प्रतिक्रिया :- कवयित्री सौ. शशिकला बनकर, भोसरी, पुणे

फ्रेश माॅर्निंग बुलेटिन
विषयी -
प्रतिक्रिया...
फ्रेश माॅर्निंग बुलेटीन, नावाप्रमाणेच फ्रेश आहे. असे म्हटल्यास वावगे ठरू नये, मा. ना. सा. येवतिकर सरांच्या या उपक्रमाचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे, रोज सकाळी अगदी वेळेवर हे बुलेटीन प्रसारीत केले जाते, एकही दिवस न चुकवता, त्यासाठी आपल्या सर्व अडचणी दूर ठेऊन सर हे काम करतात, शालेय विद्यार्थी सुद्धा न चुकता हे बुलेटीन वाचतात. माझ्या सारख्या अनेक लेखकांना कवींना आपल्या चारोळ्या सुविचार यामध्ये प्रकाशित करून एक प्रकारे प्रोत्साहन दिले जाते
नविन दिवसाची सुरूवात फ्रेश माॅर्निंग बुलेटीन वाचूनच होते... ठळक बातम्या, दिनविशेष मुळे ज्ञानात भर पडते, सुविचार मनाला आधार देतात, विचारवेध आणि गुगली विचार करायला लावतात, रोज एक मराठी शब्द वेगळा देऊन, माय मराठीचा सन्मान वाढविला आहे, या बुलेटिनने, आपल्या प्रियजनांचे वाढदिवसही आपण मोठ्या सन्मानाने यामध्ये साजरे करतो
*मराठी भाषेचा सन्मान
फ्रेश माॅर्निंग बुलेटीन *
... कवयित्री सौ. शशिकला बनकर, भोसरी, पुणे

Comments