फ्रेश मॉर्निंग बुलेटीन दिनांक 02 डिसेंबर 2016

*🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर प्रस्तुत 📢*

📱 9423625769

1⃣  🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 1⃣ 

🕖 प्रसारण वेळ : रोज सकाळी 06:50 ते 07:00 am

----------------------------------------------------

http://fmbuleteen.blogspot.com

----------------------------------------------------

📅 दि. 02/12/2016 वार - शुक्रवार 

========***********=========

                 *📆 . . दिनविशेष . . 📆*

⏳१९४२ - अणुशक्तीचा शोध

⏳ १९४२ - योगी अरविंद यांच्या आश्रमाची पॉडेचरी येथे स्थापना

💥 जन्म :-

⏳ १९०५ - आधुनिक मराठी लेखक अनंत आत्माराम काणेकर

💥 मृत्यू :- 

⏳१९५४ - अॅटलासचा जनक मर्केटर गेरहार्ट

*संकलक :- सौ. सुभद्रा सानप, बीड*

                 9403595764

========***********=========

*आजच्या ठळक बातम्या*

1⃣ नोटा बंदी नंतर आत्ता सोन्यावर नजर - महिलांना 50 तोळे सोनं ठेवण्यास परवानगी, तर पुरुषांना फक्त 10 तोळे सोनं ठेवण्यास परवानगी, अविवाहित महिलांसाठी 25 तोळे सोन्याची अट

2⃣ बंगळुरु येथे आयकर विभागाच्या अधिका-यांनी दोन लोकांच्या घरात छापा टाकून चार कोटी रुपयांच्या नव्या नोटा केल्या जप्त.

3⃣  रिलायन्स जिओ हॅप्पी न्यू इयर ऑफर, रिलायन्स जिओजी सेवा ३१ मार्चपर्यंत पूर्णपणे मोफत ,फेसबुक, व्हॉटसअॅप, स्काईपपेक्षा जिओ वेगाने वाढली, रिलायन्स जिओ जगातील वेगाने पुढे जाणारी कंपनी आहे - मुकेश अंबानी.

4⃣ पंढरपूर येथील शहीद मेजर कुणाल गोसावी आणि नांदेड मधील शहीद संभाजी कदम यांच्यावर अंत्यसंस्कार, साश्रुनयनानी दिला वीरपुत्राला अखेरचा निरोप

5⃣  344 कॉम्बिनेशन औषधांवरील बंदी दिल्ली उच्च न्यायालयाने हटवली.

6⃣  पेट्रोल पंप तसेच विमान तिकीटासाठीही आज मध्यरात्रीपर्यंत ५०० रुपयांच्या जुन्या नोटा करणार स्वीकार

7⃣ भारतीय बॅडमिंटनपटू सायना नेहवाल मकाऊ ओपनच्या क्वार्टर फायनलमध्ये पोहोचली.

*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*

📱 9960358300

========***********=========

*🌷 फ्रेश सुविचार 🌷*

संयम जीवनाचा खरा पाया होय.


*संकलक :- बालाजी चौधरी, लातूर*

                  7588876539

========***********=========

*आजचा मराठी शब्द*

             *संयम*


*संकलक :- जगन्नाथ दिंडे, मुखेड*

                  8668453639

========***********=========

*🎂 आजचा वाढदिवस* 

👤संजय डाड, नांदेड

👤सौ. शर्वरी शिवराज सावंत, मालवण

👤धनराज राखेवार, नांदेड

👤वैशाली गर्जेपालवे, प्रा. शि. ठाणे

👤सूर्यकांत तोकलवाड, धर्माबाद

👤सूरज पाटील जाधव, धर्माबाद


*संकलक :- नासा येवतीकर, धर्माबाद*

                  9423625769

[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा वरील क्रमांकावर पाठवू शकता. ]

========***********=========

*आजची @@ चारोेळी @@*


जाणली ना वेदना जगाने

स्वीकारली दुःखे मनाने

कसे आवरू सांग ना ते

जोडले जे बंध या क्षणाने


निर्मला सोनी, अमरावती

========***********=========

*आजचा*

🎯   विचारवेध.....✍🏻

▪▪▪▪▪▪▪▪


नको ते विचार मनात आणून आपणच आपल्या मनाची चलबिचल अवस्था करून टाकतो. त्यामुळे त्याचा परिणाम पुढे होणा-या कामावर दिसून येतो. अशावेळी आपल्याला काय करावे काही सुचत नाही. अशावेळी आपल्या मनाचा तोल ढळू न देता मन शांत ठेऊन पुढे येणा-या किंवा हातात घेतलेल्या कामात पूर्ण लक्ष केंद्रीत करावे. असे केल्यास आपली प्रगती निश्चितपणे होऊ शकते यात कसलीच शंका नाही.


    - व्यंकटेश काटकर, नांदेड      

        9421839590

🌺💜🌺💜🌺💜🌺💜

========***********=========

*आजची लिंक*

*फ्रेश मॉर्निंग बुलेटिन विषयी*

*प्रतिक्रिया - संगीता देशमुख , वसमत*


http://fmbuletin.blogspot.com/2016/12/feedback.html


आपल्याही प्रतिक्रिया अपेक्षित आहेत.

========***********=======

*आजची बोधकथा*

मूर्खांचे निष्‍कर्ष


एका खगोलशास्त्रज्ञाने दुर्बिणीतून सूर्याचे निरीक्षण केले. त्‍याला निरीक्षणातून असे कळून आले की सूर्यावर प्रचंड मोठा प्राणी आहे व आपण खूप मोठा शोध लावला या समजूतीने तो लोकांना जमवून त्‍या शोधाची माहिती सांगू लागला की '' सूर्य प्रचंड उष्‍ण तारा असूनही त्‍यावर एक प्राणी जीवंत राहतो आणि तुम्‍ही सगळे आता घाबरून राहा जर तो प्राणी पृथ्‍वीवर आला तर पृथ्‍वीचे काय होईल हे पहा.'' खगोलशास्‍त्रज्ञाच्‍या या बोलण्‍यावर काही लोकांचा खरेच विश्‍वास बसला व त्‍यांच्‍यापैकी काही लोकांनी त्‍याचा सत्‍कार करण्‍याचे ठरविले. पण जमलेल्‍या काही लोकांपैकी एक जण चिकित्‍सक होता त्‍याने त्‍या ज्‍योतिष्‍याची दुर्बिण तपासायचे ठरविले व त्‍याने ती दुर्बिण तपासली असता त्‍याच्‍या लक्षात आले की महाकाय प्राणी हा सूर्यावर नसून एक माशी दुर्बिणीच्‍या काचेवर अडकून पडली आहे आणि सूर्याकडे पाहताना ती माशी म्‍हणजे महाकाय प्राणी असल्‍याचा भास होत होता. चिकित्‍सक माणसाने ही गोष्‍ट लोकांना सांगताच त्‍यांना शास्‍त्रज्ञाचा मूर्खपणा लक्षात आला.


तात्‍पर्य :- जे लोक मूर्खपणाने किंवा उतावीळपणे बेछूट विधाने करतात किंवा सारासार विचार न करता, पुढचामागचा विचार न करता बोलत राहतात असे लोक कधी ना कधी तोंडावर आपटतात. त्‍यांचा पराभव हा निश्चित ठरलेला असतो.

*सौजन्य :-* zpguruji.com

========***********=======

🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏 पुन्हा भेटू उद्या

फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार 

========***********=========

Comments