फ्रेश मॉर्निंग बुलेटिन दिनांक 25 डिसेंबर 2016

*🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर प्रस्तुत 📢*
📱 9423625769

1⃣  🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 1⃣ 
🕖 प्रसारण वेळ : रोज सकाळी 06:50 ते 07:00 am
----------------------------------------------------
http://fmbuleteen.blogspot.com
----------------------------------------------------
📅 दि. 25/12/2016 वार - रविवार 
========***********=========
        *📆 . . दिनविशेष . . 📆*
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
🎀ख्रिसमस : येशू ख्रिस्तचा जन्मदिन
🎀 1642 सर आयझँक न्यूटनचा जन्मदिन
🎀 1926 माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचा जन्मदिन
🎀 श्री.म.माटे स्मरणदिन
*संकलक :- सौ. सुभद्रा सानप, बीड*
                 9403595764
========***********=========
*आजच्या ठळक बातम्या*
1⃣ पुणे मेट्रोचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते रिमोटचे बटन दाबून भूमिपूजन संपन्न.
2⃣  छत्रपती शिवाजी महाराजांचे व्यक्तीमत्व बहुआयामी होते, त्यांनी सुशासनाची उत्तम परंपरा घालून दिली मुंबईत शिवस्मारकाचे भूमिपूजन प्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केले मत.
3⃣ ८ नोव्हेंबर रोजी नोटाबंदीचा निर्णय लागू झाल्यापासून देशभरात १३0 कोटी रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला असल्याची माहिती वित्त मंत्रालयाने दिली
4⃣ सार्वजनिक ठिकाणी कचरा फेकण्यावर बंदी घालणाऱ्या राष्ट्रीय हरित लवादाने आता देशभरात रस्त्यावर आणि मोकळ्या जागी कचरा जाळण्यावर आणले निर्बंध
5⃣ भारतीय साहित्य क्षेत्रातील सर्वोच्च असा ज्ञानपीठ पुरस्कार बंगाली भाषेतील प्रसिध्द कवी शंख घोष यांना जाहीर, पुरस्कार मध्ये 11 लाख रु. रोख, प्रशस्तिपत्र आणि वाग्देवीची प्रतिमा दिले जाते
6⃣  देशात तळागळापर्यंत पोहोचलेली सेवा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बीएसएनएलने आता ९९ रुपयांत अनलिमिटेड लोकल आणि एसटीडी कॉल करण्याची दिली सुविधा
7⃣ बीसीसीआय’वरील लोढा पॅनलच्या शिफारशींचे संकट क्रिकेटपटूंना हितावह नसल्याची कबुली देत बोर्डाचे अध्यक्ष अनुराग ठाकूर यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाची प्रतीक्षा करण्यावाचून पर्याय नसल्याचे म्हटले
💥 ज्येष्ठ व्यंगचित्रकार वसंत सरवटे यांचं विलेपार्ले येथे राहत्या घरी निधन.
*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*
📱 9960358300
========***********=========
*🌷 फ्रेश सुविचार 🌷*
माणसाचा जन्म भोगासाठी नसून त्यागासाठी आहे. - *स्वामी रामसुखदास*

*संकलक :- बालाजी चौधरी, लातूर*
                  7588876539
========***********=========
*आजचा मराठी शब्द*
             *त्याग*

*संकलक :- जगन्नाथ दिंडे, मुखेड*
                  8668453639
========***********=========
*🎂 आजचा वाढदिवस* 
संदीप रणभीरकर
रवि ढगे, प्रा. शिक्षक
सागर सन्नेवार

*संकलक :- नासा येवतीकर, धर्माबाद*
                  9423625769
[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा वरील क्रमांकावर पाठवू शकता. ]
========***********=========
*आजची @@ गुगली @@*

     "लढाई "

राजकारण म्हणजे
नेतृत्वाची लढाई असते
शब्दानेच शब्दाची
केलेली चढाई असते

शब्द शब्द वापरून
चालते एकमेकांवर चढाई
राजकारणात संपते का
सांगा अस्तित्वाची लढाई

   शरद ठाकर
सेलू जि परभणी
8275336675
========***********=========
*आजचा*
🎯  विचारवेध.........✍🏻
--------------------------
आपल्या जीवनाला सातत्याने नदीच्या प्रवाहासारखे चांगल्या विचाराने अखंड प्रवाहीत केले तर जीवनात जगण्याला एक नवे चैतन्य, एक नवा प्रवाह
किंवा एक नवी दिशा मिळते.नदीचा प्रवाह खंडीत झाला तर पात्रातले पाणी घाण होते.त्या पाण्याचा काहीच उपयोग होत नाही.त्याचप्रमाणे माणसाच्या विचाराचेही तसेच आहे.सदैव आपल्या मनाला,विचाराला चालना दिली नाही तर आपल्यामध्ये एक प्रकारची मरगळ किंवा विकृती बळावते.ती एक तर आपलेही नुकसान करते आणि इतरांच्याही प्रगतीला हानी पोहचवू शकते.त्यासाठी आपले मन, आपले विचार चांगल्याप्रकारे नेहमी प्रवाहासारखे प्रवाहीत असू द्यावे.हाच खरा जीवनाचा योग्य मार्ग आहे.ज्या चांगल्या विचारामुळे दोघांचेही कल्याण होऊ शकेल.

- व्यंकटेश काटकर, नांदेड
  संवाद.9421839590.

🌿🌺🌿🌺🌿🌺🌿🌺
========***********=========
*आजची लिंक*
*एका पुरुषाची आत्मकथा*

http://nasayeotikar.blogspot.com/2016/12/mens-story.html

========***********=======
*आजची बोधकथा*

*दानाचे महत्‍व*

हजरत उमर आपल्‍या रयतेची खूप काळजी घेत असत. ते स्‍वत:ची व आपल्‍या परिवाराची चिंता नकरता जनतेचे दु:ख निवारणार्थ झोकून देत. एका प्रसंगाची गोष्‍ट आहे, काही कारणाने राजधानीत आग लागली, आग इतक्‍या वेगाने पसरली की तिने शहराचा अर्धा भाग व्‍यापून टाकला. लोकांनी खूप पाणी टाकले पण आग आटोक्‍यात येण्‍याची काही चिन्‍हे दिसेनात. हजारो लोकांची घरे, दारे, पिके सगळे जळून खाक झाले. मनुष्‍यहानीही मोठया प्रमाणावर झाली. लोकांचा आक्रोश वाढत होता. आगीचा वणवा पसरतच चालला. आगीचे लोळ भडकत चालले. शेकडो घरे आगीच्‍या भक्ष्‍यस्‍थानी पडत होती. जनतेला एकाच भयाने ग्रासले होते. आग आटोक्‍यात कशी आणायची कशी, आग विझत नसल्‍याने लोकांनी हजरत उमरला उपाय विचारले, तेसुद्धा आग विझविण्‍यात तनमनधनाने व्‍यग्र होते. उमरनी लोकांना सांगितले, ''ही आग म्‍हणजे खुदाचा कोप असावा, तुम्‍ही लोकांनी आता आग विझविण्‍यासाठी पाणी टाकण्‍याचे काम सोडा, गरिबांना अन्नदान करा. कदाचित खुदा यामुळे प्रसन्न होईल आणि आगीपासून आपली सुटका करेल.'' जनतेतील लोक म्‍हणाले,''हजरत साहेब आपण धर्मादाय संस्‍‍थेचे सर्व दरवाजे सगळ्यांसाठी आधीच उघडे ठेवलेले आहेत. कोणीही गरीब आमच्‍याकडे आला तर आम्‍ही त्‍याला दान करतोच. मग आमच्‍यावर तो नाराज कसा'' हजरत उमरने समजावले,''तुम्‍ही जे दान करता त्‍यामागे निष्‍काम भावना नाही. तुम्‍हाला वाटते दानाचे पुण्‍य म्‍हणून तुम्‍हाला सन्‍मान किंवा प्रशंसा हवी असते. या देखाव्‍याला पुण्‍यकर्म म्‍हणत नाहीत.'' हजरत उमरच्‍या खुलाशानंतर जनतेने आपली चूक सुधारली अन आश्‍चर्य म्‍हणजे आग पूर्णपणे विझून गेली. जनतेने खुदाचे व हजरत साहेबांचे आभार मानले.

तात्‍पर्य :- नि:स्‍वार्थ भावनेने केलेले दान कधीही लोकांच्‍या अंतरात्‍म्‍यापर्यंत पोहोचते.

वर्तमानपत्रातून संग्रहित
========***********=======
🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏 पुन्हा भेटू उद्या
फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार 
========***********=========

Comments