फ्रेश मॉर्निंग बुलेटीन दिनांक 03 डिसेंबर 2016

*🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर प्रस्तुत 📢*
📱 9423625769

1⃣  🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 1⃣ 
🕖 प्रसारण वेळ : रोज सकाळी 06:50 ते 07:00 am
----------------------------------------------------
http://fmbuleteen.blogspot.com
----------------------------------------------------
📅 दि. 03/12/2016 वार - शनिवार 
========***********=========
                 *📆 . . दिनविशेष . . 📆*

💥 जागतिक अपंग सहाय्यता दिन 💥

⏳ १९७१ : भारत पाक युध्द सुरु,याचा शेवट म्हणजे स्वतंत्र बांगला देशाची निर्मिती
⏳ १९८४ : भोपाळ वायु गळती दुर्घटना हजारो लोक मृत्युमुखी
💥 जन्म :-
⏳ १८८४ : स्वतंत्र भारताचे पहिले राष्ट्रपती डॉ. राजेंद्रप्रसाद
💥 मृत्यू :- 
⏳ १९१२ : प्रुदेन्ते होजे दि मोरे बारोस, ब्राझिलचा राष्ट्राध्यक्ष.

*संकलक :- सौ. सुभद्रा सानप, बीड*
                 9403595764
========***********=========
*आजच्या ठळक बातम्या*
1⃣आरबीआयच्या सूचनांकडे दुर्लक्ष करत पैशांच्या अनियमित व्यवहारांप्रकरणी सार्वजनिक क्षेत्रातील बँकांचे 27 अधिकारी निलंबित. तर 6 अधिकाऱ्यांची बदली.
2⃣ मुंबई महानगर प्रदेशात १ लाख १० हजार घरे बांधण्यात येणार आहेत.यात एकही गिरणी कामगार घरापासून वंचित राहणार नाही, अशी ग्वाही गृहनिर्माण मंत्री प्रकाश महेता यांनी दिली
3⃣ माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांच्या 80 व्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या आत्मचरित्राचे मुंबईत झाले प्रकाशन
4⃣ साद माणुसकीची सामाजिकता अभियान अंतर्गत चंद्रपूर जिल्ह्यातील कोठारी केंद्राच्या कार्यकक्षेत येणाऱ्या 10 शाळा साठी *विद्यालंकार ज्ञानपीठ ट्रस्ट* यांचेकडून 20 लाख रु. सहयोग निधी उद्या मुंबईत होणाऱ्या *जगा आणि जागा समृध्दीतून सहयोग* या कार्यक्रमात हस्तांतरण करण्यात येणार असल्याची माहिती साद माणुसकीचे संकल्पक हरीश बुटले यांनी दिली. अधिक माहिती आजच्या लिंक वर पहा
5⃣ औरंगाबाद शहरातील विविध दहा दारूची दुकाने बंद करण्यासाठी पोलीस आयुक्तांचा प्रस्ताव.
6⃣ फॉर्म्युला वन शर्यतींमधील विश्वविजेत्या निको रोसबर्गने केली निवृत्तीची घोषणा.
7⃣ लोढा समितीच्या शिफारशींच्या अंमलबजावणीबाबत बीसीसीआय आपल्या भूमिकेवर कायम. बीसीसीआयचे सचिव अजय शिर्के यांनी दिली माहिती.

*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*
📱 9960358300
========***********=========
*🌷 फ्रेश सुविचार 🌷*
एकमेकांची प्रगती साधते ती खरी मैत्री होय.

*संकलक :- बालाजी चौधरी, लातूर*
                  7588876539
========***********=========
*आजचा मराठी शब्द*
             *मैत्री*

*संकलक :- जगन्नाथ दिंडे, मुखेड*
                  8668453639
========***********=========
*🎂 आजचा वाढदिवस* 
👤 श्रेयस दिलीप धामणे, हिंगोली
👤 रघूनाथ टेकूलवार, करखेली
👤 साईप्रसाद पुलकंठवार, धर्माबाद

*संकलक :- नासा येवतीकर, धर्माबाद*
                  9423625769
[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा वरील क्रमांकावर पाठवू शकता. ]
========***********=========
*आजची @@ गुगली @@*

     " खिल्ली "

आज काल व्यंगाची ही
पहा कशी खिल्ली आहे
एकदम खालच्या थराचे
राजकारण हल्ली आहे

व्यंगावरून कोणाचीच
खिल्ली उडवायला नको
असली घटना कोणीच
पुन्हा घडवायला नको

     शरद ठाकर
सेलू जि परभणी
  8275336675
========***********=========
*आजचा*
🎯    विचारवेध......✍🏻
=============÷÷÷====
प्रत्येक व्यक्तीच्या यशस्वी जीवनाचे रहस्य त्याच्या
आत्मविश्वासाने केलेल्या कृतीमध्ये असते. तसेच
कृती करण्यामध्ये कुठेही मन विचलीत न होऊ देता
एकाग्रतेत आणि त्या कृती सातत्यात असते. तेव्हा
कुठे ती व्यक्ती आपल्या जीवनात यशस्वी होऊ
शकते. त्यांचा हा आदर्श आपण आपल्या समोर
ठेऊन कृती केली तर आपणही  आपल्या
जीवनात  यशस्वी होऊ शकतो.

- व्यंकटेश काटकर, नांदेड
9421839590
🌺🌸🌺🌸🌺🌸
========***********=========
*आजची लिंक*
*जगा आणि जागा समृध्दीतून सहयोग कार्यक्रम*

*दिनांक 04 डिसेंबर 2016*
*स्थळ :- वडाळा पूर्व मुंबई*

अधिक माहिती किंवा कार्यक्रमाची रूपरेषा पाहण्यासाठी खालील लिंक ला क्लिक करा.

http://saadmanuski.blogspot.com/2016/12/blog-post.html

*साद माणुसकीची*
========***********=======
*आजची बोधकथा*

राजज्‍योतिषी

अवंतीनगरीचे राजा बाहुबली यांना राजज्‍योतिष्‍याची गरज होती. मंत्रिपरिषदेसमोर त्‍यांनी ही इच्‍छा व्‍यक्त केली. राजज्‍योतिषाबाबत घोषणा केली जावी आणि पात्र व्‍यक्तिला निरखुन पारखून नियुक्त केले जावे अशी सर्व मंत्रिगणांनी सर्वसहमतीने ठरवले. या पदासाठी पात्र उमेदवारांनी मुलाखती द्याव्‍यात अशी दवंडी दुस-या दिवशी राज्‍यात पिटवण्‍यात आली. सर्व उमेदवार ठरलेल्‍या वेळी दरबारात उपस्थित झाले. राजाने स्‍वत:च मुलाखती घेण्‍यास सुरुवात केली. अनेक ज्‍योतिष्‍यांनी आपल्‍या ज्ञानाचे सादरीकरण करण्‍यास सुरुवात केली परंतु राजाचे समाधान झाले नाही. अखेरीस तीन ज्‍योतिषी उरले त्‍यातील पहिल्‍या ज्‍योतिष्‍याला राजाने विचारले,''तुम्‍ही भविष्‍य कसे सांगता'' ज्‍योतिषी म्‍हणाला,''नक्षत्र पाहून'' राजाने दुस-या ज्‍योतिष्‍याला हाच प्रश्‍न विचारला तेव्‍हा दुसरा ज्‍योतिषी म्‍हणाला,''हस्‍तरेषा पाहून भविष्‍य सांगतो'' राजाला कुणाचीच उत्तरे आवडली नाहीत. अचानक राजाला तेव्‍हा आपल्‍या राज्‍यातील निर्धन ज्‍योतिषी विष्‍णुशर्माची आठवण झाली. विष्‍णुशर्माला तात्‍काळ बोलावण्‍यात आले. राजाने विष्‍णुशर्माला विचारले,'' तुम्‍ही ज्‍योतिषी असूनसुद्धा या मुलाखतीसाठी का आला नाहीत. तुम्‍हाला राजज्‍योतिषी होणे आवडत नाही काय'' विष्‍णुशर्माने सांगितले,''महाराज मी घरी बसून माझ्या स्‍वत:च्‍या पत्रिकेचा अभ्‍यास केला व माझ्या अभ्‍यासानुसार या पदावर मीच नियुक्त होणार आहे. तुम्‍ही मला निमंत्रण पाठवून मला बोलावून घ्‍याल हे मला माझ्या अभ्‍यासातून आधीच कळाले होते. त्‍यामुळे मी या पदासाठी मुलाखत देण्‍यास आलो नाही.'' राजाला विष्‍णुशर्माची अभ्‍यासू वृत्ती व त्‍याचा आत्‍मविश्‍वास या दोन्‍हीचा अभिमान वाटून त्‍याने विष्‍णुशर्माला राजज्‍योतिषी म्‍हणून नियुक्त केले.

तात्‍पर्य - ज्‍यांचा स्‍वत:वर व स्‍वत:च्‍या अभ्‍यासावर प्रचंड विश्‍वास असतो ते कधीच हार मानत नाहीत व त्‍यांच्‍याकडे संधी आपोआप चालून येते.

*सौजन्य :-* zpguruji.com
========***********=======
🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏 पुन्हा भेटू उद्या
फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार 
========***********=========

Comments