*🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर प्रस्तुत 📢*
📱 9423625769
1⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 1⃣
🕖 प्रसारण वेळ : रोज सकाळी 06:50 ते 07:00 am
----------------------------------------------------
http://fmbuleteen.blogspot.com
----------------------------------------------------
📅 दि. 29/12/2016 वार - गुरुवार
========***********=========
*📆 . . *दिनविशेष . . 📆*
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
💥1273. निवृत्तीनाथ यांचा जन्मदिन
💥 1506 कोलंबस यांचा स्मरणदिन
💥 1616 मराठीतील प्रसिध्द कवी दासोपंत देशपांडे यांचे निधन
*संकलक :- सौ. सुभद्रा सानप, बीड*
9403595764
========***********=========
*आजच्या ठळक बातम्या*
1⃣ जुन्या नोटांबाबत वटहुकुम जाहीर, जुन्या नोटा असल्यास दंडात्मक कारवाई
2⃣ नवीन वर्षात अमरावती विभागातील हागणदारीमुक्त ७३३ गावात स्वछता अभियान राबविण्यात येणार असून ३१ डिसेंबर २०१६ पर्यंत प्रस्ताव मागविण्यात येत आहे
3⃣ नोटावंदीच्या पार्श्वभूमीवर कर्जदारांना कर्जाचे हप्ते भरण्यासाठी 90 दिवसांचा अतिरिक्त अवधी देण्याचे रिझर्व्ह बॅंकेने बँकांना दिले आदेश
4⃣ व्यवहार करण्यासाठी भविष्यात चार मार्ग आहेत आधार पे, मोबाईल फोन, स्वाईप आणि बँक व्यवहार मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू.
5⃣ आरबीआयच्या डेप्युटी गर्व्हनरपदी विरल वी आचार्य यांची नियुक्ती, आचार्य सध्या अमेरिकन विद्यापीठात अर्थशास्त्राचे प्राध्यापक आहेत.
6⃣ सुरेश कलमाडी यांच्यानंतर अभय चौटाला यांनीही IOA मधील मानद अध्यक्षपद स्वीकारण्यास दिला नकार
*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*
📱 9960358300
========***********=========
*🌷 फ्रेश सुविचार 🌷*
संयम व सहनशीलता माणसाचे खरे मित्र असावेत.
*संकलक :- बालाजी चौधरी, लातूर*
7588876539
========***********=========
*आजचा मराठी शब्द*
*संयम*
*संकलक :- जगन्नाथ दिंडे, मुखेड*
8668453639
========***********=========
*🎂 आजचा वाढदिवस*
👤संतोष कंदेवार, लेखाधिकारी,
महानगरपालिका, नांदेड
*संकलक :- नासा येवतीकर, धर्माबाद*
9423625769
[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा वरील क्रमांकावर पाठवू शकता. ]
========***********=========
*आजची @@ गजल @@*
माझ्याच घरात या नाती शोधतो मी
माणसाच्या गर्दीत माणूस शोधतो मी..
हरवलेली नाती पुन्हा पुन्हा शोधतो मी
डोळ्यातल्या आसवाला वाट शोधतो मी..
गर्दीत आज या हरवून गेलो मी
माणसाच्या गर्दीत माणूस शोधतो मी..
वेदनांचे काहूर कसे रोज सोसतो मी
आपल्याच माणसात परका होतो मी..
चालणारांच्या गर्दीत वाट शोधतो मी
वाळवंटाच्या उन्हात सावली शोधतो मी..
चालून थकलो आता विसावा शोधतो मी
माणसाच्या गर्दीत माणूस शोधतो मी..
*पप्पू मोहरकर*
========***********=========
*आजचा*
⛳ 🍁॥ विचार धन ॥🍁 ⛳
खरा आणि शुद्ध 'विचार' मांडू पाहणा-या संताना निंदा, मानहानी, त्रास याला तोंड द्यावंच लागलं.रूढ समाजमान्यतेला धक्का लावायला मोठं धाडस लागतं. काहीतरी बोलून खळबळ माजवून वेगळ्या मार्गाने स्वत:ची 'प्रसिद्धि' साधणं हे वेगळं.
पण जे खरं, वास्तविक आहे, ते समाजाला रूचणारं नसलं तरी मांडायला मोठं धाडस लागतं. समाजाला जे भावतं ते मांडून वाहवा मिळविण्यात काही त्रास नसतो.
" समाजाला जे भावत नाही, पण आज ना ऊद्या भोवणारं आहे, ते स्पष्ट सांगायला धाडस लागतं."
🔔॥ रामकृष्णहरी ॥🔔
🔱⚜ सर्वेपि: सुखिन: सन्तु: !!⚜🔱
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
- संजय नलावडे, चांदिवली, मुंबई
========***********=========
*आजची लिंक*
संगीता देशमुख यांचा लेख जरूर वाचा
*प्रकाश आमटे*
http://marathi.pratilipi.com/sangita-deshmukh/prakash-amte
========***********=======
*आजची बोधकथा*
*आईची ममता*
एका स्त्रीचा पती तरूणपणीच वारला. तिला एकच मुलगा होता. तिने मजुरी करून मुलाला शिकविले. ज्यादिवशी मुलाला नोकरी लागल्याचे तिला समजले तेव्हा समजले तेव्हा तिच्या आनंदाला पारावार उरला नाही. तिच्या परिश्रमांचे चीज झाले असे तिला वाटले. पण पुढे जाऊन मुलगा तिला विचारेनासा झाला. एकदा तर आई आणि मुलामध्ये प्रचंड वादावादी झाली. मुलाने टोकाचा निर्णय घेतला व आईच्या डोक्यात दगड घातला. बिचारी आई रक्तबंबाळ अवस्थेत रस्त्यावर पडली. रस्त्यावरून जाणा-या एका वाटसरूने दुस-या एकाला विचारले,''का हो बुवा, या म्हातारीला असे काय झाले की रस्त्यावर रक्तबंबाळ अवस्थेत पडली आहे.'' दुसरा माणूस त्या वाटसरूला म्हणाला,'' अहो महाराज या बाईच्या पोटच्या मुलाने भांडण केले व भांडणाभांडणात त्याने हिच्या डोक्यात दगड घातला व मुलगा निघून गेला.'' वाटसरू हळहळला व म्हणाला,'' काय पण बिचारीवर दिवस आले, पोटच्या मुलगा इतका कसा वाईट निघू शकतो, दुष्ट, दुराचारी, नराधम मुलाला तर खरे म्हणजे फासावरच द्यायला पाहिजे आहे.'' त्याचे हे बोलणे ऐकताच इतकेवेळ आडवे पडून असणारी आई जागेवरच उठून बसली व म्हणाली,'' बाबा रे तू तुझ्या रस्त्याने निघून जा. माझा मुलगा हा माझ्यासाठी अनमोल ठेवा आहे. आत्ता तो रागात आहे. राग शांत झाल्यावर त्याला त्याची चूक समजून येईल व तो पुन्हा आईच्या मायेसाठी माझ्या मांडीवर विसावण्यासाठी परत येईल. बाबा रे, मला जर मुलगाच झाला नसता तर मला कोणी आई म्हणून हाक मारली असती. त्याच्यामुळे मी आई झाले आहे. तो चुकीचा वागला असेल तर माफ मीच करणार आहे.''
तात्पर्य – मुलाने कितीही चूक केली तरी माफ करणारी ती एकमेव अशी ....................................आई
वर्तमानपत्रातून संग्रहित
========***********=======
🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏 पुन्हा भेटू उद्या
फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार
========***********=========
https://www.facebook.com/nagorao26/?hc_ref=PAGES_TIMELINE&fref=nf
ReplyDelete