*🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर प्रस्तुत 📢*
📱 9423625769
1⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 1⃣
🕖 प्रसारण वेळ : रोज सकाळी 06:50 ते 07:00 am
----------------------------------------------------
http://fmbuleteen.blogspot.com
----------------------------------------------------
📅 दि.28/12/2016 वार - बुधवार
========***********=========
*📆 . . दिनविशेष . . 📆*
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
💥1885. राष्ट्रीय सभेचे (काँग्रेसचे) स्थापना व पहिले अधिवेशन मुंबई येथे
💥1869 च्युइंगमचा शोध विल्यम सेम्पल याने लावला
💥1885 जगातील पहिल्या व्यावसाईक चित्रपटाचे प्रदर्शन झाले
💥1995 भारताने आय.आर.एस.~1सी. हा उपग्रह अवकाशात सोडला.
*संकलक :- सौ. सुभद्रा सानप, बीड*
9403595764
========***********=========
*आजच्या ठळक बातम्या*
1⃣ पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केले चारधाम राजमार्ग योजनेचे भूमिपूजन
2⃣ निफाडला राज्यातील सर्वात कमी तापमान
3⃣ तेलंगणा सरकार दुर्गम भागातील रुग्णांना रुग्णालयात तात्काळ आणण्यासाठी बाइक रुग्णवाहिका उपलब्ध करून देणार- सी. लक्ष्मा रेड्डी, आरोग्य मंत्री, तेलंगणा
4⃣ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना यंदाचा 'नागभूषण' पुरस्कार 1 जानेवारीला प्रदान करण्यात येणार
5⃣ लातूरमध्ये होणा-या 34 व्या अस्मितादर्श साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी प्रज्ञा दया पवार.
6⃣ सुरेश कलमाडी आणि अभय चौटाला यांची भारतीय ऑलिम्पिक संघटनेच्या आजीवन अध्यक्षपदी निवड
7⃣ विराट कोहली ठरला क्रिकेट ऑस्ट्रेलियाचा 'कॅप्टन ऑफ द इयर'
*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*
📱 9960358300
========***********=========
*🌷 फ्रेश सुविचार 🌷*
जो सदैव काहीतरी नवीन घेण्याच्या प्रयत्नात असतो तोच खरा विद्यार्थी होय.
*संकलक :- बालाजी चौधरी, लातूर*
7588876539
========***********=========
*आजचा मराठी शब्द*
*प्रारब्ध*
*संकलक :- जगन्नाथ दिंडे, मुखेड*
8668453639
========***********=========
*🎂 आजचा वाढदिवस*
👤 नंदकिशोर सोवनी, पुणे
👤 व्यंकटेश माडेवार, धर्माबाद
👤 योगेश शंकर इबितवार, येवती
👤 अजय तुम्मे
*संकलक :- नासा येवतीकर, धर्माबाद*
9423625769
[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा वरील क्रमांकावर पाठवू शकता. ]
========***********=========
*आजची @@ गुगली @@*
"लोका सांगे "
कॅशलेस कॅशलेस
असे घोकीत आहेत
सांगणारांचे व्यवहार
सारे रोखीत आहेत
हे म्हणजे असे झाले
लोका सांगे ब्रह्मज्ञान
स्वतः माञ एकदम
कोरडे कोरडे पाषाण
शरद ठाकर
सेलू जि परभणी
8275336675
========***********=========
*आजचा*
🌼 ☀ ॥ विचार धन ॥ ☀ 🌼
राष्ट्रसंत तुकडोजी म्हणतात,' कोण दिवस येई कसा, कोण जाणतो ?' कोणीही जाणू शकत नाही, कुठला दिवस कसा उगवेल ते! एखादा दिवस पदोन्नतीचा, धनलाभाचा, अपत्यप्राप्तीचा, सहचरी लाभण्याचा, मानसन्मानाचा किंवा प्रिय व्यक्तिच्या मृत्यूचा, अपघाताचा, भूकंपाचा, नोकरी जाण्याचा, कलहाचा असा कुठलाही असू शकतो. कोण सांगू शकतं, दिवसाच्या पोटात काय दडलंय ते ?
उगवणारा प्रत्येक दिवस सुखाचा जावा अशी प्रत्येकाची ईच्छा व अपेक्षा असते. ईश्वरी शक्तीची मानसपूजा करताना आजचा दिवस सर्वांना सुखरूप, आनंदाचा जावा हिच प्रार्थना कोणीही करतो. पण तसेच होईल, असे कोणी खात्रीने सांगू शकत नाही. कोणता दिवस कसा उगवेल, याची उगाच उद्दाम खात्री न बाळगता व्यतित केलेल्या प्रत्येक क्षणाला सलाम करत पुढचा क्षण चांगला जावा यासाठी त्या अज्ञात दिनशक्तीसमोर नतमस्तक होणे, हेच काय ते हाती असते. याचे जागते भान म्हणजेच 'विनयशीलता' होय.
🌻॥ रामकृष्णहरी ॥🌻
🍁 🍁॥ सुदिनमस्तु: ॥🍁 🍁
========***********=========
*आजची लिंक*
मनीषा वानी यांचा *कल्पतरु तो सम* स्पर्धेतील लेख
तुच माझा शिल्पकार
http://marathi.pratilipi.com/manisha-wani/shilpkar
जरूर वाचा
========***********=======
*आजची बोधकथा*
*चहाड्या केल्याची सजा*
नसिरूद्दीन हैदर अयोध्येचे नवाब होते. अत्यंत उदार व्यक्तिमत्व म्हणून त्यांची ख्याती होती. परंतु त्यांच्यात एक अवगुण होता. ते लोकांच्या सांगण्यावर चटकन विश्वास ठेवत असत. त्यांच्या या स्वभावाचा फायदा त्यांचा हुसेनी नावाचा नोकर उचलत असे. तो नवाबाचे पाय रात्री दाबत असताना ज्यांच्यावर तो नाराज असे त्या लोकांच्या खोट्या तक्रारी करत असे. हुसेनीच्या अशा सवयीमुळे नवाबाचे दिवाण व अन्य लोक त्याच्यावर नाराज होते. नवाबाच्या दिवाणांचे नाव होते फैजल खान. एकदा त्यांनी हुसेनीला कानपूरला पाठविले व त्याला तेथे अटकही केली. दुस-या दिवशी नवाबसाहेबांना हुसेनीचे निधन साथरोगाने झाल्याचा निरोप पाठविला. काही महिन्यानंतर हुसेनी जेलमधून पळाला त्याने नवाबसाहेबांना भेटून सर्व कहाणी सांगितली. तिकडे दिवाणांना हुसेनी भेटल्याची माहिती मिळाली होती. त्यांनी सर्व कर्मचा-यांना एक युक्ती सांगितली. जेव्हा नवाबसाहेबांनी पहारेक-यास विचारले,याला ओळखतोस काय. पहारेक-याने ते एक भूत असल्याचे सांगितले. इतर कर्मचा-यांनीही त्याचीच री ओढली व हुसेनीला जिवंतपणीच भूत ठरवून त्याच्या खोटेपणाला खोटेपणाचेच प्रत्युत्तर दिवाणसाहेबांनी दिले.
तात्पर्य : चहाडी करणे, लोकांच्या मनात किंतू निर्माण करणे किंवा अफवा पसरवणे या वाईट गोष्टी आहेत. यापासून मानवाने दूरच राहिले पाहिजे.
वर्तमानपत्रातून संग्रहित
========***********=======
🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏 पुन्हा भेटू उद्या
फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार
========***********=========
Comments
Post a Comment