*🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर प्रस्तुत 📢*
📱 9423625769
1⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 1⃣
🕖 प्रसारण वेळ : रोज सकाळी 06:50 ते 07:00 am
----------------------------------------------------
http://fmbuleteen.blogspot.com
----------------------------------------------------
📅 दि. 23/12/2016 वार - शुक्रवार
========***********=========
*📆 . . दिनविशेष . . 📆*
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
💥किसान दिन
💥१२९६. सोपान काकानी समाधी घेतली
💥१७३२. कापसाचा धागा काढणारे यंत्र निर्माण करणार्या रिचर्ड आर्कराईटयांचा जन्म
💥१९४७. जॅक किल्बी यांचेकडुन ट्राझिस्टरचा शोध
*संकलक :- सौ. सुभद्रा सानप, बीड*
9403595764
========***********=========
*आजच्या ठळक बातम्या*
1⃣ गरिबांना स्वस्तात औषध मिळावं यासाठी प्रयत्न सुरु आहे, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वाराणसीत कार्यक्रमात व्यक्त केले आपले मत
2⃣ राममोहन राव यांना पदावरुन हटवले, डॉ गिरीजा वैद्यनाथन तामिळनाडूच्या मुख्य सचिवपदी.
3⃣ वर्धा येथील यशवंत ग्रामीण शिक्षण संस्थेंतर्गत वर्धा जिल्ह्यातील माध्यमिक शाळेतील शिक्षकांपैकी १३ अतिरिक्त शिक्षकांच्या नियुक्तीला आव्हान देणा-या याचिकेवर न्यायमूर्ती वासंती नाईक व स्वप्ना जोशी यांनी दिला दिलासा, शिक्षक अतिरिक्त ठरू शकत नसल्याचा निर्वाळा
4⃣ दिल्लीचे नायब राज्यपाल नजीब जंग यांचा राजीनामा, राजीनाम्याचं कारण अस्पष्ट.
5⃣ विदर्भातील 11862 गावांतील लाखों शेतक-यांना दुष्काळाची भरपाई चार आठवड्यात देण्यात येईल, अशी राज्य सरकारची उच्च न्यायालयात कबुली.
6⃣ धडाकेबाज फलंदाजीने आणि कुशल कप्तानीने यंदाचे वर्ष गाजवणारा भारताचा कसोटी कर्णधार विराट कोहलीची आयसीसीच्या एकदिवसीय कर्णधारपदी करण्यात आली निवड
7⃣ आयसीसी क्रिकेटर ऑफ द इअर आणि आयसीसी टेस्ट क्रिकेटर ऑफ द इअरसाठी रविचंद्रन अश्विनच्या नावाची घोषणा.
💥 व्यंकटेश काटकर लिखित *सोनेरी भोपळा* पुस्तकाचे आज नांदेड मध्ये प्रकाशन
*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*
📱 9960358300
========***********=========
*🌷 फ्रेश सुविचार 🌷*
दुसऱ्यांच चांगलं झालेलं पाहून जेव्हा आपल्याला आनंद होतो तेव्हा आपलं चांगलं व्हायला सुरुवात होते.
*संकलक :- बालाजी चौधरी, लातूर*
7588876539
========***********=========
*आजचा मराठी शब्द*
*जेंव्हा*
*संकलक :- जगन्नाथ दिंडे, मुखेड*
8668453639
========***********=========
*🎂 आजचा वाढदिवस*
👤 सार्थक सुगंधे, धर्माबाद
👤 राजू पाटील कुरुंदे
*संकलक :- नासा येवतीकर, धर्माबाद*
9423625769
[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा वरील क्रमांकावर पाठवू शकता. ]
========***********=========
*आजची @@ गुगली @@*
"श्रेय "
आज काल जिथे तिथे
श्रेयाची लढाई आहे
आमच्या मुळे सारे काही
कोणाचीही बढाई आहे
ज्याचे श्रेय त्याला
आपोआप जात असतं
कोणी काय केल हे
कधीच लपत नसतं
शरद ठाकर
सेलू जि परभणी
8275336675
========***********=========
*आजचा*
🌴 🌱॥ विचार धन ॥🌱 🌴
धावणे ही आजची कमालीची गरज झाली आहे. महानगरी, चाकरमाणी असो की खेड्यातला शेतकरी, 'कशासाठी पोटासाठी' करीत तो सकाळपासून रात्रीपर्यंत अविश्रांत धावतो. असाध्य ते साध्य करणे हे त्याचे पोटाच्या पुढचे ध्येय असते. प्रपंचाच्या जबाबदा-यांचे पालन करता करता त्याला धावण्याची एवढी सवय होते की तो थांबणे विसरूनच जातो. 'पाॅज' नावाची मनाला आणि शरीराला उभारी देणारी, ताजेपणा देणारी युक्ती आपणही स्वीकारू शकतो, हेच त्याच्या स्मरणापलीकडे जाते.
'जीवन फार धकाधकीचे झाले आहे' हे वा अशाप्रकारची वाक्य आता गुळगुळीत झालीत. कारण त्यातील अर्थ सर्वमान्य झाला आहे. मात्र, हे धकाधकीचे जीवन अल्पकालीन ठरू नये, यासाठी 'चार युक्तीच्या गोष्टी' मधील एक गोष्ट
'क्षणभर विश्रांती' ची आहे, हे लक्षात घेऊन त्याचा अंगिकार होणे आवश्यक आहे.
🍀 ॥ रामकृष्णहरी ॥ 🍀
🌻 🍁सर्वेपि सुखिन: सन्तु: 🍁🌻
========***********=========
*आजची लिंक*
esakal
*सरकारी शाळेत हाऊसफुल्लची पाटी !*
http://beta1.esakal.com/saptarang/house-full-slate-public-school-22282
लेख वाचून आपल्या प्रतिक्रिया तेथेच द्या आणि काय लिहिले आहे ते कॉपी करून येथे ग्रुप वर पेस्ट करावे.
========***********=======
*आजची बोधकथा*
*मनाची शांतता*
एकदा एका शेतकऱ्याला जाणवले की त्याचे घड्याळ धान्याच्या कोठारात हरवले आहे.
जरी ते एक सामान्य घड्याळ होते तरी त्याचे लेखी त्याला अफाट भाावनिक मूल्य होते.
बराच वेळ गवतात सर्वत्र शोधल्यावरही त्याला ते सापडेना. मग त्यांनी कोठाराच्या बाहेर खेळत असलेल्या मुलांच्या गटाला घड्याळ शोधण्यासाठी बोलावले व त्यानी त्या मुलांना वचन दिले की जो कोण त्याचे घड्याळ शोधून देईल,त्याला बक्षिस मिळेल.....
बक्षिस मिळेल, हे ऐकून सगळी मुले कोठारात लगबगीने गेली, गवताच्या चारी बाजूने शोधायला लागली पण त्यांना घड्याळ कुठेही सापडेना.
नेमके जेंव्हा त्या शेतकर्याने घड्याळाचा शोध घेण्याचे थांबवायचे ठरवले तेव्हा एक मुलगा त्याच्या जवळ जाऊन शेतकर्याकडे शोधण्याची एक संधी मागू लागला.
शेतकरी त्याच्याकडे बघून विचार करू लागला की "बिघडले कुठे...! हा मुलगा प्रामाणिक दिसतोय. देऊ या त्याला एक संधी........"
शेतकर्याने त्या छोट्या मुलाला घड्याळाचा शोध घेण्यासाठी कोठाराट पाठवले.
थोड्याच वेळात तो मुलगा हातात घड्याळ घेऊन नाचत नाचतच बाहेर आला.
शेतकऱ्याला आनंद झाला आणि आश्चर्यही वाटले.........!
त्याने त्या मुलाला विचारले की जिथे बाकीच्यांना अपयश आले, तिथे त्याला हे यश कसे काय प्राप्त झाले.............!!
मुलगा म्हणाला, “मी काहीच नाही केल, पण जमिनीवर शांत बसून राहिलो आणि ऐकू लागलो.त्या शांततेत मला घड्याळाची टिक-टिक ऐकू आली आणि मी त्या दिशेने शोधू लागलो.”
*शिकवण*
*एक शांत मन त्रासलेल्या मनापेक्षा चांगलं विचार करू शकते.*
*तुमच्या मनाला रोज काही क्षणांसाठी तरीशांतता द्या आणि मग पहा, तुमच्या अपेक्षेप्रमाणे तुमचे मन तीक्ष्णपणाने काम करून तुमचं जीवन कसे सजवते.*
*-------------------------------*
*📝 संकलन*📝
*✒श्रीमती प्रमिलाताई सेनकुडे (शिंदे)*
जि.प.प्रा.शा.वाटेगाव
ता.हदगाव, जि. नांदेड
http://www.pramilasenkude.blogspot.in
========***********=======
🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏 पुन्हा भेटू उद्या
फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार
========***********=========
Comments
Post a Comment