फ्रेश मॉर्निंग बुलेटीन
मागील वर्षापासून ना सा येवतीकर सर यांनी एक अविरत व्रत स्वीकारले आणि ते व्रतस्थपणे श्रध्देने पार पाडतात,ते म्हणजे शालेय विद्यार्थ्यांसाठीचा दैनंदिन "फ्रेश मॉर्निंग बुलेटीन"! यात दिनविशेष,जोडशब्द,,बातम्यासह बोधकथा देखील समाविष्ट असते. जवळील,संबंधित व्यक्तींचे वाढदिवस यांचा उल्लेख करून त्या व्यक्तीला त्या दिवशी ते स्पेशल बनवतात. या बुलेटिनचे खास वैशिष्ट्य म्हणजे यात सृजनशीलतेला वाव दिल्या जातो. जसे की सुविचार हा फार मोठ्या व्यक्तीचे बोल नसून आमच्यासारख्या सामान्य माणसाला आलेल्या अनुभवातून उमटलेले सुंदर विचार यात सुविचार म्हणून स्वीकारतात. पण एखादी गोष्ट सुरू करणे फारसे अवघड नसते पण त्यातील सातत्य टिकून ठेवणे तारेवरची कसरत असते. पण ना सा येवतीकर सर नोकरी करत करत साहित्याची सेवा करून फ्रेश मॉर्निंग बुलेटिन सारखे जबाबदारीचे कामही नेटाने करतात. त्यांच्या प्रयत्नाची फळे आम्ही दररोज चाखतो. मी सकाळी सात वाजता शाळेत गेल्याबरोबर माझ्या शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना माहीत असते की,आपल्या मॅडमकडे परिपूर्ण परिपाठ तयार असतो. ते थेट माझ्याकडे विश्वासाने येऊन परिपाठाची तयारी करतात. हा माझ्याबद्दलचा मुलांचा विश्वास निर्माण होण्यामागचे महत्वाचे कारण म्हणजे फ्रेश मॉर्निंग बुलेटिन आहे. अविरतपणे हे बुलेटिन माझ्याकडे सकाळी सातच्या आधी अगदी वेळेवर कर्तव्यजाणीवेने येऊन पडलेले असते. म्हणून मला फ्रेश मॉर्निंग बुलेटिनकार ना सा येवतीकर सर यांचे कौतुक व अभिमान वाटते.
-संगीता देशमुख,वसमत
Comments
Post a Comment