ध लेखक आसाराम लोमटे यांच्या ‘आलोक’ या पुस्तकाला साहित्य अकादमीचा मराठी भाषेसाठीचा पुरस्कार जाहीर.
3⃣ मुंबईत 24 डिसेंबरला होणा-या शिवस्मारक भूमिपूजन सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत शरद पवार उपस्थित राहणार
4⃣ जुन्या नोटांमध्ये 5 हजारपेक्षा जास्त रक्कम डिपॉझिट करण्यावर रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने घातलेले निर्बंध घेतले मागे
5⃣ वैद्यकीय प्रवेशासाठीची राष्ट्रीय पात्रता परीक्षा अर्थात नीट ही इंग्रजीसोबतच आता मराठी, हिंदी, इंग्रजी, आसामी, तामिळ, गुजराती, बंगाली आणि तेलुगू या भाषेत 2017-18पासून होणार आहे.
6⃣ इंग्लंडविरुद्धच्या मालिकेतील दमदार कामगिरीच्या जोरावर जडेजाने आज जाहीर झालेल्या आयसीसी क्रमवारीतील कसोटी गोलंदाजांच्या यादीत दुसऱ्या स्थानी घेतली झेप, या यादीत भारताचा अव्वल फिरकीपटू रविचंद्रन अश्विन याआधीपासूनच अव्वलस्थानावर आहे.
7⃣ आयसीसी क्रमवारीत पहिल्या स्थानावर आर अश्विन तर दुसऱ्या स्थानावर रविंद्र जडेजा, 42 वर्षे जुन्या विक्रमाची पुनरावृत्ती
*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*
📱 9960358300
========***********=========
*🌷 फ्रेश सुविचार 🌷*
सेवा सातत्य आयुष्याच्या महानतेचे खरे गमक होय.
*संकलक :- बालाजी चौधरी, लातूर*
7588876539
========***********=========
*आजचा मराठी शब्द*
*सातत्य*
*संकलक :- जगन्नाथ दिंडे, मुखेड*
8668453639
========***********=========
*🎂 आजचा वाढदिवस*
👤 सौ. राजश्री भुसेवार, नांदेड
👤 अनिल यादव, धर्माबाद
👤 अनिल कोतीवाले, नांदेड
*संकलक :- नासा येवतीकर, धर्माबाद*
9423625769
[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा वरील क्रमांकावर पाठवू शकता. ]
========***********=========
*आजची @@ गुगली @@*
*" सन्मान "*
रडल्या शिवाय माय
लेकराला घेत नाही
नाराज झाल्या शिवाय
कोणी सन्मान देत नाही
रूसुन फुगून हल्ली
काही सन्मान घेतात
स्वाभिमान्याला माञ
स्वतः सन्मान देतात
शरद ठाकर
सेलू जि परभणी
8275336675
========***********=========
*आजचा*
🍃 *सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा* 🍃
*मृगाकडे कस्तुरी आहे*.., *फुलात गंध आहे*..,
*सागराकडे अथांगता आहे*..,
*माझ्याकडे काय आहे*..? *असं म्हणुन रडू नका*..,
*अंधाराला जाळणारा १ सुर्य तुमच्यातही लपलाय*.
*आव्हान करा त्या सुर्याला* !!
*मग उगवेल तो तुमच्या आयुष्यात नवीन क्षितिजं घेऊन*,
*अंधारमय रात्र संपवून सोनेरी किरणांनी सजून*.
*मग रोजच उगवेल एक नवी सकाळ,उत्साह-ध्येयाने भरून*...!!
" *जीवन खुप सुंदर आहे फक्त तसं जगायला हवं*...
!! जय सद् गुरू !!
🙏😊🍁 *सुप्रभात* 🍁😊
========***********=========
*आजची लिंक*
esakal
*सरकारी शाळेत हाऊसफुल्लची पाटी !*
http://beta1.esakal.com/saptarang/house-full-slate-public-school-22282
लेख वाचून आपल्या प्रतिक्रिया तेथेच द्या आणि काय लिहिले आहे ते कॉपी करून येथे ग्रुप वर पेस्ट करावे.
========***********=======
*आजची बोधकथा*
*राजा आणि संत*
एका वनात दोन संत राहत होते. एकांतात आपल्या तपश्चर्येत लीन राहत होते. कधीतरी यात्रेकरूंचा जत्था जायचा तेव्हा ते संत त्यांच्याशी बोलत असत. त्याच यात्रेकरूकडून त्यांना तेथील राजास त्या संतांबाबत माहिती मिळाली. तो या दोघांना भेटण्यास निघाला. जेव्हा संतांना ही गोष्ट कळाली.तेव्हा त्या दोघांना वाटले की आता राजा येणार व त्याने आपला चांगूलपणा पाहिला तर तो आपणास सतत भेटण्यास येईल, त्याच्याबरोबर अनेक माणसे येतील, त्यां माणसांच्या संगतीने अजून काही माणसे येतील व अशाने या वनातील शांती भंग पावेल व एकांत मिळणार नाही व एकांत नसल्याने आपणास ध्यानसाधना करता येणार नाही. राजा आम्हाला दोघांना सामान्य माणूस समजेल असे काहीतरी केले पाहिजे. राजाचा लवाजमा तेथे पोहोचला तेव्हा राजाने पाहिले की ते दोघेही संत हातात लाठ्याकाठ्या घेऊन एकमेकांशी भांडत होते. पहिल्या संताने दुस-याला म्हटले,'' तू स्वत:ला कोण समजतोस, मी इतके ज्ञान मिळविले आहे की ते तू सात जन्मातही मिळवू शकणार नाही.'' दुसरा संत त्यावर म्हणाला,'' अरे तू तर पक्का खोटारडा आहेस, तुझ्या ज्ञानाच्या गप्पा मारून तू लहान मुलाला फसवू शकशील पण मला नाहीस. तुझ्यापेक्षा जास्त ज्ञान मी माझ्या शिष्यांना दिले आहे.'' राजाने व त्याच्याबरोबरच्या लोकांनी हे भांडण पाहिले व विचार करू लागले हे साधू संत तर सामान्य माणसाप्रमाणेच भांडत आहेत व त्यांनी सर्वांनी असल्या साधूसंतांचा संग नको म्हणून वनातून जाणेच पसंत केले. राजा व लोक जाताच दोन्ही संतांनी एकमेकांकडे पाहून मंदस्मित केले व गळाभेट घेतली. दोन्हीही साधू आपल्या साधनेत रममाण झाले.
तात्पर्य : चांगली गोष्ट घडवून आणण्यासाठी कधीकधी चुकीच्या मार्गाचाही अवलंब करावा लागतो.
वर्तमानपत्रातून संग्रहित
========***********=======
🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏 पुन्हा भेटू उद्या
फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार
========***********=========
Comments
Post a Comment