फ्रेश मॉर्निंग बुलेटिन दिनांक 26 डिसेंबर 2016


*🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर प्रस्तुत 📢*
📱 9423625769

1⃣  🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 1⃣ 
🕖 प्रसारण वेळ : रोज सकाळी 06:50 ते 07:00 am
----------------------------------------------------
http://fmbuleteen.blogspot.com
----------------------------------------------------
📅 दि. 26/12/2016 वार - सोमवार 
========***********=========
        *📆 . . दिनविशेष . . 📆*

💥 १९९७ : विंदा करंदीकर यांना महाराष्ट्र फांऊंडेशन पुरस्कार
💥 जन्म -
⏳१९४८ : डॉ. प्रकाश आमटे
⏳१९१४ : डॉ. मुरलीधर देविदास ऊर्फ बाबा आमटे – कुष्ठरोग्यांच्या पुनर्वसनासाठी आयुष्य वाहून घेणारे थोर समाजसेवक
💥 मृत्यू -
⏳१९९९ : शंकरदयाळ शर्मा – भारताचे ९ वे राष्ट्रपती व ८ वे उपराष्ट्रपती

*संकलक :- सौ. सुभद्रा सानप, बीड*
                 9403595764
========***********=========
*आजच्या ठळक बातम्या*
1⃣पाकिस्तानची इस्रायलला अणुबॉम्ब टाकण्याची धमकी, पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा मेहम्मूद आसिफ यांनी सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका खोट्या वृत्तावरून इस्रायलला युद्धाचं दिलं आव्हान
2⃣नोटबंदीमुळे भारतात गोंधळसदृश परिस्थिती-जागतिक प्रसारमाध्यमांनी नोटबंदीच्या निर्णयामुळे भारतात अभूतपूर्व गोंधळाची परिस्थिती निर्माण झाल्याचे आपल्या वृत्तात म्हटले आहे.
3⃣महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेच्या निवडणुकीचा निकाल जाहीर, महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेच्या निवडणुकीचा निकाल शनिवारी सायंकाळी जाहीर झाला. या निवडणुकीत इंडियन मेडिकल असोसिएशनच्या पॅनलने एकहाती विजय मिळविला .
4⃣महाराष्ट्रातील २५ पक्ष ‘आउट’, निवडणूक आयोगाने देशातील २५५ राजकीय पक्षांना यादीतून हटविले असून, यात महाराष्ट्रातील २५ राजकीय पक्षांचा समावेश आहे.
5⃣अच्छे दिन नव्हे बुरे दिन आलेत - धनंजय मुंडे, मोदी सरकारने मोठ्या उद्योगपतींची साडेसहा हजार कोटी रूपयाची कर्जे माफ करून सर्वसामान्य जनतेच्या पैशावर डोळा ठेवण्याचे पाप केले आहे.
6⃣विराटची कमाई सचिनपेक्षा दुप्पट, लोकप्रियतेतही अग्रेसर सर्वाधिक कमाई करणाऱ्या भारतीय खेळाडूंच्या यादीत भारतीय कसोटी संघाचा कर्णधार विराट कोहली अव्वल स्थानावर
7⃣भारतीय महिला संघाने जिंकले कांस्य
संगीता कुमारीने केलेल्या दोन शानदार गोलच्या जोरावर भारतीय महिला हॉकी संघाने १८ वर्षांखालील आशिया चषक स्पर्धेत मिळविला विजय.
*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*
📱 9960358300
========***********=========
*🌷 फ्रेश सुविचार 🌷*
जो खांडावया घावो घाली ...का लावणी जयाने केली...दोघा एकची सावली....वृक्षु दे जैसा...

अर्थ***
झाड तोडणाऱ्याला व लावणाऱ्याला
पण सावली देतं. माणसाचं वर्तन तसच असावं. वाईटासोबत चांगलच वागावं व चांगल्यासोबत पण तसच वागावं.
ज्ञानेश्वरी ....अध्याय....12
*संकलक :- बालाजी चौधरी, लातूर*
                  7588876539
========***********=========
*आजचा मराठी शब्द*
             *वर्तन*

*संकलक :- जगन्नाथ दिंडे, मुखेड*
                  8668453639
========***********=========
*🎂 आजचा वाढदिवस* 
👤 नरसिंग जिड्डेवार, प्रा. शिक्षक भोकर

*संकलक :- नासा येवतीकर, धर्माबाद*
                  9423625769
[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा वरील क्रमांकावर पाठवू शकता. ]
========***********=========
*आजची @@ गुगली @@

    " दम "

दम देऊन माणसं
आपली होत नाहीत
आपली असुन ही
सोबत रहात नाहीत

दम देऊन नाही माणसं
प्रेमाने जिंकावे लागतात
प्रेमाने जिंकलेले सदा
कर्तव्याला जागतात

  शरद ठाकर
सेलू जि परभणी
8275336675
========***********=========
*आजचा*
🌲~💧॥ विचार धन ॥💧~🌲

स्वत:शीच साधलेला 'संवाद' आपल्या व्यक्तिमत्वावर कमी आधिक प्रमाणात प्रभाव पाडत असतो, परिणाम घडवत असतो. आपल्याबरोबर काही घडल्यावर आपण आपल्या मनाशी साधलेला संवाद म्हणजे 'स्वसंवाद.' काही घडल्यानंतर  मनात येणारे विचार, भावना आणि आपण करतो ती कृती या सगळ्याचा परिपाक म्हणजेच 'स्वसंवाद.' आपल्या मनातले विचार आणि संवाद यावर आपले नियंत्रण असायला हवं.

मनातल्या विचारांचा  परिणाम मन:स्थितीवर होत असतो. याचा परिणाम आपल्या भावनिक आरोग्याबरोबरच आत्मविश्वास आणि  कामगिरीवरही झालेला पहायला मिळतो. मनाशी होणारा हा संवाद आपलं मानसिक व भावनिक 'प्रतिबिंब' असतं.

" चांगल्या विचारांनी 'मूड' चांगला होतो तर नकारात्मक विचाराने तो वाईट होतो."
            
        🍁॥ रामकृष्णहरी ॥🍁
⛳ ॥ शुभसकाळ ॥ शुभदिवस ॥⛳
========***********=========
*आजची लिंक*
साहित्य दरबार वैचारिक लेखमाला
विषय -
*माझ्या नजरेत 2016 वर्ष*

http://nasayeotikar.blogspot.com/2016/12/blog-post_25.html

वरील निळ्या अक्षरावर क्लिक करून पूर्ण लेख वाचा आणि आपल्या प्रतिक्रिया जरूर कळवा
========***********=======
*आजची बोधकथा*

*गुरु केले कासवाला*

कोणे एके काळी एका नगरात एक वृद्ध एकटाच राहत होता. छोट्याशा झोपडीत राहून तो आजूबाजूच्‍या शेतात छोटीमोठी कामे करून स्‍वत:ची गुजराण करत असे. आपल्‍या गरजा त्‍याने खूपच मर्यादित ठेवल्‍या असल्‍याने त्‍याला फारसा खर्च येत नसे. मात्र हे असताना त्‍याने एक कासव पाळले होते आणि त्‍या कासवावर त्‍याचा फार जीव होता. दुपारी आपले जेवण तयार करताना तो कासवासाठी हरभरे भिजवून त्‍याला देत असे. रिकामा वेळ असताना तो त्‍या कासवाशी संवाद साधत असे. आजूबाजूचे लोक त्‍याचे ते कासवप्रेम पाहून हसत असत. एके दिवशी एक परिचित मनुष्‍य त्‍याला भेटण्‍यासाठी आला. थोडा वेळ इकडचे तिकडचे बोलून झाल्‍यावर त्‍याने त्‍या कासवाला पाहिले व तो मनुष्‍य म्‍हणाला,'' तू इतका घाणेरडा प्राणी कशासाठी पाळला आहेस. सोडून दे त्‍या कासवाला.'' त्‍याच्‍या बोलण्‍याने वृद्धाला खूप वाईट वाटले. वृद्ध म्‍हणाला,''अरे मित्रा, तू असे बोलून माझ्या काळजाला हात घातला आहेस. इतके वाईट तर मी कधीच त्‍या कासवाबद्दल माझ्या मनात किंवा स्‍वप्‍नातसुद्धा विचारत आणत नाही. ते कासव माझ्या गुरुस्‍थानी आहे म्‍हणून माझ्या मनात त्‍याच्‍याबद्दल खूप आदर आहे.'' तो माणूस म्‍हणाला,''ते कासव तुझे गुरु कसे काय बरे ठरते'' वृद्ध म्‍हणाला,'' कासव हे मानवी मनाचे प्रतिक आहे. कासव आपल्‍याला हे शिकवते की त्‍याच्‍यावर जरा जरी संकटाची चाहूल लागली तरी ते जसे स्‍वत:चे अंग आक्रसून कवचाखाली जाते त्‍याप्रमाणेच मानवाने वाईट गोष्‍टींची जराशी चाहूल जरी लागली तरी त्‍यापासून लांब राहिले पाहिजे. कासवाप्रमाणे आपण आपल्‍या मनाला वाईट गोष्‍टींपासून अंग चोरण्‍याचा प्रयत्‍न केला तर मानवाचे त्‍यात भले आहे.''

वर्तमानपत्रातून संग्रहित   
========***********=======
🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏 पुन्हा भेटू उद्या
फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार 
========***********=========

Comments