*🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर प्रस्तुत 📢*
📱 9423625769
1⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 1⃣
🕖 प्रसारण वेळ : रोज सकाळी 06:50 ते 07:00 am
----------------------------------------------------
http://fmbuleteen.blogspot.com
----------------------------------------------------
📅 दि. 31/12/2016 वार - शनिवार
========***********=========
*📆 . . दिनविशेष . . 📆*
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
💥 आज 2016 या वर्षाचा शेवटचा दिवस.
💥1926 इतिहासाचार्य राजवाडे यांचा स्मरणदिन
💥1600 ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना
💥1997. स्वरराज छोटा गंधर्वस्मरणदिन.
संकलक :- सौ. खेडकर सुभद्रा त्रिंबकराव
मु.अ. जि.प.प्रा.शा. किट्टी आडगाव
ता.माजलगांव जि.बीड
मो.न.9403593764
========***********=========
*आजच्या ठळक बातम्या*
1⃣ BHIM अॅपच्या माध्यमातून विकसित करण्यात आलेल्या तंत्रज्ञानातून केवळ अंगठ्याच्या माध्यमातून पेमेंट करता येणार आहे. "आपला अंगठाच आपली बँक" होईल पंतप्रधान नरेंद्र मोदी
2⃣ संयुक्त राष्ट्रामध्ये मसूद अझरला दहशतवादी घोषित करण्याचा भारताचा प्रस्ताव चीनने रोखला, भारताने व्यक्त केली चिंता.
3⃣ पीटीआयने दिलेल्या बातमीनुसार सीबीएसईनं जेईई 2017च्या ऑनलाइन अडमिशनची अंतिम तारीख 16 जानेवारी 2017पर्यंत वाढवली
4⃣ अखिलेश यादव सह रामगोपाल यादवयांची समाजवादी पक्षातून हकालपट्टी
5⃣ नोटाबंदीनंतरची परिस्थिती आता बऱ्यापैकी सुधारली आहे. प्रसारमाध्यमांनी डिसेंबरच्या सुरुवातीच्या रांगांच्या चित्रफिती आता दाखवू नयेत अरुण जेटली
6⃣ मुंबईकर युवा बुध्दिबळपटू संजीव नायरने (इलो १८९९) याने मुंबई आंतरराष्ट्रीय बुध्दिबळ स्पर्धेच्या तिसऱ्या दिवशी इजिप्तचा ग्रँडमास्टर हेशाम अब्दलरहमान (इलो २४०८) याला धक्का देत खळबळ माजवली.
7⃣ कर्णधार स्टीव्ह स्मिथ याने झळकावलेल्या कारकिर्दीतील १७व्या शतकाच्या जोरावर यजमान आॅस्टे्रलियाने पाकिस्तानविरुध्दच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात चौथ्या दिवसअखेर २२ धावांची माफक आघाडी मिळवली
💥 ज्येष्ठ काँग्रेसचे जेष्ठ नेते बाळासाहेब विखे पाटील यांचे वयाच्या 84 व्या वर्षी प्रवरानगर निधन
*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*
📱 9960358300
========***********=========
*🌷 फ्रेश सुविचार 🌷*
जवळीक दाखवणारा हा जवळचाच असतो असं नाही,
हृदयापासून जो जवळचा असतो तोच आपला असतो.....
*संकलक :- बालाजी चौधरी, लातूर*
7588876539
========***********=========
*आजचा मराठी शब्द*
*हकालपट्टी*
*संकलक :- जगन्नाथ दिंडे, मुखेड*
8668453639
========***********=========
*🎂 आजचा वाढदिवस*
👤 रामचंद्ररेड्डी सामोड, येताळा
👤 ताहेर पठाण, धर्माबाद
👤 किरण अबुलकोड, समराळा
👤 शंशाक पुलकंठवार, धर्माबाद
*संकलक :- नासा येवतीकर, धर्माबाद*
9423625769
[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा वरील क्रमांकावर पाठवू शकता. ]
========***********=========
*आजची @@ गुगली @@*
" थर्टी फर्स्ट "
ज्याच्या त्याच्या परीने
प्रत्येकाचा थर्टी फर्स्ट आहे
तुम्हीच सांगा थर्टी फर्स्ट
खरच किती मस्ट आहे
नव्या वर्षात जातांना
असे का व्हावे बेहोश
संयमाने ही साजरा
करता येतो जल्लोष
शरद ठाकर
सेलू जि परभणी
8275336675
========***********=========
*आजचा*
⭐ ⭐॥ विचार धन ॥⭐ ⭐
कोणतेही नाते प्रत्येक क्रियेने उज्ज्वल करता येणे, ही खरी सार्थकता. परंपरेने किंवा संस्कृतीने जी सणावारांची यादी केली, त्या प्रत्येक सणाचा अन्वयार्थ नव्याने शोधायला हवा; तरच आनंद-परमानंद-ब्रम्हानंद या पाय-या चढता येतील. वाद आणि भांडणाच्या प्रकारात जो अडकतो त्याचा फास आधिकाधिक घट्ट होण्याची शक्यता असते. त्यामुळे स्नेहभावनेतून जग जोडले पाहिजे. भारतीय संस्कृतीत प्रत्येक दिवस स्नेहाद्रता पेरत येतो, म्हणून सण हे उत्सवांचे प्रतीक म्हणून साजरे व्हावेत.
नात्यांचा, घटनांचा अर्थ लावत आपल्याला मनाचा स्वयंविकास जेव्हा साधता येईल, तेव्हाच सगळे सण-उत्सव प्रतीकरूप होतील. रोजचा दिवस येतो आणि जातो. रोजच्या कामात मग्न असणारे आपण काही नवीन करतो का, किंवा जे कुठलेही काम करतो त्याच्यात काही नवीन शोधतो का ? नसल्यास ते जमले पाहिजे. नित्यनूतनतेचा ध्यास जोवर लागत नाही, तोवर आयुष्यातून शिळेपणा जाणार नाही. प्रत्येक क्षणाचा उत्सव करणे हे आपले कर्तव्य आहे. या भावनेने जगण्याच्या अनेकविध अंगांकडे पाहता आले पाहिजे.
🌟 ॥ रामकृष्णहरी ॥ 🌟
-संजय नलावडे, चांदिवली मुंबई
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
========***********=========
*आजची लिंक*
*पाऊलवाट : शिक्षण क्षेत्रातील एक दिशादर्शक*
http://nasayeotikar.blogspot.com/2016/11/blog-post_23.html
पुस्तक परीक्षण
========***********=======
*आजची बोधकथा*
*भिकारी आणि तरूण मुलगा*
एक भिकारी होता. तो आंधळा व पांगळा होता. सतत एका जागी बसून असायचा. कधी त्याला खायला मिळे तर कधी उपाशीपोटी झोपून जाई. त्यामुळे त्याची अवस्था हाडाच्या सापळ्यासारखी झाली होती. जन्माने तो अंध नव्हता तर वृद्धत्वामुळे त्याला अंधपणा आला होता. त्यातच त्याला कुष्ठरोगही झाला होता. त्यामुळे लोक जरासे त्याच्यापासून लांबच राहत. बिचारा भिकारी रस्त्यावर बसून लोकांकडे कळवळून भीक मागत असे. पण त्याच्या त्या कुरुप रुपामुळे तो कुणालाही आवडत नसे. त्याच रस्त्यावरून एक कॉलेजवयीन तरूण जात असे. त्याचा जाण्यायेण्याचा रस्ताच तो होता त्यामुळे त्या तरूणाला हा भिकारी रोजच दिसत असे. भिका-याची अशी अवस्था पाहून तरूणाला खूप वाईट वाटे. कधीकधी तो दोनपाच रूपये त्या भिका-याला देतही असे पण मनातून मात्र तो खूप दु:खी होत असे. तरूणाला वाटे की आंधळा, पांगळा, कुष्ठरोग झालेला देह घेऊन जगताना या जीवाला किती यातना होत असतील. देवसुद्धा अशा जीवांना पटकन का बरे उचलत नाही. एकेदिवशी तो भिका-याजवळ थांबला व म्हणाला,''बाबा, देवाने अशी अवस्था केली असतानासुद्धा तुम्ही देवाचेच नाव घेऊन का जगत आहात. तुम्ही भीक मागून पोट भरता, पण देवाला मरण मागण्याची तुम्ही का प्रार्थना करत नाही.'' तरूणाच्या या बोलण्यावर भिकारी हसला व म्हणाला,'' मुला, मरण मागून या यातनांपासून दूर जावे ही गोष्ट मला किंवा परमेश्वराला दोघांनाही कळते पण कितीही जरी मी प्रार्थना केली तरी या जन्माचे भोग भोगल्याशिवाय माझी सुटका नाही हे त्या परमेश्वराला जास्त कळते आणि मी रोजच झोपण्यापूर्वी प्रार्थना करतो की देवा यातून सुटका कर पण देवाला वाटते की, मला जास्तीत जास्त लोकांनी बघावे आणि विचार करावा की पूर्वी मी ही तुमच्यासारखाच हातीपायी धड होतो, सुंदर दिसत होतो पण अपघातात पाय गेले, म्हातारपणाने डोळे गेले आणि अचानक कुष्ठ उदभवले. यातून परमेश्वर सुचवू पाहतो आहे की सगळे दिवस सारखे नसतात त्यामुळे कोणत्याही गोष्टीचा अहंकार बाळगू नये.'' भिका-याचे हे बोल ऐकताच तरूण मुलगा अचंबित झाला, त्याच्या सहज बोलण्यात त्याने फार मोठे तत्वज्ञान शिकविले होते.
तात्पर्य :- सर्व दिवस सारखे नसतात, त्यामुळे प्राप्त परिस्थितीमध्ये अहंकार न बाळगणे हेच बरे.
वर्तमानपत्रातून संग्रहित
========***********=======
🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏 पुन्हा भेटू उद्या
फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार
========***********=========
Comments
Post a Comment